उद्योगजगतातल्या घडामोडी, बातम्या इ. बद्दलच्या गप्पांसाठी हे पान वापरू या. तुम्हाला समजलेल्या, तुम्ही इतरत्र वाचलेल्या घटना, निरनिराळ्या व्यवसाय-उद्योग क्षेत्रात चालत असलेल्या हालचाली आणि वेळॉवेळी होत असलेले किंवा होऊ घातलेले बदल इतरांना सांगण्यासाठी, आणि त्यावर मते मांडण्यासाठी हे पान.
माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.
पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.
मोटरसायकल: बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc
चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतक्षेत्र यांत घनिष्ट संबंध असल्याचे खूपच पूर्वीपासून लक्षात आलेले आहे. एका क्षेत्रात कुठलेही बदल घडत असल्यास ते दुसर्या क्षेत्रास जन्म देतात असेही आढळून आले. या नव्या क्षेत्राच्या निर्मितीची दिशा निश्चित करणारा अभ्यास फ्लेमिंग यांनी केला होता.
लोक्स PC संदर्भात मार्गदर्शन हवं आहे.
माझ्या घरच्या कॉम्पुटरचा मॉनिटर अचानक मधेच बंद होतो. म्हणजे ठराविक वेळ झाल्यावर नाही - कधीही आणि फक्त मॉनिटरच बंद होतो. CPU व्यवस्थित सुरु असतो. काही वेळाने अचानक सुरु होतो. मग परत काही वेळाने बंद. हा "काही वेळ" ५ मिनिटं पण असू शकतो आणि अर्धा-पाऊण तास पण.
मॉनिटर तपासून झालाय आमच्या कॉम्प्वाल्याकडून आणि तो त्यांच्याकडे ओक्के चालतोय - असं त्याचं म्हणणं आहे. त्याने फार वेळ चालवून पाहिला नसावा.
आता तो बहुतेक CPU घेऊन जाईल. मी सगळे सेटिंग बघितले. मॉनिटर अचानक बंद पडेल असं काहीही नाहीये.
सगळे स्विचेस, वायरी लूज कनेक्शनसाठी तपासून झाल्या आहेत.