खोटी/ फेक/ भाकड, hoax विपत्रे, समस, दुवे इ.

Submitted by निंबुडा on 9 November, 2012 - 04:17

कॉर्पोरेट क्षेत्रात नव्यानेच आल्यानंतर इंटरनेट ची कायमवेळ सुविधा (अर्थात सोशल नेटवर्किंग साईट्स वगळून) आणि नवनवीन मेल्स ह्यांचे प्रचंड आकर्षण/ कुतूहल वाटत असे. आपल्याला आलेले प्रत्येक ढकलपत्र (forwarded email) आपल्या असंख्य मित्र-मैत्रिणींना त्याच पद्धतीने पुढे पाठविण्यात फार धन्यता वाटत असे.

कामाच्या क्षेत्रात बराच काळ स्थिरावल्यानंतर लक्षात आले की तेव्हा आपल्याला नवीन/ फ्रेश वाटणारी जी विपत्रे आपण अशी पुढे ढकलत होतो, तीच आपल्या ज्युनियर्स कडून पुन्हा नव्याने आपल्याला मिळत आहेत. उदा. नॅशनल गीओग्राफिक चॅनेल ने अमुक एका वर्षी बेस्ट ठरविलेले वाईल्ड लाईफ ह्या विषयावरील फोटो हा मेल जवळपास प्रत्येक वर्षी सब्जेक्ट लाईन मधील फक्त साल बदलून नव्याने येतो. Proud आता तर संबंधित मेल करणार्या/री ला उलट टपाली उत्तर देणाचाही ही कंटाळा केला जातो की "जुना झाला हा मेल आता!" किंवा "शिळी झाली ही बातमी आता!"

तीच गत अजून अनेक प्रकारच्या मेल्स ची उदा:
१) एक मेल असा आहे की ज्यात नवर्‍याच्या, बाळाच्या इ. ऑपरेशन साठी मदत म्हणून अमुक एक संस्था आर्थिक मदत करणार असल्याचा उल्लेख केलेला असतो. आणि हा मेल जमेल तितक्यांना फॉरवर्ड करा म्हणून कळकळीची विनंती केली असते. हॉस्पिटलच्या शय्येवरील बाळाचा/ संबंधित व्यक्तीचा हृदयद्रावक फोटो वगैरे सोबत दिलेला असतो. बर्‍याच जणांना वाटते की आपल्या पाकिटातले काही जातेय का? मग काय हरकत आहे, हा मेल नुसता फॉरवर्ड करायला? असे लोक मग भारंभार लोकांना तो इ-मेल फॉर्वर्ड करतात. (बरेच जण तर सर्व मेल आयडीज् ना मेलच्या बीसीसी (bcc) टाकण्याचीही दक्षता घेत नाहीत. Sad ). मग एकाने तरी "रीप्लाय ऑल" केले तरी संवादाचा, प्रश्नोत्तरांचा अखंड ओघ चालू होतो - कुणीतरी एका-दोघांनी सांगेस्तोवर की "रीप्लाय ऑल" करू नका किंवा निदान "मला ह्यातून वगळा"!

२) दुसरा एक मेल/समस असतो ज्यात अमुक मेल अमुक इतक्या लोकांना किंवा त्या पेक्षा जास्त लोकांना पाठविला की अमुक दिवसांत अमुक लाभ निश्चितपणे होणार ह्याची हमी दिलेली असते. न केल्यास वाईट घडेल म्हणून धमकी दिलेली असते. अगदी मॅनेजर लेव्हलच्या लोकांनाही हे असले मेल्स/ समस फॉरवर्ड करताना मी अनुभवले आहे. Sad इतक्या भाकडकथांवर आपण कसा विश्वास ठेवू शकतो?

३) अजून एका प्रकारात प्रमुख बँक्स च्या नावाने फेक साईट्स बनवून त्या द्वारे मेल पाठवून पर्सनल माहिती मागवलेली असते.

४) कुरकुरे, मॅगी ह्या व इतर कित्येक प्रकारच्या प्रॉडकट्स मध्ये घातक घटक असल्याचा दावा करणारे मेल्स, भारतातील बरीचशी औषधे अमेरिकेने बॅन ठरवलेली आहेत तरी भारतात वापरली जात आहेत, अशा अर्थाचे मेल्स अशा कितीतरी मेल्स च्या बाबतीत खरे-खोटे ठरविणेही अवघड होऊन बसते.

५) एका मेल मध्ये तर चक्क र्‍हीस व्हिदरस्पूओन ह्या हॉलिवूडच्या नटीचे फोटो देऊन हे सोनिया गांधीचे तरुणपणाचे फोटो आहेत अशी चक्क भलामण करण्यात आली होती. आता बोला! :फीदी:

६) एका मेल मध्ये एका प्रसिद्ध लॅपटॉपच्या कंपनी चे नाव देऊन त्यांची एक ऑनलाईन स्कीम चालू असल्याचे लिहिलेले असते. व हा मेल जितके लोक अमुक इतक्या संख्येला फॉरवर्ड करतील तितक्यांना लकी ड्रॉ साठी कंसिडर केले जाईल व लकी ड्रॉ लागला तर फ्री मध्ये लॅपटॉप मिळेल अशा थापा मारलेल्या असतात. बरं अश्या मेल्स मध्ये त्या व्यक्तीचे काही डीटेल्स (पत्ता, फोन नंबर इ.) काहीच मागितलेले नसते किंवा संबंधित कंपनीचे चे ही काही डीटेल्स दिलेले नसतात. नुसतेच आपले "मेल फॉरवर्ड करा" ही विनंती!

वर नमूद केलेल्या १ नं च्या प्रकारचा एका स्त्रीच्या नावाने पाठविलेला मेल मला गेली ८ वर्षे नित्यनेमाने वेगवेगळ्या व्यक्तींकडून मिळालेला आहे. अजून ही स्त्री ऑपरेशन साठी पैसेच गोळा करत बसली आहे? Uhoh तोच प्रकार नं. ६ मध्ये नमूद केलेल्या मेलचाही. त्या अमुक लॅपटॉप च्या कंपनीची तीच स्कीम अजूनही चालू आहे?

इथे एक मजेदार किस्सा आठवतोय. ट्रेन मध्ये २ स्त्रियांचा संवाद चालू होता. माझ्याच वयाच्या असाव्यात! त्यातली एक दुसरीला सांगत होती की नं. ६ च्या प्रकारचा एक मेल तिला आला आहे व अमुक एका कंपनीची अशी स्कीम चालू आहे. लकी ड्रॉ मध्ये आपला नंबर लागला तर फ्री मध्ये लॅपटॉप लागेल! दुसरी स्त्री ही कमालीची खुश व आश्चर्यचकित होऊन ऐकत होती व 'मलाही तो मेल फॉरवर्ड कर' म्हणून तिने २-३ दा पहिलीला सांगितले. मी न राहवून त्यांच्या संभाषणामध्ये भाग घेतला आणि विनंती केली की कृपया असले फेक मेल्स पुढे पाठवू नका. मी त्यांना पुढील प्रश्न विचारले -

१. त्या अमुक एका कंपनीला कसे कळणार आहे की अमुक इतक्या व्यक्तींकडे हा मेल फॉरवर्ड करण्यात आलेला आहे?

२. तुम्हाला आलेल्या मूळ मेल मध्ये त्या कंपनीच्या वेब साईटचा उल्लेख किंवा कुणा कंपनीच्या कुणा रीप्रेझेन्टेटिव्ह चा संपर्क क्रमांक इ. नमूद केले होते का? की जेणेकरून ह्या स्कीम ची/ बातमीची शहानिशा करून घेता येईल? किंवा निदान असा एखादा मेल आयडी की जो तुम्ही असले मेल्स फॉरवर्ड करताना सीसी (cc) मध्ये ठेवण्याची विनंती केलेली असते की जेणेकरून किती वेळा व कुणाकुणाकडून तो मेल फॉरवर्ड झाला ह्याचा ट्रॅक त्या कंपनीला ठेवता येईल?

३. जर एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या मेल्स आयडीने वेगवेगळ्या लोकांना तोच मेल फॉरवर्ड केला तर त्या व्यक्तीला तितक्यांदा ग्राह्य धरणार का तुमची ही तथाकथित कंपनी?

तर ह्यावर त्यांच्याकडे काहीही उत्तरे नव्हती. पहिल्या स्त्रीने "हे सर्व मी काही वाचले नाही. मला मेल आला. स्कीम बघून मी लगेच फॉरवर्ड केला. फुकट कुणी काही देणार असेल, तर नुसते एका क्लिक ने फॉरवर्ड करायला काय प्रॉब्लेम आहे?" असे उत्तर दिले. नंतर दोघी आपापसांत हळू आवाजात खुसपुसत होत्या व एकंदरीत "कुणाला फुकट काही मिळण्याची शक्यता दिसली की काही जणांच्या पोटात दुखते!" अशा आशयाचा त्यांना एकंदरीत सूर व नूर दिसला! Uhoh

अनुभानंतर अश्या मेल्स मधला फेकपणा समजत जातो. आपल्याला माहीत असलेल्या/कळलेल्या फेक विपत्रांचा/ साईट्स/ मेसेजेस चा इथे उल्लेख करुया! त्याचप्रमाणे ह्याला आळा घालण्यासाठी करता येणार्‍या उपायांचीही चर्चा करुया.
(मी वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या परीने मी जागरुकतेचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी फरक होणार नाही. पण कालांतराने तर त्या स्त्रीला समजलेच असेल की तिने फॉरवर्ड केल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारची पोचपावती मिळालेली नाही किंवा तिला/ वा तिच्या ओळखीत कुणालाही असला फेक लकी ड्रॉ लागलेला नाही!)

तळटीपः कृपया आंतर्जालावरील कुठल्याही फेक/ फिशींग साईट च्या लिंक्स इथे देऊया नको. नुसता उल्लेख करू या. कुणी ह्या धाग्यावरून चुकून तिकडे रीडायरेक्ट व्हायला नको.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आवर्जून या इमेल्स, स्पॅम मधे ढकलतो. खुपदा live.com ही साईट बघितली, कि डोळे झाकूनच हे करायचे असते.
अनेकदा काही इमेल्स, उघडणेही धोकादायक असते.

जर तूम्ही एखाद्या संस्थेकडे, तूमचा इमेल आयडी दिला असेल, तर त्या डेटाबेसची सर्रास चोरी / विक्री होतेच होते.

ज्या खर्‍याच जेन्यूईन असतात, त्यात अनस्बस्क्राईब फ्रॉम द लिस्ट, असा पर्याय असतो.

पण या इमेल्सना फसणारे, अनेक जण असतात, हे दुर्दैवी आहे.

आंतार्जालावर अशा काही साईट्स ही आहेत की ज्यावर hoax mails चे कलेक्शन आहे. ज्यावर आपण शहानिशा करू शकतो की आपल्याला विपत्रामधून आलेली माहिती ही hoax mail मध्ये मोडते की जेन्युअन आहे.

उदा. अशी एक बातमी मागे वेगवेगळ्या वर्जन मध्ये मेल्स मध्ये फिरत होती:

++++++++++
Red alert -PLEASE READ

A 10yrs old boy had eaten a fast food take-away about 15days ago and fell sick, later when he had his health check done doctors diagnosed that he had AIDS. His parents couldn't believe it...?

Then the entire family under went a checkup none of them was suffering from that. The doctors checked with the boy if he had eaten out? And the boy says he had take-away one evening. The hospital team went there to check. They found the take-away cook had a cut on his finger while cutting the onions, and his blood had spread in the food.

The blood was un-noticeable with the sauce on the burger. When they had his blood checked... the guy was suffering from AIDS but he himself was not aware.

Please take care while u eat from fast food outlets or roadside vendors. kindly forward this message to your friends and make them aware too.

+++++++++

हॉक्स स्लेयर म्हणून एका साईट वर पाहिल्यास ही कशी फेक बातमी आहे, हे खाली नमूद करण्यात आले आहे. अर्थात ही तथाकथित हॉक्स स्लेयर वेब साईट किती खरी खोटी मला काहीच आयडीया नाही. पण मला आलेल्या एखाद्या विपत्राची शहानिशा करायची झाल्यास मी त्या मेल मधील एखादी लाईन जशीच्या तशी गूगल मध्ये टाकून सर्च करते, तेव्हा हॉक्स असल्याचा एखादा पुरावा मिळतोच मिळतो. बर्‍याचदा हॉक्स स्लेयर साईटस च्याच लिंक्स येतात गूगल सर्च मध्ये!

जाणकारांकडून माहिती मिळण्याच्या अपेक्षेत.

मागे एकदा चित्रपट गृहातील सीट्स वर एड्स बाधित ब्यक्तीला टोचवलेली सुई उलटी खोचली असल्याने पुढे त्यावर बसणार्‍याला एड्स ची लागण झाल्याची बातमी ही मेल मधून फिरत होती.

अजुन एक प्रकार.

परदेशातुन पैसे ट्रान्सफर करण्याबद्दल ईमेल असते.
मला असा ईमेल तीनवेळेला आला. त्यापैकी एकदा सद्दाम हुसेनच्या बायकोने पाठवला होता, एकदा बशर-अल-आसद च्या. Proud

परत इथे या बाफवर गैरलागू, पण केससंदर्भात... अशी एक केस ( बहुतेक गोव्यात ) झाली होती. एडस ग्रस्त रुग्णाने, अशी तक्रार केली होती. पण न्यायालयाने, या घटनेआधी तूम्ही निगेटीव्ह होता, याचा पुरावा द्या, असा पवित्रा घेतला होता. ( आणि तो कायद्याच्या दृष्टीने योग्यच आहे. )

गिरिश, असे इमेल्स तर रिझर्व बँकेच्या नावाने पण येतात. मारुती कंपनीच्या नावे, नोकरीच्या ऑफर्स पण येतात. पेपरमधे बातम्या येतात, पण पब्लिकच्या ते लक्षात रहात नाही.

त्याचप्रमाणे ह्याला आळा घालण्यासाठी करता येणार्‍या उपायांचीही चर्चा करुया. >>> ह्याच बघा काहीतरी

मी असे समस सरळ डीलीट मारतो
आणि इमेल्स डीलीट मारायच्या

माझ्या सेल नंबरला आठवड्यातुन कमीत कमी एकदा तरी वेगवेगळ्या कंपनीजच्या लकी ड्रॉ मधे हजारो ते लाखो पौंडस बक्षिस मिळतात. सगळे कलेक्ट केले तर मी जगातली रिचेस्ट वुमन ठरेन. पण सध्या गरज नाहीए. Happy

हे असे फेक मेसेज पाठवणारे सेल नंबर कोणाचे असतात, ते कसे मिळवतात आणि हे लिगल असेल का? यावर काही कारवाई का होत नसेल? सेल फोन कंपनीज ( सर्वीस प्रोवायडर्स) यावर कंट्रोल नाही ठेवु शकत का? माझ्या ऑफिसमधल्या एका स्टाफने ६०-८० हजार रुपये घालवले आहेत या मेसेजवर विश्वास ठेवुन.

मला आताच विपत्रातून "FRAUD COMPANY - MOVE HOLIDAYS" अशा हेडिंग खाली ही बातमी आहे. मला तर वाटते कुणा सॉफ्टवेअर इंजिनीअरचा वाह्यातपणा असावा.
(मेल मध्ये मूव्हहॉलिडेज्.कॉम ह्या दुव्यावर ही बातमी असल्याचा स्क्रीनशॉट आहे. कृपया लिंक उघडू नका. कारण तुमच्या कंप्युटरला हानी पोचवण्याचा विकृत प्रयत्न ही असू शकतो हा.)

Move Holidays Owners Karan Vyas and Virendra Singh has committed a fraud.

They have been booked under the case of Cheating as per the police.
They vanished our night as per the details and are absconding since 1st Nov 2012.

In case you have done your payment through Credit Card then please contact your bank immediately and inform them about this issue. If possible Bank will lock the transaction till the issue is resolved.

Anyone having information about these people can contact Bangur Police Station , Malad. +(91)-(22)-28810121, 28810142, 28810165

Karan Vyas
Virendra Singh

Regards

Manthan Solutions

कुठेही जॉबसाठी apply न करता किंवा कोणताही interview न होता डायरेक्ट offer letter ची मेल

नवर्याला नयजेरियातल्या एका hospital मधून मेल आली होती. भरपूर पगार, Family accommodation, कुटुंबासहीत दोनदा भारताची ट्रीप, कार असे तगडे package होते.

अर्थातच आमचा विश्वास बसला नाही. त्या hospital ची websites ही नव्हती.

गंमत म्हणून आम्ही reply केला. मग अर्थातच विमानाच्या तिकिटासाठी पैशाची मागणी झाली जे नंतर परत मिळनार होते. त्याला आम्ही नकार दिल्यावर mails बंद झाल्या.

पाटील, ह्या साईट चा उल्लेख केला आहे मी माझ्या एका प्रतिसादात. पण ह्या साईट च्या अधिकृतपणाविषयी मला खात्रीशीर माहिती नसल्याने डायरेक्ट लिंक देणे टाळले आहे. तसे मी तळटीपे मध्ये ही नमूद केले आहे.

त्या मूव्ह हॉलिडे ज मध्ये माझ्या नवर्‍याच्या ऑफीसधल्या एका ऑफिस बॉय ने म्हणे ५ दिवस व ४ रात्रींसाठी १२००० रु भरले होते. Sad फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिस कम्प्लेंट करायला गेला तेव्हा पोलिसांनीच म्हणे त्याला ही साईट दाखवली व इतरही फसवणुक झालेल्या व्यक्तींची लीस्ट दाखवली. एकुण ३७ लाखांचा फ्रॉड केलाय म्हणे त्या दोघांनी! Sad

त्यापैकी एकदा सद्दाम हुसेनच्या बायकोने पाठवला होता,
>>> चांगला चान्स गमावल की हो !! आता सद्दाम नाही म्हटल्यावर तीला पुढची बेगमी (कि बेगम) करणे भाग आहे ना, पुन्हा चान्स मिळाला तर सोडू नका Happy

मला लंडनमधल्या एका माणसाने, हॉलिवूडमधे शूट होणार्‍या एका अ‍ॅडच्या स्टायलिंगसाठी तुमचे नाव शॉर्टलिस्ट झालेय तर तुमचे तपशील आणि पोर्टफोलिओ पाठवा अशी मेल पाठवली.
हे असं काही होण्याइतकी मी एक्स्क्लुझिव्ह नाही याची कल्पना असल्याने मी तपशील पाठवले नाहीत फक्त माझ्या बेबसाइटची लिंक पाठवली आणि त्यांची माहिती विचारली. (माझ्याच कामाच्या संदर्भातली अशी मेल म्हणल्यावर चुकून नशीब उघडणारच असेल तर प्रथमग्रासे मक्षिकापात नको... Wink )
तुमचे सिलेक्शन झालेय डिझाइन्स पाठवा असे उत्तर आले.
म्हणलं डिझाइन्स कशाची? काय बेस? काहीतरी इन्फो.. थीम, प्रॉडक्ट, क्लाएन्ट काहीतरी..?
तर म्हणे ते सगळं गुप्त आहे, १५ दिवसांनी लॉस एंजेलिस येथे शूट आहे तुमचा पत्ता, फोन नंबर, पासपोर्ट नंबर वगैरे पाठवा...
मला प्रोजेक्ट डिटेल्स, माझा त्यातला सहभाग आणि रेम्युनरेशन इत्यादी कळल्याशिवाय मी डिझाइन्सही पाठवणार नाही आणि माहितीही पाठवणार नाही असे उत्तर दिल्यावर समोरून आजतागायत नो रिप्लाय. Happy

यातल्या आर्थिक पत्रांना Nigerian scam (advance fee fraud) म्हणतात. बर्‍याच sitcoms मधुन देखिल याची यथेच्छ उडवलेली असती.
असाच अजुन एक मेल म्हणजे, अमुक अमुक तारखेला मंगळ पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणार आहे आणि तो चंद्राहून मोठ्ठा दिसणार आहे!!
... लोक कसेकाय विश्वास ठेवतात काय माहित.

ह्म्म्म
मला पण इतके कॉल्स आले आहेत कि बस! पण माझ्या भौगोलिक ज्ञानात भरचं पडली त्यामुळे Wink
'साओ टोम' नावाचा देश माहित आहे कोणाला? मला तिथुन फोन यायचे.
आणि पाकिस्तानातुनही!
माझ्या इमेल आयडीला ही मायक्रोसॉफ्ट नाहीतर याहूची लॉटरी बरेचदा लागते.
मेल्स कडे आपण दूर्लक्ष करू शकतो पण पाकिस्तानातून फोन आला तेव्हा आधी मला भितिच वाटली होती. Happy

एक मेल/मेसेज्/शेअर असा येतो : "जर कोणी तुम्हाला जबरद्स्तीने ATM मशीन मधुन पैसे काढायला लावत असेल तर PIN ऊलटा टाकायचा. म्हणजे पैसे येतात व लगेच पोलिसांना सुद्धा सुचना मिळते."

हे एक hoax आहे. या प्रकारची कोणतीही प्रणाली सध्यातरी अस्तित्वात नाहीये.

अशा गोष्टींवर ऊपाय मी असा केला होता कि जेव्हा माझ्या facebook वर एकाने share केले होते, तेव्हा त्याखाली प्रतिसादात मी हे कसे फेक्/खोटे आहे याबद्दल लिहिले होते. त्यानंतर माझ्या facebook friends पैकी कुणीही हि मेल्/मेसेज शेअर केला नाही.

अशाच प्रकारे निंबुडा ने लिहिलेल्या (२) टाईप ची मेल (देवीचा दुर्मीळ फोटो वगैरे) एका मित्राने सगळ्यांना forward केली होती. माझ्या दुसर्‍या एका मित्राने त्या मेल ला Reply to all करुन चांगली खरडपट्टी काढली होती.

मला दर आठवड्याला टिसीएस कंपनीच्या नावाने एक इमेल येतय (गेले २-३ महिने हा प्रकार चालू आहे) तुमचा सिव्ही शॉर्टलिस्ट झालाय विकेंडला इंटर्व्हू आहे दिल्लीला. एअर टिकेट पाठवतो. तुम्हाला अमूक इतकी हजार रक्कम आमच्या अकांऊट मधे जमा करा जे तुम्हाला इंटर्व्हुला आल्यावर परत मिळतील इ. इ. ५० जण शॉर्ट लिस्ट झाल्येत त्यापैकी तुम्ही १ (होऊ घातलेले बकरे आहात) त्या पैकी ४५ जण फायनली सिलेक्ट होतील वगैरे वगैरे.

मी इग्नोर मोड ऑन करते आणि डिलिट करते

लॉटरी लागलेय वालं इमेलही तसच.

मी न रहावून सायबर क्राईम च्या इमेल आयडीवर अशा इमेल्स चा रेफरन्स देऊन अ‍ॅक्शन घेता येईल का विचारलं होतं पण ते त्यांनी त्यांच्या रिसायकल बीन मधे टाकलं असावं बहुदा Proud

खुप पुर्वी पोस्टकार्डे यायची (टाईप केलेली) त्यामधे साईबाबा, संतोषी माता, इ. बद्दल असायचे.
आणि अशी जास्तीत जास्त पत्रे अनेक लोकांना पाठवा असे असायचे.

मी न रहावून सायबर क्राईम च्या इमेल आयडीवर अशा इमेल्स चा रेफरन्स देऊन अ‍ॅक्शन घेता येईल का विचारलं होतं >>> त्यांनी पण हे स्पॅम ईमेल असेल असे वाटुन डिलीटलं असेल. Lol

पण कोण काय म्हणाले पलिकडून ? >>>
कोणी काही बोलेच ना, आणि मला तेव्हा पकिस्तानचा कोड माहित नव्हता +९२ काही माझ्या लक्षात आले नाही. मी आपले २-४दा हॅलो केले. नंतर पुन्हा फोन आले मग मी नेटवर चेक केले तर कळ्ले कराचीचा नंबर आहे :(. मग रिसिव्ह करायचे बंद केले.
'साओ टोम' वरुन फोन आला तेव्हाही नंबर न कळ्ल्याने 'अहो'नी कॉल बॅक करुन पाहिले होते. आणि एक्दम ५० रु कट झाले. Sad

लोकहो,

हा मजकूर बघा!

So what is scambaiting? Well, put simply, you enter into a dialogue with scammers, simply to waste their time and resources. Whilst you are doing this, you will be helping to keep the scammers away from real potential victims and screwing around with the minds of deserving thieves.

अधिक माहितीसाठी इथे जा!

Happy reading! Happy

आ.न.,
-गा.पै.

ओके.
मला जे व्हा असे मेल येतात की तुमचा मेल आयडी अमुक अमुक रक्कम जिंकला आहे तर तुमचे डिटेल्स द्या.मी सरळ त्याला रिप्लाय करतो की
धन्यवाद, तुम्ही माझ्याबरोबर खुपच दयाळु होवु पहात आहात तर ह्यास्तव मी जिंकलेली रक्कम तुम्हालाच दान करत आहे तुम्ही त्याचा सुखोपभोग घ्या धन्यवाद.

नोकरीबाबत ह्युंडाईकडुन आलेल्या मेलला लिहीले होते, की तुला कदाचित माहित नाही की तु हा मेल कोणाला पाठवला आहेस. मी ह्युंडाई इंडियाचा कायदेशीर सल्लागार आहे आणी आता तुझे मुंबई सायबर क्राईम ब्रांच पोलीसांपासुन देव रक्षण करो. :)):))

वरती नीधपचे पोस्ट बघून माझा आडाखा आणखी बळकट झाला, अनेकदा व्यावसायिक कारणासाठी दिलेले पत्तेच असे परस्पर विकले जातात. नाहीतर आपण नेमके कुठल्या क्षेत्रात आहोत, हे कसे कळते त्यांना ?

नोकरीच्या ईमेल्स, बहुतेकदा मलेशिया, ब्रुनेई आणि नायजेरियातून आल्याचा दावा केला जातो. मागे एकदा तर दिल्लीमधल्या नायजेरियाच्या अधिकारी, मिसेस अब्बा यांच्या सहीशिक्क्यानिशी या इमेल्स येत होत्या.
( त्यांची सही मला माहीत होती, कारण त्यांचा माझा पत्रव्यवहार होता. )

पण या सगळ्या नूसत्या डिलिट करुन उपयोग नाही, त्या स्पॅममधेच टाकाव्यात. ( याहूचा आभाराचा मेसेज येतो लगेच ) म्हणजे नंतर त्या पत्त्यावरून तरी मेल येत नाही.

वरती नीधपचे पोस्ट बघून माझा आडाखा आणखी बळकट झाला, अनेकदा व्यावसायिक कारणासाठी दिलेले पत्तेच असे परस्पर विकले जातात. नाहीतर आपण नेमके कुठल्या क्षेत्रात आहोत, हे कसे कळते त्यांना ?

>>>
करेक्ट. नी ची पोस्ट वाचून मला ही हाच प्रश्न पडला होता की तिचे प्रोफेशन काय आहे हे कसे कळले त्या फ्रॉड कंपनीला. Uhoh दिवसातून सतरांदा कसकसले समस येत असतात कशा कशा डील्स बाबत तेव्हा असाच प्रश्न पडायचा की रँडमली कुठल्याही १० अंकी नंबर वरती समस करतात का हे लोक? Uhoh

आपला व्यक्तिगत डेटा असा परस्पर कसे विकू शकते कुणी??

थेट संस्था नाही विकणार, पिऊन ( प्यून हो ) विकत असतील.... कार सेल्स मधे असणारे तर, एन्क्वायरीज सुद्धा विकतात.

Pages