तंत्रज्ञान

कोणते वॉशिंग मशिन घ्यावे.

Submitted by राजुल on 29 March, 2012 - 07:23

मला फ्रंट लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.
कुठले सुचवाल?
मला आयएफ्बी आणि एल जी अशी दोन मशिन सुचवली आहेत. तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.

प्रिंटरची शाई कशी वाचवावी?

Submitted by मंदार-जोशी on 13 March, 2012 - 09:30

कार्यालयीन कामात आजकाल संगणकाचा वापर सर्वव्यापी झालेला असला तरी काही गोष्टींची हार्ड कॉपी असणे आवश्यक किंवा अनिवार्य होते. अशा वेळी प्रिंटाआउट काढताना 'अगदीच आवश्यक आहे का' असा पर्यावरणवादी विचार केल्यानंतर दुसरा असा विचार मनात यायला हवा की हा प्रिंटाआउट किती महत्वाचा आहे. कधी कधी एखाद्या प्रोजेक्टच्या संदर्भात तो सुरू असे पर्यंत काही कागद जवळ बाळगावे लागतात. म्हणजेच त्यांचा उपयोग फार काळासाठी नसतो. अशा कमी महत्वाच्या प्रिंटाआउटच्या बाबतीत आपण एक करु शकतो म्हणजे प्रिंट काढताना प्रिंटरची शाई वाचवणे. हे आपण असे करु शकतो.........

फेसबुककडून फसवणूक होते का ?

Submitted by Kiran.. on 20 February, 2012 - 19:19

ऑर्कुटचं अकाऊंट डिलीट करून दोनेक वर्ष झाली तरी मी फेसबुक जॉईन केलं नव्हतं. मित्रांच्या एका ग्रुपने ओपन करायला लावलं म्हणून हल्लीच फेसबुक वर आलो. अकाऊंट ओपन करताना जीमेल मधले सगळे कॉण्टॅक्ट्स फेबुने वापरले. काही दिवसांनी पाहतो तो मी आपोआपच कवितांच्या काही ग्रुप्सचा मेंबर झालो होतो. माझं जीमेल अकाऊंट या सगळ्या कवितांनी भरून गेलं होतं. हे सगळे मेल डिलीट करता करता भरपूर वेळ गेला. पण पुन्हा त्याच वेगाने ते भरत गेलं.

टेड टॉक

Submitted by अजय जवादे on 19 February, 2012 - 00:56

आवडलेल्या टेड टॉकच्या संदर्भात चर्चेसाठी हा धागा.
टेड टॉकचे विडिओ इथे शेअर करा.
थोडा सारांश लिहीला तर आणखीच छान.

टेड टॉक संबधी अधिक माहितीसाठी : http://www.ted.com/pages/about

शब्दखुणा: 

इंटरनेट हे व्यसन आहे का ?

Submitted by असो on 17 February, 2012 - 19:05

इंटरनेटचे व्यसन असू शकते का ? असल्यास त्याचे दुष्परिणाम काय आहेत ? आऱोग्यावर काही परिणाम होऊ शकतात का ?

हे व्यसन कसं सोडवता येतं ?

ऊर्जेचे अंतरंग-२१: प्रारण संवेदक उपकरणे

Submitted by नरेंद्र गोळे on 23 December, 2011 - 23:42

प्रारण संवेदक उपकरणे१ मुख्यतः दोन प्रकारची असतात.

१. दर-मापक उपकरणे आणि
२. व्यक्तिगत मात्रा-मापक उपकरणे.

ऊर्जेचे अंतरंग-२०: किरणोत्साराची देखभाल

Submitted by नरेंद्र गोळे on 22 December, 2011 - 05:07

किरणोत्सार पाहताही येत नाही आणि अनुभवताही येत नाही. मात्र त्याचा स्वास्थ्यावर हानीकारक प्रभाव पडतो. म्हणून, किरणोत्सारी क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींची देखभाल करणे अत्यंत आवश्यक असते. ह्या देखभालीच्या साह्याने प्रत्येक व्यक्तीस मिळणार्‍या मात्रेची नोंद ठेवली जाते, ज्यामुळे हे सुनिश्चित करणे शक्य होते, की कोणत्याही कर्मचार्‍यास निर्धारित मात्रेपेक्षा जास्त मात्रा मिळू नये. किरणोत्सार देखभाल अनेक प्रकारे केली जाते.

१. व्यक्तीगत अवशोषित किरणोत्सार मात्रेचे मापन
२. किरणोत्सारी क्षेत्रातील किरणोत्साराचे मापन

ऊर्जेचे अंतरंग-१९: किरणोत्साराचे प्रभाव आणि त्यांचे मापन

Submitted by नरेंद्र गोळे on 21 December, 2011 - 06:23

जेव्हा किरणोत्सार एखाद्या माध्यमातून जात असतो तेव्हा त्या माध्यमाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मूलकीकरण होते किंवा ते माध्यम उत्तेजित अवस्थेत पोहोचते. सजीवांमध्ये हे मूलकीकरण किंवा ही उत्तेजना, शरीराचे अनेक कण जसे की प्रथिने, न्यूक्लिक आम्ल इत्यादींना नष्ट करते. हे सर्व कण शरीराकरता अत्यंत महत्वाचे असतात. म्हणून किरणोत्सार, सजीवांच्या शरीरांसाठी धोकादायक असतो. अल्फा आणि बीटा किरणे माध्यमास प्रत्यक्षरीत्या मूलकित करतात.

ऊर्जेचे अंतरंग-१८: सर्वव्यापी किरणोत्सार

Submitted by नरेंद्र गोळे on 16 December, 2011 - 00:22

किरणोत्सार आपल्या सभोवार पसरलेला आहे. एका सामान्य माणसाला सगळ्या स्त्रोतांकडून मिळणारा किरणोत्साराचा संसर्ग जर १००% धरला, तर त्यातला किती संसर्ग कशापासून आपणास होत असतो ते खाली दिलेले आहे.

१. घरेः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्साराचा ५५% हिस्सा रेडॉनद्वारे मिळतो. रेडॉन हा एक वायू आहे जो जमिनीतील नैसर्गिक युरेनियमपासून उत्पन्न होतो. रेडॉन जो घरांतून दडलेला असतो.

२. शुश्रुषालयेः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्सारापैकी सुमारे १५% किरणोत्सार वैद्यकीय आणि दंत-क्ष-किरणचिकित्सेतून मिळतो.

शब्दखुणा: 

वायरलेस ब्रॉडबँड - काही प्रश्न

Submitted by mansmi18 on 22 November, 2011 - 00:30

नमस्कार,

वायरलेस ब्रॉडबँड बद्दल काही प्रश्नः (मी गूगलवर शोधणे आणि दुकानात प्रत्यक्ष जाउन विचारणार आहेच पण इथे कोणाला माहिती असेल तर विचारावे म्हणुन विचारत आहे).

१. पुण्यात (बाणेर-बालेवाडी) भागात चांगली सर्विस कुणाची आहे?

२. युएस्बी डीवाईस कुठल्याही लॅपटॉप वर लावल्यास चालते का?(का त्याचे रीलेटेड सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागेल ज्या लॅपटॉपवर वापरायचे त्यात) ?

३.रीलायन्स नेटकनेक्टचा एक अनलिमिटेड प्लॅन आहे (९५० रु). त्यात पहिले ५ जीबी ३ एम बी पी एस ने आणि नंतरचे १५० केबीपीएस ने डाउनलोड अ‍ॅवेलेबल आहे).
मी वीपीएन ला कनेक्ट करुन काम करतो. दिवसाचे किमान १० तास वापर होणार आहे.

Pages

Subscribe to RSS - तंत्रज्ञान