तंत्रज्ञान

आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट

Submitted by शैलजा on 7 December, 2012 - 04:16

मायबोलीवर आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट सपोर्टमध्ये काम करणारे कोणी आहेत का?

युरेका फोर्ब्सची ग्राहकहितविरोधी भूमिका

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 26 November, 2012 - 03:52

डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड या धुळे जिल्ह्यातील अवधान एमआयडीसी स्थित नामांकित उद्योग संस्थेने आपल्या कर्मचार्यांकना स्वच्छ व शुद्ध पेयजल मिळावे या करिता युरेका फोर्ब्ज या पुणे स्थित कंपनीकडे विचारणा केली असता युरेका फोर्ब्ज तर्फे श्री. पियूष अरोंडेकर यांचेकडून दिनांक १४.०८.२०१२ रोजी अ‍ॅक्वागार्ड आर ओ (रिवर्स ओस्मोसिस) प्युरिफायर कम कुलर चा प्रस्ताव देण्यात आला.

शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले यांना ' इन्फोसिस ' पारितोषिक - अभिनंदन

Submitted by mansmi18 on 24 November, 2012 - 10:13

शास्त्रज्ञ आशिष लेले यांना ' इन्फोसिस ' पारितोषिक
' पॉलिमर सायन्स ' मधील संशोधनासाठी गौरव
म . टा . प्रतिनिधी , पुणे

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील ( एनसीएल ) शास्त्रज्ञ डॉ . आशिष लेले यांना संशोधन क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले गेलेले इन्फोसिस पारितोषिक जाहीर झाले आहे . सुवर्णपदक आणि पन्नास लाख रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे . येत्या ३ जानेवारीस दिल्लीत त्यांना ते समारंभपूर्वक दिले जाईल .

विदेशी फोन नंबर बाबत

Submitted by Mandar Katre on 11 November, 2012 - 07:02

मध्यंतरी सरकारने + २४३, +१२०......,unknown numbers ,blank calls ना प्रत्युत्तर देवू नये ,किंवा ते फोन रिसीव्ह करू नयेत ,असे जाहीर आवाहन केलेले होते. पण यात मेख अशी आहे कि, ज्यांचे आप्त ,नातेवाईक,मित्र परदेशी व विशेषत: गल्फ मध्ये असतात ,अशा लोकांना वर उल्लेख केल्या सारख्या नंबर वरून सतत फोन येतात कारण ते परदेशी असलेले नातेवाईक voip सेवा वापरून call करत असतात . voip call करताना भारतातल्या फोन नंबरवर विचित्र नंबर येणे अगदी स्वाभाविक आहे .

काही परदेशी कंपन्यासुद्धा voip चा वापर करून telephonic interview घेतात .

खोटी/ फेक/ भाकड, hoax विपत्रे, समस, दुवे इ.

Submitted by निंबुडा on 9 November, 2012 - 04:17

कॉर्पोरेट क्षेत्रात नव्यानेच आल्यानंतर इंटरनेट ची कायमवेळ सुविधा (अर्थात सोशल नेटवर्किंग साईट्स वगळून) आणि नवनवीन मेल्स ह्यांचे प्रचंड आकर्षण/ कुतूहल वाटत असे. आपल्याला आलेले प्रत्येक ढकलपत्र (forwarded email) आपल्या असंख्य मित्र-मैत्रिणींना त्याच पद्धतीने पुढे पाठविण्यात फार धन्यता वाटत असे.

शब्दखुणा: 

डेटा वेअरहाऊसिंग

Submitted by रीया on 4 November, 2012 - 06:01

मला डेटावेअरहाऊसिंगबद्दल माहिती हवी आहे. अगदी बेसिक पासून सर्वच!
नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे, कोणती पुस्तके, वेबसाईट्स रेफेर करावी ईत्यादी.
नव्या प्रोजेक्ट मध्ये डेटावेअरहाऊसिंगवर काम असून माझं या बाबत ज्ञान अगदी शुन्य आहे.
काही कारणांमुळे हा प्रोजेक्ट टाळता येणार नाही.
प्लिज गाईड करा

सुरक्षीत ड्रायव्हिंग व कार्स संबंधी इतर गोष्टी

Submitted by इब्लिस on 3 November, 2012 - 03:05

साजिरा यांच्या कोणती गाडी घ्यावी या धाग्यावर भुंगा यांनी त्यांना झालेल्या अपघाता विषयी लिहिले. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत सेफ्टी फीचर्स व सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात मी खालील पोस्ट टाकली होती.

***
इब्लिस | 2 November, 2012 - 18:50
>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<

आर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अ‍ॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.

यानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.

LED आणि LFD मध्ये काय फरक आहे?

Submitted by मी अमि on 1 November, 2012 - 01:33

LED आणि LFD मध्ये काय फरक असतो? LFD ला सेट टोप बॉक्स जोडून टिव्ही दिसू शकतो का?

उद्योजक आपल्या भेटीला - समीर करंडे

Submitted by साजिरा on 23 October, 2012 - 01:46

mSauda (एम-सौदा) हे इंटरनेटवर खरेदी-विक्रीच्या उलाढालीसाठीचं (ई-कॉमर्स) आणि ग्राहकांना एकत्र येण्यासाठी बनवलं गेलेलं व्यासपीठ- असं म्हणता येईल. समीर करंडे हे mSauda चे सह-संस्थापक. समीर यांना जवळजवळ १६ वर्षांचा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासोबत काम करण्याचा अनुभव आहे. सुरुवातीला 'पर्सिस्टंट सिस्टिम्स'ची 'टेलेकॉम बिझिनेस' शाखा सांभाळत होते, ज्यात संपूर्ण जगभरातून जवळजवळ १००० लोक काम करत होते. यानंतर त्यांनी 'मोबाईल आणि वायरलेस बिझिनेस युनिट'ही सांभाळून त्याची उलाढाल अनेक पटींनी वाढवली. MobiPrimo या कंपनीचेही संस्थापक तेच होते.

सेट टॉप बॉक्स

Submitted by मी अमि on 4 October, 2012 - 03:27

सेट टॉप बॉक्स सरकारने बंधनकारक केला आहे. आता आम्ही केबल वापरत आहोत. तर हा बॉक्स केबल ऑपरेटर कडूनच घ्यावा लागेल की तो बाहेरही विकत मिळतो. कोणत्या कंपनीचा सेट टॉप बॉक्स चांगला आहे?

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - तंत्रज्ञान