न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्कच्या दक्षिणेस १२० मैलांवरील अमेरिकेच्या अलामागार्डो भूदलाच्या, बिकिनी बेटावरील हवाई तळातील एका उंच लोखंडी मनोर्यावर, स्थानिक वेळेनुसार, १६ जुलै १९४५ रोजी सकाळी ०५३० वाजता, जगातील पहिला ज्ञात अणुस्फोट करण्यात आला. ज्येष्ठ वैज्ञानिक ओपेनहॅमर ह्यांनी, त्या स्फोटातील ऊर्जेचे वर्णन करताना 'दिवि सूर्यसहस्रस्य*' ह्या गीतेतील श्लोकाचा आधार घेतला. हजार सूर्यांएवढी दीप्ती त्यांना त्या स्फोटात भासली. स्फोटाचा तत्कालीन उद्देश दुसर्या महायुद्धाचा अंत लवकरात लवकर घडविणे हा असला तरीही, ह्या घटनेनंतर जगाचा ऊर्जास्त्रोतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला.
पदभ्रामकांना अंधार पडताच काळजी लागते ती सरपणाची. कारण जिथे रात्र काढायची तिथे उजेड पाहिजे, इंधन पाहिजे. ती गरज भागते सरपणाने. खेड्यातल्या लोकांचा अर्धा वेळ पाणी आणि सरपण गोळा करण्यातच खर्च होतो. सर्व प्रकारच्या सरपणांमध्ये ज्या प्रकारची ऊर्जा असते तिला 'रासायनिक' ऊर्जा म्हणतात. कारण हे, की पदार्थांच्या रासायनिक स्थित्यंतरांतून त्या ऊर्जेचे विमोचन होत असते.
मी १९८४ मध्ये राष्ट्रीय हिमालयी पदभ्रमण कार्यक्रमांतर्गत वाटचाल करत असताना सुमारे १२,००० फुटांवर एक अनोखी 'पाणचक्की (हायड्रो-टर्बाईन)' पाहिली. तिथे कुणीच नव्हते. हिमालयात जाता-येता दिसतात तसलाच एक जोराचा पाण्याचा प्रवाह, मोठ्या देवदार वृक्षाच्या लांबलचक खोडाची पन्हळ आडवी करून त्यातून निमुळता करून एका जागी एका जमिनीसमांतर आडव्या, मोठ्या लाकडी चक्राच्या पात्यांवर सोडलेला होता. लाकडी चक्राच्या मध्यावर एका दगडी जात्याची वरची पात घट्ट बसविलेली होती. चक्र फिरताना ती वरची पात खालच्या दगडी पातीवर वेगाने गोल फिरत होती.
वारं आलं. कागद उडाले. कागदांवर ठेवलेला काचेचा वजनी गोळाही (पेपरवेटही) ढकलल्या गेला. पायावर पडला. लागलं. पण तोच गोळा जर नुसता पावलांवर अलगद ठेवला असता तर मुळीच लागलं नसतं. तो गोळा ज्या उंचीवरून पडला त्या उंचीमुळेच गोळ्यात काहीतरी वेगळी 'ऊर्जा' निर्माण होत असावी. तिलाच 'स्थितीज ऊर्जा' म्हणतात. स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा. अर्थातच जेवढी उंची जास्त तेवढीच ऊर्जाही जास्त. आणि हेही खरेच की स्थितीज ऊर्जा जशी त्या वस्तूच्या उंचीवर अवलंबून असते तशीच ती त्या वस्तूच्या वजनावरही अवलंबून असते. वजन जास्त असेल तर ती वस्तू तेवढ्याच उंचीवर जास्त ऊर्जा सामावू शकेल.
आदिशक्तीची अनेक रूपे आपल्या संस्कृतीत सदैव पूजिल्या गेलेली आहेत. नव्या जगाच्या संदर्भात आदिशक्तीचे सर्वव्यापी रूप 'ऊर्जा' हे आहे. ऊर्जा म्हणजे (ऊर+जा=ऊर्जा) ऊरात जन्म घेतलेली शक्ती. प्राथमिकत: जैव शक्ती. मात्र ऊर्जेचा वावर वस्तूमान, भौतिक/रासायनिक ऊर्जा आणि जैव ऊर्जा ह्या मुख्य रूपांमधून होत असल्याने ही तीन रूपे प्रमुख मानावित.
व्हाईट चॉकलेट वापरुन स्पॅगेटी बनवली आहे. आदित्यने इथे नूडल्स बनवताना जे तंत्र वापरले तेच वापरले आहे. रंगीत स्पॅगेटीसाठी त्यात खाण्याचा रंग घातला.
व्हाईट चॉकलेट morsels ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळतात.
तिरंगी स्पॅगेटी-
हिरवी जरा जाड दिसते आहे ती साध्या स्ट्रॉ मधून काढली आहे( टिपबद्दल आदित्यचे आभार). किटबरोबर तीनच नळ्या येतात.
हे येथे आधीच लिहिल्या गेले आहे के ते माहीत नाही, पण अॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.
(१) मार्केट वरून मिनी-ओपेरा डाऊनलोड करा
(२) ते ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर जा
(३) “Use bitmap fonts for complex scripts” या वाक्यासमोरील "No" ला "Yes" मध्ये बदला. बदल "save" करा.
आणि खुशाल मायबोली सारख्या संकेतस्थळांचा आनंद लुटा.
साधारण ५०० स्क्वे. फुट. अन १००० स्क्वे. फु. जागेमध्ये ऑडिओ व्हिज्युअल हॉल बनवायचा आहे. त्यासाठी प्रोजेक्टर, स्क्रीन, साउंड सिस्टीम, खुर्च्या (नसल्या तरी चालतील, गावाकडली पोरे सतरंजीवर बसु शकतातः)) असा सेट-अप करायचा आहे. वरील उपकरणे विषेशतः प्रोजेक्टर, स्क्रीन अन साउंड कुठ्ले घ्यावे? ते किती किमतीत येउ शकेल याची माहिती हवी आहे.
धन्यवाद!
IBM चा संगणक वॉट्सन, केन जेनींग्ज, ब्रॅड रटर या तिघांमध्ये हा सामना खेळला गेला. केन जेनींग्जच्या नावावर सलग ७४ वेळा जेपर्डी जिंकण्याचा विक्रम आहे तर ब्रॅड रटरने जेपर्डीत $3.3MM जिंकले आहेत. थोडक्यात दोघेही जेपर्डी खेळण्यात "दादा" आहेत. येत्या फेब्रु. १४-१६ या तारखांना प्रक्षेपण होणार आहे. चुकवु नका.
IBM लॅब्सने चार वर्षे झटुन हि प्रणाली तयार केली आहे. AI किंवा संगणक क्षेत्रातील हि एक अत्यंत महत्वाची पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. भविष्यात या प्रणालीचा वापर वैद्यकिय आणि इतर क्षेत्रात यशस्वीरीत्या करण्यासारखा आहे.