रात्र

कशी वर्णु मी ती रात्र ?

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 04:44

तोकड्या शब्दांनी माझ्या कशी वर्णु मी ती रात्र ।
दोन तनुंच्या अंगारात धगधगती ती मखमली रात्र ।।१।।

गात्रांतून ओथंबून वाहते एक बेभान रणरणती ओढ ।
विसरु म्हणता विसरत नाही ती स्फुलिंगणारी रात्र ।।२।।

चमचमणाऱ्या ताऱ्यां खाली तळमळणारी आस ।
तिमीरी पांघरुणाखाली लखलखती शृंगारिक रात्र ।।३।।

दोन जीवांच्या मिलनाचा उफान भोगविलास ।
प्रेमपुर्तीच्या तृप्त गात्रांनी थकुन झोपली रात्र ।।४।।

द्वेष : एक भय गूढकथा, भाग ९

Submitted by प्रथमेश काटे on 2 March, 2024 - 00:56

वेळ हळू हळू पुढे सरकत होता. अस्वस्थता... चित्त विचलित करणारी. शिवाय या अस्वस्थतेसोबत काहीशी भीतीही होतीच. ' करावं तरी काय ?' - राजाभाऊंना उमजत नव्हतं. ते फक्त तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते. निष्फळ प्रयत्न. परिणाम काही नाही. उलट हे मळभ कणाकणाने दाटतच चाललं होतं.

सुने

Submitted by आर्त on 19 March, 2021 - 15:56

पश्चिमेवर असता उन्हे
ऐक निळाईचे रडणे.

निशेस धरणी विचारी
ना आवडत तुज रंगणे?

निःशब्दशाही तूच सांग
का रे इथे पडले सुने?

शांततेत दडले असते
सोसत अपुले घाबरणे.

विषण्णता घेरा घाली
रोजचेच झाले बुडणे.

रात्र होते जर्द शाई
आपण पानी उतरवणे.

- आर्त. (१९.०३.२०२१)

टीप: मी गझल हा प्रकार नव्यानेच हाती घेतला आहे. जर कुणाला सुधारणा, अभिप्राय इत्यादी कळवायचे असेल, तर मुक्तपणाने बिनधास्त कळवा. आभारी.

विषय: 

चारोळी

Submitted by मी अनोळखी on 12 June, 2020 - 12:06

अमावस्येच्या चंद्रा विना चांदणी कधी सजत नाही
दिवस कसाही सरतो रे
पण तुझ्या आठवणीत ही रात्र काही निजत नाही

विषय: 
शब्दखुणा: 

ती रात्र

Submitted by सागर J. on 15 April, 2020 - 07:07

'आई काय ग हे !.काय सारखा सारखा लहान मुली सारखा मला घरी लवकर यायला सांगता .मी मोठी आहे आता '
' सोन्या तुझी काळजी वाटते आम्हाला म्हणून सांगते.आणि हो ...बाबा येणारेत बरका तुला दररोज तुला क्लास मधून आणायला .....
निशाची आई तिला समजावत समजावत होती .तिच्या बोलण्यातून खूप काळजी व्यक्त होत होती . निशाचे आई समोर काही चालले नाही .निशाला माहीत होते की काही दिवसा पासून आई आणि बाबा थोडे काळजीत दिसत आहेत .कारण हि तसेच होते .काही दिवसांपुर्वीच ती बातमी आली होती ...

विषय: 

रात्र

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 2 September, 2018 - 11:35

रात्र
***
आज पुन्हा चांदण्यांनी
बहरून रात्र गेली
रातराणीच्या फुलांनी
उमलून रात्र गेली

सरल्या शंका कुशंका
मूक व्यर्थ रुष्ठताही
विरहात अंध दीप
पेटवून रात्र गेली

कळले कुणास आज
जीव प्राण वाहीलेला
भरुनी डोळ्यात कुणाच्या
पाझरून रात्र आली

नियती सदैव देई
डाव अर्धा हरलेला
तव हाती बदलून
उजळून रात्र गेली

मन शुभ्र अंगणात
कोजगरी ही नटली
रित्या जगण्यास माझ्या
सजवून रात्र गेली

शब्दखुणा: 

एक रात्र अशी ही...

Submitted by पार्था on 27 March, 2018 - 06:10

एक रात्र अशी ही
एक रात्र आपल्या मैत्री ची..

एक शब्द तू बोल
एक शब्द मी ऐकतो..

या अंधारी एक शांतता तू ठेव
या मैत्री ची एक शांतता मी ठेवतो..

एक अबोल शब्द ने तू बोल सारे
एका अबोल शब्दाने मी समजतो सारे..

एक मैत्री ची रात्र अशी ही
एक गुपित तू सांग एक मी सांभाळतो..

प्रांत/गाव: 

चिंब चिंब ... टिंब टिंब ...

Submitted by भास्कराचार्य on 10 July, 2017 - 16:28

आला आला ... अबे जाईल. नाही रे कसला जातोय, त्या खिडक्या कसल्या सपासप धुतल्या जातायत बघ, पळ पळ लवकर ... लगेच काढ हेडफोन्स ... घे ती किल्ली ... चल खाली. धावतोय, धावतोय लिफ्टकडे त्या काळ्यापांढर्‍या कॉरिडॉरमधून ... प्रेग्नंट बायकोच्या रूमकडे धावत जावं कोणी आतुर नवर्‍याने तसं धावतोय ... अजगरासारख्या रात्री श्वासांचा जड आवाज ... लिफ्टची खडखड ... आलो खाली. धाव त्या दारातून, सोड तो सेंट्रलाईझ्ड एसी. आणि मग तुम्हाला दिसतो तो पाऊस. चित्त्यासारख्या झेपा घेत येतोय च्यायला. पाण्यालासुद्धा धरतीची ओढ आहे. हा भिजण्याचा पाऊस नाही. तो सांगतोय तुला, बाजूला सर मुकाट, नाहीतर छिन्नविछिन्न करून टाकेन.

विषय: 

रात्र शृंगाराची ....

Submitted by प्रकाशसाळवी on 23 June, 2017 - 22:29

रात्र शृंगाराराची...!!
---------------
तुझ्या स्मृती रात्र ठेवून गेली
ही आसवे वेदनांची भिजवून गेली
**
स्वप्ने उद्याची घेउन झोपलो मी
ही रात्र स्वप्नांची सजवून गेली
**
पाहिले तुला मी गुलाबी हासताना
चांदण्यासवे कुठे तू हरवून गेली
**
गंध प्राजक्ताचा आला पहाट वारा
मिठी रेशमाची कशी चूकवून गेली
**
काय असे हे चांदणे शिंपिले तू
कशी रात्र सारी तू विझवून गेली
**
चुंबल्याच्या खूणा अजून ताज्या तवान्या
अशी कशी खूळी रात्र विसरून गेली
**
© प्रकाश साळवी
०६-०५-२०१७

Pages

Subscribe to RSS - रात्र