विदेशी फोन नंबर बाबत

Submitted by Mandar Katre on 11 November, 2012 - 07:02

मध्यंतरी सरकारने + २४३, +१२०......,unknown numbers ,blank calls ना प्रत्युत्तर देवू नये ,किंवा ते फोन रिसीव्ह करू नयेत ,असे जाहीर आवाहन केलेले होते. पण यात मेख अशी आहे कि, ज्यांचे आप्त ,नातेवाईक,मित्र परदेशी व विशेषत: गल्फ मध्ये असतात ,अशा लोकांना वर उल्लेख केल्या सारख्या नंबर वरून सतत फोन येतात कारण ते परदेशी असलेले नातेवाईक voip सेवा वापरून call करत असतात . voip call करताना भारतातल्या फोन नंबरवर विचित्र नंबर येणे अगदी स्वाभाविक आहे .

काही परदेशी कंपन्यासुद्धा voip चा वापर करून telephonic interview घेतात .

यास्तव सगळेच विचित्र नंबर fraud नसतात ,हे लक्ष्यात घ्यावे. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या भ्रमणध्वनीवर एक 'संदेश' सध्या येत असतो, त्यात +९१८८८८८८८८८८ हा भ्रमणध्वनी क्रमांक लिहलेला असतो आणि खाली लिहलेल असते. "यह नंबर किसका है"