फेक

अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद

Submitted by अंड्या _ ऋन्मेऽऽष on 31 March, 2013 - 05:29

जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे "मीच तुझी रे चारोळी" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. "तुला रं गण्या कधीपासून हा छंद?" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, "अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं..

ऐन दुपारी.. नदी किनारी..
फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी..
तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने..
घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे..

विषय: 

खोटी/ फेक/ भाकड, hoax विपत्रे, समस, दुवे इ.

Submitted by निंबुडा on 9 November, 2012 - 04:17

कॉर्पोरेट क्षेत्रात नव्यानेच आल्यानंतर इंटरनेट ची कायमवेळ सुविधा (अर्थात सोशल नेटवर्किंग साईट्स वगळून) आणि नवनवीन मेल्स ह्यांचे प्रचंड आकर्षण/ कुतूहल वाटत असे. आपल्याला आलेले प्रत्येक ढकलपत्र (forwarded email) आपल्या असंख्य मित्र-मैत्रिणींना त्याच पद्धतीने पुढे पाठविण्यात फार धन्यता वाटत असे.

शब्दखुणा: 

फेक आनंद .. ??

Submitted by अंड्या _ ऋन्मेऽऽष on 22 October, 2012 - 07:40

दुकानाचा माल आणण्यासाठी बरेचदा माझे दादरला जाणे होते. परवाही गेलो होतो. दादर स्टेशनजवळ काही मुलांचा ग्रूप दिसला. नवरात्रीच्या निमित्ताने हिरव्या रंगात नटलेला कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रूप. फोटोसेशन चालू होते. अर्थात, नटलेल्या अवस्थेत आजकाल हेच जास्त चालते. कारण संध्याकाळी हेच फोटो फेसबूक वर अपलोड करून इतरांची वाहवा जी मिळवायची असते. वरवर पाहता धमाल चालू आहे असे वाटत असले तरीही प्रत्येकाचे लक्ष मौजमजा करण्यापेक्षा फोटो कसा चांगला येईल याकडे लागले होते. मागेही रंगपंचमीच्या दिवशीही मला असेच द्रूष्य पाहायला मिळाले होते. मुलांचा ग्रूप एकमेकांना रंग लावायच्या पोजमध्ये फोटो काढत होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फेक