गझल...गुलाम शिल्लक आहे

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 6 August, 2018 - 03:15

गझल..............
गुलाम शिल्लक आहे
- स्वच्छंदी / महेश मोरे

तुला जिंदगी करावयाचा सलाम शिल्लक आहे
कधी हारलो नाही ,माझे इनाम शिल्लक आहे

तुझी नि माझी बदामातली पुसून गेली नावे
तरी वाळल्या खोडावरला बदाम शिल्लक आहे

लोकशाहीच हसत बोलली स्वप्नामध्ये मजला
म्हणे माणसामध्ये अजूनी निजाम शिल्लक आहे

दगडापुढती नाही झुकली मान कधीही ज्याची
मला वाटते त्याच्यामधला कलाम शिल्लक आहे

नकोस समजू आयुष्या की डाव संपला माझा
राजा गेला,राणी गेली,गुलाम शिल्लक आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<<< नकोस समजू आयुष्या की डाव संपला माझा
राजा गेला,राणी गेली,गुलाम शिल्लक आहे >>>

झकास.
गुलाम कुठे, हा तर बदामचा एक्का आहे.