नोकरी-व्यवसाय

प्रोफेशनल नेटवर्किंग-एक गरज

Submitted by आशूडी on 10 February, 2012 - 04:57

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रोफेशनल नेटवर्किंग करणं बर्‍याचदा आवश्यक होऊन बसतं. तुमच्या नोकरी - व्यवसायातल्या समस्या, प्रश्न यावर उपाय शोधण्याचं ते एक माध्यम बनतं. मग ते ऑनलाईन असो वा ऑफलाईन. मायबोलीवर 'मराठी उद्योजक' गृप अशाच जाणीवेतून सुरु झाला.
तुम्हाला हे खरंच आवश्यक वाटतं का? त्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला? तुम्ही तुमचे 'कॉन्टॅक्ट्स' कसे बनवता, सांभाळता, वाढवता? एकमेकांच्या मदतीने नवीन नेटवर्किंगचे तंत्र आणि मंत्र शिकूया. Happy

तुम्ही लिहा मी वाचतो : माझा नवा धंदा

Submitted by असो on 29 January, 2012 - 05:18

सध्या ब-याच संस्थळांवर बरेच जण बरंच काही लिहीत आहेत. बरेच हा शब्द मागे पडून बहुतेक हा शब्द देखील मागे पडतोय आणि जवळजवळ सर्वच असा नवाच शब्दप्रयोग रूढ होऊ पाहतोय. पूर्वी कसं मोजकेच लोक लिहायचे. इतरांना त्यांचं अप्रूप असायचं. ते देवलोकातून आले असावेत असं लोकांना वाटायचं. काही जण तर त्यांना हात लावून पहात असत. आता मात्र सगळेच लिहू लागल्याने लिहीणे म्हणजे विशेष काय ते असं वाटू लागलं आहे. उलट जे कुणी लिहीत नाहीत त्यांच्याबद्दल हल्ली अप्रूप वाटतं. न लिहीता हा मनुष्य कसा काय राहू शकतो असं वाटून लोक त्यांना हात लावून पाहताना दिसतात.

रंगबीरंगी दुनिया : पोशाख भाड्याने देण्याचा व्यवसाय : श्रीमती प्रेरणा जामदार (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 18 January, 2012 - 03:10

आयुष्यात वेगळे काहीतरी करावे, आपले छंद जोपासताना त्याबरोबरच अर्थार्जनही करावे आणि नव्या वाटा चोखाळताना त्यात आपल्या कुटुंबियांची सर्वार्थाने साथ मिळावी अशी आकांक्षा अनेक स्त्रियांच्या मनात असणे सहज शक्य आहे. परंतु सर्वांनाच ते साधते असे नाही. वयाची चाळीशी उलटल्यावरही आपण काही करू शकतो, त्यातून व्यावसायिक यशासोबत इतरही बरेच काही कमावू शकतो ह्याची कल्पनाच अनेकींना नसते. सांसारिक जबाबदार्‍या सांभाळून आपल्या छंदाला एका वेगळ्या प्रकारच्या व्यवसायाचे स्वरूप देणार्‍या नागपूर येथील प्रेरणाताईंनी आपली कल्पना प्रत्यक्षात आणून ते साध्य केले.

श्रीमती वीणा कुलकर्णी : फळप्रक्रिया (कॅनिंग) व्यवसाय (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 14 December, 2011 - 04:12

कॅनिंग किंवा फळप्रक्रिया म्हटले की प्रथम नजरेसमोर येतात ते हवाबंद डबे. एखादा अन्नपदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून हवाबंद डब्यात सील करून जास्तीत जास्त टिकविण्याच्या पद्धतीला कॅनिंग असे म्हटले जाते. फळांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांपासून सॉस, सरबते, पावडरी इत्यादी टिकाऊ प्रकारांत त्यांचे रुपांतर करण्याचा व्यवसाय हा जसा घाऊक प्रमाणात चालतो तसाच तो घरगुती स्वरुपातही करता येतो.

शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?

Submitted by जागोमोहनप्यारे on 17 July, 2011 - 06:40

शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?

ट्रेडिंग करताना आपल्याला स्वतःहून स्क्रिप्स निवडणे काही वेळेला शक्य नसते, इंटरनेट्वर बर्‍याच जाहिराती दिसतात जे एस एम एस द्वारे टिप्स देण्याचा उद्योग करतात.. अशा टिप्स किती भरवश्याच्या असतात? कुणाला चांगल्या टिप्स देनारा माहीत आहे का? बहुताम्शी वेलेला हे लोक इन्ट्रा डे आणि एफ एन ओ मधील टिप्स देतात.. स्पेशल निफ्टीसाठीही काही जणाम्ची सोय असते. असा काही कुणाला अनुभव आहे का? खास करुन वॅल्यु नोट्स डॉट कॉमवर बर्‍याच जाहिराती दिसतात.. काही ब्रोकरही अशी सुविधा पुरवतात.. त्यांचा कुणाला अनुभव आहे का?

डेटा मायनिंग म्हणजे काय?

Submitted by जागोमोहनप्यारे on 5 July, 2011 - 03:06

डेटा मायनिंग म्हणजे काय?

घरबसल्या ऑन लाईन डेटा मायनिंगचे काम करा अशा जाहिराती दिसतात. हे नेमके कसले काम असते?

Quality Six Sigma Yellow Belt Certification आणि career in Quality बद्दल माहिती हवी आहे

Submitted by निंबुडा on 7 June, 2011 - 08:27

कुणी Quality Six Sigma Yellow Belt Certification केले असल्यास त्याबद्दलची माहिती शेअर करणार का? अभ्यासासाठी रेफेरन्स बूक्स, Certification चा फायदा काय?, exam pattern काय असतो?, Certification च्या लेव्हल्स काय आहेत (Yellow Belt च्या पुढे?) इ.

टेक्निकल साईड सोडून Quality साईडला मूव्ह व्हावे काय असा विचार सध्या मनात रुंजी घालत आहे. तेव्हा कुणी software company मध्ये Quality front वर काम करत असल्यास करीयर पाथ विषयी माहिती देऊ शकेल काय?

ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जॉब

Submitted by जागोमोहनप्यारे on 2 June, 2011 - 01:26

ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जॉब

सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग शिकलं तर ऑन लाईन जॉब मिळू शकतात का? मध्ये मी एक अशी वेब साइट पाहिली होती. तिच्यावर घेतलेलं काम काही दिवसात पूर्ण करुन द्यायला लागायचं.

ज्याला प्रॉग्रॅमिंग माहीत नाही, त्याने शिकताना कसे आणि काय शिकावे?

Any place for OPD in Wada Taluka?

Submitted by जागोमोहनप्यारे on 17 March, 2011 - 10:27

Can anybody suggest a place for a small OPD in Wada taluka, in dist Thane? My friend wants to start a small OPD in a rural area. The place should be a small and one with a natural beauty.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नोकरी-व्यवसाय