करियर आफ्टर अ गॅप्..मदत हवी आहे

Submitted by sneha1 on 28 March, 2012 - 13:25

नमस्कार्..मला थोडी माहिती हवी आहे.

लग्न, मुलगी, अमेरिकेत येणे अशा अनेक कारणांमुळे माझ्या जॉब मधे चांगलीच गॅप पडली आहे. आणि आता EAD मिळाल्यामुळे पुन्हा सुरुवात करायची आहे. तर मला असे प्रश्न आहेत,
१. ही गॅप कव्हर लेटर मधे एक्स्प्लेन करावी की नाही?केल्यास कशी?
२. कव्हर लेटर लिहिण्यास मदत करणार्‍या साईट्स सुचवू शकेल का कोणी?

धन्यवाद..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहा,
कव्हर लेटरवर कारण कशाला द्यायचे?
खरंतर मुलाखतीत सुद्धा एका मर्यादेपलिकडे ते प्रश्न विचारू शकत नाहीत.
खोदून खोदून गॅप बद्दल विचारणे, एकेका महिन्याचा हिशेब लावणे गॅपचा हे फक्त भारतातच पाहिले मी.

Equal Opportunity Employer असतात ना तिकडे (निदान कागदोपत्री) मग ही माहिती द्यावी लागते का तरीही?

६ वर्षांच्या कालांतरानंतर नोकरी शोधण्याच्या स्वानुभवावरून सांगते, गॅपबद्दल कव्हरलेटरमधे लिहिण्याची गरज नाही. सहसा विचारत नाहीत, पण मुलाखतीत ६-७ वर्षांची गॅप का हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अमेरिकेत 'मूल आणि घर प्राधान्य' हे उत्तर अगदी ग्राह्य मानलं जातं. इतकं पर्सनल कारण सांगायची इच्छा नसल्यास 'प्रायॉरिटीज वेगळ्या होत्या' हे देखिल तितकंच बरोबर उत्तर आहे.

स्नेहा गॅप मोठी असली तरी, तू थोडेफार तुझ्या क्षेत्रातले कोर्सेस करून तुझे ७/८ वर्षातली गॅप भरून काढू शकतेस. युनिवर्सिटीमध्ये केलेस कोर्सेस तर त्यांच्या प्लेसमेंटमधून जॉबही मिळू शकेल.

मृण्मयी ,
नुसते मूल आणि घर, आणि शिवाय डिपेंडट व्हिसा...
धन्यवाद सगळ्यांना..
एक बरं आहे, इथे अगदी बेसिक ही विचारताना लाज वाटत नाही.

खरेतर गॅप असणे म्हणजे ती व्यक्ती कपेबल नव्हती म्हणुन जॉब मिळाला नाही असे होत नाही. पण मला वाटते दुर्दैवाने भारतात अजुन देखील असा निकोप दृष्टिकोन नसतो. असेल तर चांगलेच आहे.
त्यातल्या त्यात स्त्रियांच्या बाबतीत निदान समजुन घेत असावेत (उदा. नवर्‍याच्या नोकरीमुळे वेगळ्या शहरात, देशात जावे लागले, मुलाच्या/मुलीच्या जन्मामुळे घेतलेली गॅप, इ.)
पण जर एखाद्या पुरूषाच्या बाबतीत गॅप असेल तर मात्र कारणे जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न केला जातो. Sad

नाही. खरंच अडचण आली नाही. भारतातून इथे आल्यानंतरची पहिली नोकरी ४ वर्षांच्या गॅपनंतरची होती. H1B एक्झॉस्ट झाल्यावर H4वर जाऊन ग्रीनकार्डाची वाट बघण्यात दुसरी नोकरी ६ वर्षांनंतर. पण दोन्ही नोकर्‍या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या.

तुम्हाला संपर्कातून इमेल पाठवते.

भारत वा भारताबाहेर कुठेही "गॅप" का हा प्रश्ण चूकीचा नाही.. अगदी खोदून विचारले तरिही चुकीचा नाही. कारण आता पूर्वीसारखे नुसते डिगरी व अनुभव यावर भागत नाही.. कंपन्या आपण कुणामध्ये ईंव्हेस्ट करत आहोत हेही बघतात. प्रत्त्येक क्षेत्रातील या बाबतची गाळणी/निवड प्रक्रीया वेगळी असू शकते.
शेवटी जर खरच गॅप च्या मागचे कारण यात लपवण्यासारखे काहीच नसेल तर विचारले काय वा नाही काहीच फरक पडत नाही. ऊलट विचारले नाही तरी गॅप का घेतली हे स्वताहून सांगितले तरी बिघडत नाही.
अर्थात कुठे नेमके किती व काय बोलायचे हे शेवटी प्रत्त्येकाने वैयक्तीक ठरवावे.. आजकाल भारतात फेसबुक चा प्रोफाईल आयडी असलेही काही विचारतात असे ऐकून आहे.. आता ते चूक का बरोबर हा वादाचा विषय होवू शकतो.
असो.
शुभेच्छा...

To the best of my knowledge,
equal opportunity has nothing to do with the gap per say. Its legal provision against descrimination on any basis. "gap" does not come under the same. In fact even in West, I know many women employees who had lost jobs after extended maternitiy leave.. end of the day any company is in business to make money and that is the only reality!

स्नेहा , EAD मिळाले आहे त्याबद्दल अभिनंदन !
माझ्या एका मैत्रिणीची पण ७ वर्षांची gap होती ,मागच्या वर्षी पासून जॉब सुरु झालाय तिचा.तुला शुभेच्छा !
माझी पण ३ वर्षांची gap झाली आहे .आता जॉब शोधतेय त्यामुळे मलाही हि gap त्रास देतेच आहे.पण ह्या काळात मी मुलाच्या शाळेत जाणे,certification केले आणि तेच सांगते आहे सध्या!

स्नेहा,
काही फरक पडत नाही. Gap resume मध्ये लिहायची काही गरज नाही.
फक्त तु तुझ्या व्यवसायाच्या निगडीत असे छओटे course करुन ते तुझ्या resume वर लिही.
मी सुध्दा ६ वर्शानी परत नोकरी शोधायला केली होती. पण काही फरक पडला नाही. ३-४ महीन्यातच मला नोकरी मिळाली. मी मध्यला काळात MS केले आणि मुलाच्या जन्मानंतर १ वर्श त्याच्यासोबत घरी घालविले आणि मग नोकरी शोधली.

आतापर्यंत परदेशात अनेक मुलाखती दिल्या/घेतल्या आहेत आणि नोकरी देणार्‍याच्या भूमिकेतून लिहतो आहे.

१) गॅपबद्दल खूप बाऊ करण्याचे कारण नाही. मुलांच्या संगोपनासाठी किंवा वैयक्तिक कारणामुळे ही पूर्णपणे रास्त कारणे आहेत. Resume मधे स्पष्टीकरणही आवश्यक नाही. तो प्रश्न विचारला जाईलच. त्यात खोलात जायची गरज नाही पण मुद्दाम मुलाखतीत दडवण्याची गरज नाही.
२) जितक्या वर्षांची गॅप, तितक्या वर्षांचा अनुभव कमी धरला जाईल हे साधे गणीत लक्षात ठेवा. काही काही उमेदवारांना ते जड जाते. तुमच्या बरोबर शाळेतून बाहेर पडलेले आणि सलग अनुभव असलेले आणि तुम्ही यांची तुलना शक्य नाही पण काही जणांना ते पटत नाही आणि निराश होतात.
३) इतक्या वर्षांच्या गॅपनंतर तुमची कामाची सवय गेली आहे का? तुम्ही परत व्यावसायिक ग्रूपमधे मिळून काम करू शकाल का ही भिती जास्त करून नोकरी देणार्‍यांना असते. कारण तुमचे तुम्ही राजे/राणी असता Happy मी तुमच्या जागी असतो तर तातडीने कुठल्यातरी संस्थेत Volunteer म्हणून काम करायला लागेन. त्यामुळे मी पुन्हा काम करते आहे, एका टीमबरोबर काम करते आहे हे दाखवणे शक्य होईल. व्यावसायिक Referral गोळा करायला मदत होईन.
४) तुमच्या स्वतःच्या मनःस्वास्थ्यासाठीही असे Volunteer काम करणे आवश्यक होईल. रोज (किंवा जेंव्हा काम असेल तेंव्हा) नियमीत कामाला जायची सवय होईल, जाण्या येण्यातल्या, मुलांना संभाळायला ठेवायच्या अडचणी समजतील.

गॅप शक्यतो डायरेक्ट विचारत नाहीत पण तुमचं कार्यक्षेत्र माहित नाही...त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॅज्युअली त्यावर भाष्य करू शकता..जसं तुमच्याबद्दल सांगा या प्रश्नात थोडक्यात सांगितलं तर चालेल...आणि ज्याला आपण नकारार्थी म्हणतो तो टोन येऊच द्यायचा नाही..
उदा. मी नोकरी केली नाही पेक्षा मी गेली काही वर्षे माझ्या घरच्यांना प्राधान्य दिले..

अवांतर - या सात वर्षांच्या काळात तुम्ही जर काही वॉलेंटियर काम, मराठी मंडळ इ.इ. केलं असेल तर त्याचाही उल्लेख काम केलं असा होऊ शकतो...
निदान अमेरीकेत तरी गॅपचा इतका बाउ केला जात नाही त्यामुळे जास्त काळजी करू नका...शुभेच्छा....

Volunteer म्हणून काम करायला लागेन. त्यामुळे मी पुन्हा काम करते आहे, एका टीमबरोबर काम करते आहे हे दाखवणे शक्य होईल. व्यावसायिक Referral गोळा करायला मदत होईन.>>
अजय आपली पोस्ट आवडली .
अमेरिकेत लायब्ररी व्यतिरिक्त कुठे volunteer काम करता येईल .कोणाला साईट्स माहिती असल्यास कळवावे .IT मध्ये पण volunteer चे काम करता येते का?h4 वर इंटर्न चे काम करता येत नाही हे एका ठिकाणी तपास केल्याने समजले.

लग्न, मुल, ट्रान्सफर ईत्यादी कारणे गॅपसाठी योग्य आहेत. नविन जॉबसाठी शुभेच्छा

पण जर एखाद्या पुरूषाच्या बाबतीत गॅप असेल तर मात्र कारणे जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न केला जातो ITs true!

अजय +१००.

डु आय,
एक व्यावसायिक म्हणून मला ये अयोग्य वाटते. एकवेळ विचारणे ठिक आणि ते सुद्धा योग्य प्रकारे विचारले तरच.
गॅप म्हणजे काही गुन्हा नव्हे. शेरलॉकहोम्स असल्यागत काढुन घेणे याला आपल्याक्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकं लपवाछपवीही फार करतात हेही कारण असू शकेल. आमच्या पैल्या नोकरीत शेरलॉकहोम्स असण्याला फार महत्त्व होते. वर्षभर तेच ड्रिल करुन घ्यायचे. भयाण. Sad

उमेदवारासाठीही सरळ पण नेमकं सांगणे केव्हाही चांगले. गॅप झाली- वैयक्तिक कारणे. किंवा मंदीमुळे नोकरी गेली. संपले. पण एकुणच आशियायी देशात जन्मकुंडली विचारायची पद्धत जाणवली. आपल्या इथे तर धरबंधच नसतो. किती मुलं, मुलांचे वय काय, नवरा काय करतो पासुन काहीही विचारतात.
जपान,चीन,हाँगकाँग, कोरिया इथेही बरेच खाजगी प्रश्न विचारतात.
मुलाखतीत आपणहून भरभरून खाजगी माहिती देणे ही भारतीय सवय. किती नाही म्हणले तरी आपोआप होते.

महेश- हो पुरुषांच्या बाबतीत गॅप म्हणजे अजूनच खोदून विचारतात आपल्याकडे. 'घरी बसून अंगण झाडले' असे बाणेदार उत्तर आले पाहिजे खरंतर.

अजय, छान पोस्ट

आजकाल भारतात फेसबुक चा प्रोफाईल आयडी असलेही काही विचारतात असे ऐकून आहे.. >>>>>>>> हो फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर इ. आहे का विचारतात.. त्यावर तुम्ही किती अ‍ॅक्टिव्ह असता हे देखील विचारतात.. हे प्रश्न मला पण विचारले गेले होते.. त्यामागची कारणं कळली नाहीत. पण बहुधा तुम्ही दिवसाचा किती वेळ सोशल नेट्वर्किंग साईट्स वर घालवता, ऑफिस जॉइन केल्यावर मग तुम्ही त्यात जास्त वेळ घालवाल का, किंवा तुमचा सोशल अवेअरनेस इ. जाणुन घ्यायची इच्छा असावी.. नशीब त्यांना माय्बोली माहित नाहिये Wink

पण गॅप ची खरी कारणं सांगितलेलं कुठे ना कुठे अ‍ॅप्रेशिअट केलं जात असावं... फक्त जॉब मिळत नव्हता म्हणुन केला नाही हे कारण सांगतानाही त्या वेळात बाकी काय काय करुन आपण आपलं कॅलिबर वाढवलं आहे हे सांगितलं तर सकारात्मक प्रभाव पडतो...

स्नेहा शुभेच्छा Happy

आजकाल भारतात फेसबुक चा प्रोफाईल आयडी असलेही काही विचारतात असे ऐकून आहे.. >>
अरे हो. भारतात प्रोफाईल आयडी हेरगीरी करायला विचारतात. सॉर्ट ऑफ इनफॉर्मल बॅकग्राऊंडचेक.
आता लोकं फेक प्रोफाईलही तयार करु शकतातच. पण अनुभवाने त्या ओळखता येतात (म्हणे).
दुसरे,उमेदवार कितपत भसाभस माहिती देतात अशा सोशल साईटस वरुन त्यावरुनही बराच उहापोह होतो. तो कधीतरी उमेदवाराच्या विरुद्धही जाऊ शकतो. कारण तारतम्य नसणारी बडबड असली तर.
लोकांना काय, किती माहिती द्यावी, किती फाडफाड बोलावे याचा पोच रहात नाही.
सगळी धुणी तिथे दिसतातच.
माझा आयडी म्हणजे 'मी' नाही हे लॉजिक वादासाठी argue करायला सुद्धा, तुम्हाला त्यांनी विचारले तर पाहीजे.

मी हे उमेदवार निवडताना कधीही केलेले नाहीये, पण माझे सहकारी करतात बर्‍याचदा. त्यांच्यामते it works.

गॅपचा उहापोह , IT मध्ये केला जातो इथे सुद्धा थोडाफार. निदान पहिल्या स्क्रीनिंग मध्ये सिलेक्ट होताना जर लेटेस्ट अनुभव असेल तर जास्त प्रेफर केल जात अस माझ ऑब्झर्वेशन आहे.

गॅप म्हणजे गुन्हा नाही हे खरे आहे पण माझा अनुभव ही थोडा असाच आहे, माझ्या लग्नामुळे माझ्या ही करीयर मधे सधारण १ वर्षाचा गॅप झाला होता, इत्का कमी गॅप असुनही नवीन ठिकाणे नोकरी देताना मला २ ठिकाणी तो जस्टीफाय करावा लागला प्लस जिथे नोकरी मिळाली तिथेही अगदीच नॉमिनल इंक्रिमेंट दिले, Sad पण निदान तो जॉब करत आहे हे दाखवुन दुसरा जॉब करता येईल म्हणुन मी तो अ‍ॅक्सेप्ट केला होता.

>अमेरिकेत लायब्ररी व्यतिरिक्त कुठे volunteer काम करता येईल .कोणाला साईट्स माहिती असल्यास कळवावे .IT मध्ये पण volunteer चे काम करता येते का?

तुम्ही कुठल्याही ओपन सोर्स सॉफ्टवेअरला मदत करू शकता. आणि त्याचा तुमच्या क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो. Generalization धोका पत्करून सांगतो. बहुतेक भारतीय व्यक्तीं "पैसे मिळत नाहित तर कशाला काम करायचे" अशा कोषात असतात. आणि चांगला अनुभव मिळवायची, नेटवर्कींग करण्याची संधी घालवून बसतात. माझ्या एका मित्राची पत्नी भारतात QA चे काम करायची. अमेरिकेत आल्यावर माझा कसा वेळ वाया चाललाय म्हणून कुरकुरायची. तिला Java चा अनुभव नव्हता. तेंव्हा Java नवीन होते आणि त्याचे काम स्वयंसेवक म्हणून सहज मिळण्यासारखे होते. पण ओपन सोर्सला मदत ? छे छे, फुकट काम नाही करणार. नंतर बर्‍याच वर्षांनी स्वतःच्या खिशातले भरपूर पैसे घालून कुठुनतरी जावा शिकली. पण तेंव्हा जावातला अनुभव नाही म्हणून पुन्हा तेच रडगाणे सुरु. तो अनुभव तिला १०-१२ वर्षांपूर्वीच मिळणे शक्य असूनही घेतला नव्हता. इतर सगळ्या क्षेत्रात हे शक्य नाही. पण IT क्षेत्रात लाखो ओपन सोर्स प्रोजेक्ट असताना सुद्धा मी काय करू असा प्रश्न का पडावा? का ओपन सोर्स ही संकल्पनाच माहिती नाही?

जाता जाता: मी काही ओपन सोर्स प्रोजेक्टवर मदत करतो (जसे जमेल तसे). अचानक एके दिवशी O'Reilly या जगप्रसिद्ध प्रकाशकांकडून, आकाशातून आल्यासारखी विचारणा आली. त्याच ओपन सोर्स प्रोजेक्टवर पुस्तक लिहणार का? मला काही कारणाने शक्य नव्हते. पण मी काही अपेक्षा न करता, दुसरा कुणी लिहणार असेल तर तपासून देईन असे सांगितले. आज त्या पुस्तकावर Technical Reviewer म्हणून माझे नाव आहे. कुठेही मुलाखत देताना ते पुस्तक बरोबर घेऊन जातो आणि त्याचा जो फायदा होतो तो मी पैसे मागून घेतले असते तरी मिळाला नसता.

अजय, उत्तम पोस्ट.
मुलाखतीत लग्न झालेय का ? असे विचारणे पण बेकायदेशीर आहे असे परवाच
याहू वर वाचले.
पण भारतात मात्र चौकशी केली जातेच. त्याला खुबीने उत्तरे द्यावी लागतात.
उमेदवार हा स्थिर मनोवृत्तीचा आहे का चंचल स्वभावाचा आहे. तो मिळून मिसळून
वागणारा आहे का ? याबद्दलचे अंदाज करण्याचा प्रयत्न केला जातो.
शिवाय भारतात नोकर्‍या कमी आणि अर्जदार जास्त, अशी परिस्थिती नेहमीच असते.

पुन्हा अजय+१.
मराठी बाणा आहे तो. एक वेळ घरी बसेन पण.. अमुक तमुक करणार नाही.
त्यात थोडेफार चांगले आहे तसेच वाईटही बरेच आहे. एका दृष्टीने तत्त्वनिष्ठा म्हणता येईल आणि एका दृष्टीने अलवचिकता. प्रत्येकाला या दोहोत समन्वय साधावासा वाटतो आणि प्रत्येक निर्णयाची प्राईसटॅग असते. न करण्याची काही किंमत नाही असे वाटते, पण हीच तर सर्वात मोठी किंमत असते.

करियरनिवडीत, पुढील नोकरी निवडीत खालील घटक समाविष्ट होतात
१) Role. काय प्रकारचे काम आहे ते
२) करियर पाथ- पुढे जायला किती वाव आहे
३) ब्रॅण्ड- ज्या ब्रॅण्डशी आपण संलग्न आहोत त्या ब्रॅण्डचे मोल काय.
४) पगार- आपल्या कामाचा मोबदला
५)जाण्यायेण्याचा वेळ, रहदार
६) वर्कलाईफ बॅलन्स
७) उर्मी/पॅशन/आवड/समाधान Follow your bliss वगैरे
८) स्किल गॅप अर्थात पुढील आयुष्यासाठी / रोल साठी तजवीज अर्थात 'प्रत्येक चिंधीने मला खूप काही दिले' (पुलं)

याचा आपल्या आयुष्यातला प्राधान्यक्रम आणि महत्त्व वेटेज बदलत राहतो कायम. कुठेतरी जास्त, कुठेतरी कमी असे स्कोरिंग येऊ शकते.
पगार कमी असेल, पण आत्ता आपल्यासाठी महत्त्वाचे काय? याचा विचार आपसूक होतोच, व्हावा.
आणि हे गणिती गुणाकार/भागाकार नाही. एखाद्यासाठी ५ किंवा ७ हा सर्वात मोठा घटक असू शकतो.

दुसरे मला कळत नाही ते म्हणजे आत्ता मला याचा हा खर्च आला. काहीही फायदा नाही.
हेच जर स्केलेबल झाले, अशा हजारो गोष्टी जर तयार झाल्या तर ? ब्रेक इव्हन पॉईट हा फक्त आर्थिक नसून मानसिकही असतो ना.
हे म्हणजे आज मी १००० पावलं चालले, तर माझे वजन आजच्या आज _ कमी झाले पाहिजे असे.
काळाचा घटक, नित्यनेमाचा घटक धरलाच नाही ना पण... सो गणित चुकलं.

बरं ठिकाय चुकलं. आता पुढे?
दुसरं काहीतरी करुन पाहु.
असे कुठवर करणार?
मार्ग सापडेपर्यंत..
मार्ग सापडलाच नाही तर? हे मी उद्या अ‍ॅक्सिडेंटमध्ये मेले तर याचीच प्रॉबेबिलिटी आहे ना. होऊ शकतेच असे. आयुष्याचा भरवसा कुणी दिला आहे.

मी आत्तापर्यन्त २ दा break घेतला आहे. पहिल्यांदा १ वर्षाचा आणि दुसर्र्यांदा २ वर्षाचा. दोन्ही वेळा मला पुन्हा job मिळायला वेळ लागला नाही. मी माझ्या resume मधे gap दाखवली होती. break नंतर interview देताना हा प्रश्न विचारला होता कि इतके दिवस काय केले म्हणुन पण तुम्ही आत्मविश्वासाने उत्तर दिलेत तर त्यांना ते पटते. मुख्य म्हणजे तुम्हाला जर break घेतल्याबद्दल आत्मविश्वास असेल तर फारसा प्रश्न येत नाही.

Pages