संदलवूड प्लँटेशन, चंदनाची शेती/लागवड
चंदन उर्फ संदलवूडच्या लागवडीबद्दल माहिती हवी आहे. आपल्यापैकी कुणी हे करतं का? या विषयी माहिती मिळेल का प्लीज?
चंदन उर्फ संदलवूडच्या लागवडीबद्दल माहिती हवी आहे. आपल्यापैकी कुणी हे करतं का? या विषयी माहिती मिळेल का प्लीज?
मेहनत करणे... खडतर परिश्रमांनंतर यश मिळणे, हे चांगलंच ! परंतु श्रमाला, यशाला, कलेला, त्याहूनही कलाकाराला ओळख मिळणे ही फार मोठी गोष्ट..
एका शिल्पकाराची गोष्ट
-----------------------------------------------------------------
mSauda (एम-सौदा) हे इंटरनेटवर खरेदी-विक्रीच्या उलाढालीसाठीचं (ई-कॉमर्स) आणि ग्राहकांना एकत्र येण्यासाठी बनवलं गेलेलं व्यासपीठ- असं म्हणता येईल. समीर करंडे हे mSauda चे सह-संस्थापक. समीर यांना जवळजवळ १६ वर्षांचा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासोबत काम करण्याचा अनुभव आहे. सुरुवातीला 'पर्सिस्टंट सिस्टिम्स'ची 'टेलेकॉम बिझिनेस' शाखा सांभाळत होते, ज्यात संपूर्ण जगभरातून जवळजवळ १००० लोक काम करत होते. यानंतर त्यांनी 'मोबाईल आणि वायरलेस बिझिनेस युनिट'ही सांभाळून त्याची उलाढाल अनेक पटींनी वाढवली. MobiPrimo या कंपनीचेही संस्थापक तेच होते.
आपल्याला एखादी छोटी मोठी कल्पना अचानक खूप रोमांचकारी वाटते, यात काहीतरी प्रचंड काम होऊ शकेल असं जाणवत राहतं, पण थोडंसं पुढे गेल्यावर लक्षात येतं, की या गोष्टीत आपण सोडून कुणालाच रस नाही, किंवा एकुणच यात काही राम नाही. व्यवसाय-धंदा करायला निघालेल्या लोकांबाबत असं अनेक वेळेला घडलेलं आपण पाहिलं आहे. पण त्याचबरोबर अनेक वेळेला हेही बघितलं आहे, की एखाद्याला एखादी छोटी गोष्ट करून बघायची तीव्र इच्छा होते, मग तो अनेक जणांचा विरोध सहन करून किंवा प्रसंगी झुगारून त्याला पाहिजे ते करत राहतो, आणि एखाद्या दशकानंतर त्या हौसेखातर करून बघितलेल्या गोष्टीचं एखाद्या साम्राज्यात रूपांतर होतं!
वर्षाविहार(२४ जुलै २०११)- फार्मलाईफ इथे वविकरांसमोर व्यक्त केलेलं मनोगत
***
नमस्कार मित्रांनो.
आंबेविक्री हा अवधूत काळ्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय! घरच्याच आंब्याच्या बागा आहेत. त्यामुळं कलम कसं लावायचं, आंबा कसा पिकवायचा ह्याची माहिती त्यांना होती. पण पहिल्यापासूनचा ट्रेन्ड असा की पिकवलेला साधारण ४०० ते ५०० पेटी कच्चा आंबा वाशी मार्केटमध्ये विकायला आणायचा. ९२ सालापासून अवधूत काळे "काळे बंधू आंबेवाले - देवगड" ह्या नावाने आंबेविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याशी झालेल्या बातचितीतून त्यांच्या व्यवसायाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
व्यवसायात सुरू करताना -