गुलाम
गुलामानं धन्यासाठी आजन्म राबायचं असतं
नसतो अधिकार कसला, काहीही मागायचं नसतं
वाहतो हा गुलाम रस्ता जरी ऐसपैस
भावनांना डांबरट बांधायच असतं
कुणी पच्चकन थुकला अथवा मुतला
धन्याला मान वर करुन बोलायचं नसतं
मैलाचे दगड, दिग्दर्शन खूणा, पांढरे पट्टे चमचे सारे
वर, खाली,सरळ,वाकडं नेतील तसं जायचं असतं
अंगावर मणा मणाचं ओझं दिवसरात्र
घेऊन मालकासाठी धावायचं असतं
कुजबुजतात मालक लोक आपसात काही
ऐकलेलं कधीच कोणालाही सांगायचं नसतं
भेटला रस्त्यात दुसरा गुलाम रस्ता
डोळा मिचकावत पुढे वाहयचं असतं