माझ्या समोरचा कागद कोराच राहतो,
भावनांचा गुंता सोडवता सोडवता
जेव्हा विचारांचा गुंता वाढतो,
विचारांचा गुंता सोडवता सोडवता
जेव्हा शब्दांचा गुंता वाढतो,
तेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.
विचारांच्या गर्दीत प्रत्येक चेहरा अनोळखीच भासतो,
किंबहुना आपल्या विचारांशी आपलाच गहिरा संबंध असतो,
कधीकधी मनातून कागदावर उतरता उतरता
तो विचार पुन्हा गर्दीत हरवून जातो,
तेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ।। धृ ।।
एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।
उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।
वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।
इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।
आपल्याला माहिती, येत असलेल्या ओरिगामीच्या वस्तू इथे टाकूयात.
जमलं तर त्यांची कृती ही.
लिहून/ चित्रातून/ व्हिडिओची लिंक देऊन.
सुरुवातीला चुकून हा वाहता धागा झाला होता. त्यामुळे काहींच्या कलाकृती वाहून गेल्या, क्षमस्व __/\__ कृपया आपल्या कलाकृती टाकाल?
काहींनी मस्त लिंक्सही दिल्या होत्या, त्याही पुन्हा द्याल?
तसदीबद्दल दिलगीर !
गूगल वर paper lantern शोधलं तेव्हा हा आकाश कंदिल मिळाला , सोपा वाटला म्हणून करून बघितला.
१.
२.
माझी मावस-आत्ये सून ( माझ्या बहिणीच्या नणंदेची सून ) एक गुणी कलाकार. तिच्या अनेक कलाकृती नेहमीच वाखाणण्याजोग्या. या वर्षी ती आणि तिच्या दोघी मैत्रिणी अन त्यांच्या लेकींनी त्यांच्या सोसायटीच्या गणपतीची सजावट फार फार सुरेख केली आहे. मला त्यांची ही कला इथे दाखवावी वाटली, अन त्या तिघींनी तशी लगेच परवानगीही दिली. त्या तिघींचे मनापासून आभार अन कौतुकही.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे अनेकजण आपल्या कलाकृति सादर करत आहेत त्या बघुन मला स्फुर्ती आली. मी आज कागदाची फुले केली. मी ऑफिसमधे रिकामा वेळ मिळाला कि हि करतच असतो.
आपण जी क्रेप कागदाची फुले करत असू, तशीच हि करतो. पण यासाठी मी कॉम्प्यूटरच्या कंटिन्यूअस स्टेशनरीचा कागद वापरतो. मला यासाठी कात्री, गोंद वगैरे काहीच लागत नाही. या पाकळ्या मी हातानेच कागद फाडून बनवतो. आधी मधे एक कपटा चुरगाळून कळीसारखा आकार करुन घेतो, आणि त्याभोवती पाकळ्या रचत जातो. या पाकळ्यांच्या कडा किंचीत गुंडाळून घेतो. तळाशी हातानेच पिळ देत पाकळ्या घट्ट बसवत जातो. शेवटी देठाला, याच कागदाची कडेची पट्टी, गुंडाळून घेतो.