एक जळाऊ पाककृती.

Submitted by इब्लिस on 6 March, 2012 - 13:36

कांदा कैरीचा कुस्करा असा एक चविष्ट प्रकार मी जस्ट खाऊन संपवला आहे.
तुम्हा सर्वांना जळवण्यासाठी खाली फोटू टाकीत आहे.
आज (म्हणजे १२ वाजून गेलेत म्हणून) होळी.
होळी पेटल्याशिवाय थंडी संपत नाही. पण तरीही मी 'कैरी' घालून केलेली पाकृ खाल्ली हे तुम्हा सग्ळ्यांना जळवण्यासाठी इब्लिसपणे पोस्ट करतो आहे:
2012-03-06 23.39.05.jpg
वरील फोटू मधे कांदा, कैरी व कोथिंबीर चिरून ठेवलेली दिसत आहे.

2012-03-06 23.39.43.jpg
सकाळच्या ४-५ पोळ्या घेऊन मिक्सरमधे फिरवून 'कुस्करा' तयार करून घेणे.

2012-03-06 23.41.37.jpg
त्यात, कांदा, कैरी, कोथिंबीर, तिखट मीठ व तेल इ. चवी प्रमाणे टाकून यथाशक्ती मिक्स करणे.

2012-03-06 23.43.46.jpg
वर हवे असल्यास एक लोणच्याची फोड ठेवून

चरण्यास सुरुवात करणे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जळलं लक्षणं मेल्याचं........ झक्कास रेसेपी
आम्ही या प्रकाराला "चटका" म्हणतो
यात कैरी नसल्यास ट्माटा टाकुन पण छान लागते. & उडिद पापड टाकला तर फारच छान.

छान.

माझ्याकडून आपल्या मायबोलीकराना....होळीच्या शुभेच्छा...
.......
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…

पुढील जळाऊ एपिसोडः
आमच्या झाडाचा पहिला आंबा- बदाम आहे. पण कलमांपैकी पहिला हाच आला.
amba.jpg
(गावठी आंब्याच्या एका झाडावर ५ वेगवेगळी कलमे आमच्या बंधूराजांनी केली आहेत. And i am proud to say, he has a 'green thumb')

नमस्कार.
@सखाराम गटणे
तुम्हाला मायबोलीवर येऊन चारच तास झालेत. आणि आल्याआल्या पहीला प्रतिसाद द्यायला, मायबोलीच्या ऐवढ्या लेखनातून तुम्ही हाच धागा का बरे निवडलात.:फिदी: कदाचीत स्वत:चा धागा, वर काढण्याचा उद्देश तर नव्हता ना तुमचा.:हाहा:

माझी माबोवरची पहिली पाकृ

या जेवायला.

उद्घाटनाची पाकृ झालेली आहे. जळाऊ म्हणजे शब्दशः घेतले असल्याने या बाफवर टाकलेले आहे. नाहीतर विचाराल काय संबंध ? Wink
फोटो शेजारच्या काका काकूंकडून ( खरपूस वासामुळे आलेले ) आले आहेत. मोबाईल आडवा तिडवा धरतांना अँगल चुकले असतील तर समजून घ्यावेत. मुलीने भरपूर मदत केली (लुडबूड हा शब्द बरा वाटत नाही ). बाबा स्वतः काहीतरी करतोय म्हटल्यावर तिलाही जोर आलाच.

barbecue3.jpgbarbecue1.jpgbarbecue_0.jpglatest barbecue.jpgbarbecue4.jpgbarbecue6.jpgbarbecue8.jpg

या पाकृसाठी मदत करणा-या भरत मयेकर, अल्पनातै, नी तै, दीमा , निनाद आणि सर्वांचे मनापासून आभार.

इब्लीसदा! हा असा बाजरीच्या शिळ्या भाकरीचा काला करायचा. आणि त्यात कैरीच्या लोणच्याचा खार + नागलीचा पापड चुरुन.... अहाहा!