''असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'' असं स्वप्न लहानपणी सगळेच बघतात. पण त्यातली एखादीच निकिता असते, जी वयाच्या पंधराव्या वर्षापासून ह्या स्वप्नातल्या चॉकलेट्सना मूर्त स्वरूप देऊ लागते, छंद म्हणून चॉकलेट्स बनवता बनवता केवळ सतरा वर्षे वय असताना चॉकलेट्सचे आणि फक्त चॉकलेट्सचे दुकानही सुरू करते! ज्या वयात इतर मुले-मुली कॉलेजला बुट्ट्या मारून स्वच्छंद जगणे, पार्ट्या, मित्रमैत्रिणी यांच्यात मश्गुल असतात त्या वयात अवघ्या एकोणिसाव्या वर्षी निकिता आपल्या तिसऱ्या ''चॉकलेट स्टोरी''च्या दुकानाचे मोठ्या दिमाखात अनावरण करते!!
घरातला कर्ता पुरूष जर अपयशी ठरला, त्याची नोकरी गेली, तो हताश झाला, त्याचा आत्मविश्वास ढळला तर सार्या घरासच अवकळा प्राप्त होते. इतर सदस्य मग आपापल्या परीने अर्थार्जन करून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही घराला मुळातली संपन्नता काही पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही.
आपल्या भारताचे तसेच झाले असावे असा मला संशय येतो आहे. भारतात ७०% व्यवसाय शेतीचा समजला जातो. म्हणून भारतातला कर्ता व्यवसाय, शेतीच म्हणायला हवा. मग भारत जर दारिद्र्यरेषेवरच घुटमळत असेल तर, तो दोषही कर्त्यालाच चिकटायला हवा ना!
जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी लैंगिक शोषणाचा / उपद्रवाचा सामना करावा लागतो. अश्लील शेरे, स्पर्श, शीळ, कटाक्ष वगैरे गोष्टी तर नेहमीच्याच असतात. कदाचित त्यांना सामान्य असेही म्हणता येईल. आणि अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाही अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. अनेकदा पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात पदार्पण करताना स्त्रियांना त्याचा जास्तच उपद्रव होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हे एकाप्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे.
मला मायबोलीवर विचारायला नेहमीच आवडते, कारण सगळे छान मनापासून हवी असलेली माहिती देतात. आता पण मला थोडे मार्गदर्शन हवे आहे.
मी मेटलर्जी मधे बी.ई. केले, नंतर वेल्डिंग कंझुमेबल्स मधे एम्.ई केले. L&T मधे R&D Engineer म्हणून ३ वर्षे काम केलें. नंतर मग लग्न , मुलगी, अमेरिकेत येणे ह्याच्यामुळे काही वर्षे घरीच होती.आता हळूहळू मुलीची फुल टाईम शाळा सुरू होइल्,आता काहीतरी करावेसे वाटते आहे.पण कुठून सुरू करावे ते कळत नाही.
मी सुरवातीला परमाणू अभियंता म्हणून बिघडलेले संगणक दुरुस्त करायचे काम करायचो. ते काम की २ वर्ष केले. मग संगणक अभियंता म्हणून काम केले. आता दोन प्रोजेक्टवर काम करतो आहे. एकाचे project leadership करतो आहे तर दुसर्यामधे senior s/w develoeper म्हणून काम करतो आहे. हे मी इथे एक उदाहरण म्हणून सांगतो आहे म्हणून लिहिले जेणेकरुन मला माझा विषय नीट मांडता येईल. तर ना.. आत्ता माझ्या वेळेसचे सगळे .. बहुतेक सगळे मित्र कुठले ना कुठले मॅनेजर होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी software development life cycle च्या सगळ्या फेजेसमधून गेलो आहे. माझा आता SDLC वर काम करण्याचा कल कमी होतो आहे. पण नाईलाज!!!!
मित्रांनो, हल्ली बरेच जण PMP करत आहेत. करुन झाल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग झाला असे माझ्या पहाण्यात नाही आले. आजच्या स्पर्धेच्या युगात PMP चा किती उपयोग होतो? MBA केल्यानंतरही PMP करणारे आहेत. या विषयावर कृपया माहिती लिहा.
नमस्कार,
माझी डॉक्टर मैत्रिण( M.D.) भारतामध्ये गेले ४-५ वर्षांपासून काम/प्रॅक्टीस करत आहे. तिला अमेरिकेमध्ये येऊन काम करण्याची इच्छा आहे.
त्यासाठी काय करावे लागेल याची कोणाला माहिती आहे का? काही टेस्ट्स, परिक्षा असल्यास तिची द्यायची तयारी आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार
अमेरिकेत एमबीए करण्याविषयी मार्गदर्शनपर काही मुद्द्यांवर चर्चा/सूचना/अनुभव/मत अपेक्षित आहे.
मला एमबीए करण्याची इच्छा आहे. त्याबद्दल माहिती मिळ्वायला सुरुवात केल्यापासुन खुप गोष्टींबद्दल शंका/गोंधळ उडालाय.
१.पात्रता निकषः बर्याच टॉप युनिवेर्सिटीजमध्ये ३-५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. काही लोकल कॉलेज मध्ये त्याशिवायही अॅड्मिशन देतात. तेव्हा तेवढा अनुभव घेउनच एम्बीए करणे आवश्यक आहे का? (थोडक्यात चांगल्या ठिकाणाहुन काही काळाने की बर्या ठिकाणाहुन लगेच एम्बीए करावे?)
२. त्याच धर्तीवर नोकरी करता-करता पार्ट टाईम्/नोकरी न करता/असलेली सोडुन फुल टाईम?