संशोधन/अभ्यास

Research/Studies

आजची विशेष बातमी

Submitted by नितीनचंद्र on 7 September, 2014 - 23:11

राजकारणावर चर्चा करायला, सिनेमावर चर्चा करायला स्वतंत्र धागे आहेत. काही घटना अश्या असतात ज्या विशेष असतात जसे की एखाद्या औषधाचा लागलेला शोध ज्यामुळे खुप मोठ्या शारिरीक त्रासा पासुन सुटका होणार आहे किंवा कुणीतरी असा लावलेला शोध ज्यामुळे मानवी जीवनात काहीतरी सुखावह घडणार आहे.

काही वेळा काही अतर्क्य अश्या गोष्टी घडतात. ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते किंवा काही गोष्टी अंधश्र्ध्दा समजल्या जातात. एक दिवस असा येतो की या घडनांच्या मागचे शास्त्र जगाच्या समोर येते.

आजचीच बातमी पहा जी दैनीक सकाळच्या पान ७ वर आहे.

प्रांत/गाव: 

मुक्तांगणमधील जिव्हाळा, नितिन सर

Submitted by अतुल ठाकुर on 6 September, 2014 - 22:49

पुलंनी कुठेतरी मर्ढेकरांच्या ओळी उद्धृत केल्यात 'हर गार्डाची शिट्टी न्यारी'. मुक्तांगणच्या समुपदेशकांच्या बाबतीत ही गोष्ट अगदी खरी आहे. आपल्याला वाटतं कि व्यसनी माणसांना समुपदेशन करणारे सर्वजण वेगळं असं काय सांगणार? पण येथे प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. प्रत्येकाचा ढंग न्यारा आहे. समस्येशी भिडताना प्रत्येक जण जरी समोरच्याला व्यसनमुक्त करण्यासाठी धडपडत असला तरी त्यांच्या पद्धतीत फरक आहे. त्यामुळे यांच्याशी बोलताना कधीही कंटाळा येत नाही. मुक्तांगणला गेलात कि आधी कसुन तपासणी होते. अंबाड्यातुन तंबाखु लपवुन नेण्याचे प्रकार आढळल्याने तपासणीला पर्याय नाही. आत शिरलात कि डावीकडे वायंगणकरसर.

शब्दखुणा: 

भारतीय विद्यापीठे आणि जागतिक दर्जा

Submitted by सुमुक्ता on 5 September, 2014 - 07:53

काही दिवसापूर्वीच नालंदा विद्यापीठामध्ये पुन्हा विद्यादानाचे काम चालू झाले आहे अशी बातमी वाचली. जवळ जवळ ८०० वर्षाहूनही अधिक प्राचीन, जगातील सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांपैकी एक असे हे विद्यापीठ भारतीयांच्या अभिमानाचे स्थान होते. आज तिथेच विद्यादानाचे काम पुन्हा चालू झाले आहे. आनंददायक अशीच घटना आहे. पण पुन्हा जगातील सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांपैकी एक हे स्थान मिळविणे नालंदा विद्यापीठास बरेच अवघड आहे असे वाटते.

चंद्रमोहन शर्मा त्याचा गुन्हा आणि तपास

Submitted by नितीनचंद्र on 29 August, 2014 - 23:51

चंद्रमोहन शर्मा कालच्या आणि आजच्या क्राईम रिपोर्ट मधे झळकतो आहे त्याच्या कृष्ण कृत्यांच्या यादीमुळे. हिचकॉक ला लाजवेल असा हा प्लॅन केवळ बायकोला सोडुन गर्लफ्रेंड मिळावी इतकाच नव्हता तर बायकोला पोटगी द्यायला लागु नये. पहिल्या बायकोला अनुकंपा तत्वावर आपल्या कंपनीत नोकरी मिळावी. कंपनीकडुन विम्याची रक्कम मिळावी यासाठी त्याने एका माणसाला कारमध्ये ठेऊन ती पेटवुन दिली.

मोबाईल वरुन हॉटस्पॉट्ने नेटल्यास काही तोटा/दोष आहे का ?

Submitted by नितीनचंद्र on 27 August, 2014 - 02:47

बी.एस.एन.एल चे ब्रॉड बॅड मी गेले ३-४ वर्षे वापरत होतो. सर्व्हीस चांगली होती. पण गेले तीन महिने सर्व्हीस चा प्रॉब्लेम आहे. महिन्यात १५ दिवस सर्व्हीस तुटक असते. किंवा नसते.

तक्रार करुन काही उपयोग नाही. ( खाली लगेच मी लिहले म्हणुन प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत " अच्छे दिन आने वाले है "

पर्याय म्हणुन आयडीया मोबाईल वर नेट पॅक लोड केला ज्याचा अनुभव चांगला आहे.

हॉटस्पॉटवर सुध्दा नेट/ लॅपटॉप चालत आहे. किंचित स्लो आहे पण ठिक आहे.

कायम चालवायला काय हरकत आहे ?

शब्दखुणा: 

वारे जरासे गातील काही...

Submitted by अ. अ. जोशी on 23 August, 2014 - 10:18

वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही

झाकून डोळे हसलीस ओठी
कळले तुझ्या मौनातील काही

म्हण तू स्वतःला पाषाणहृदयी
ढळलेत बघ डोळ्यातील काही

घायाळ करती हृदयें हजारों
नजरा तुझ्याही कातील काही

संसार सागर जातील तरण्या
बुडतील काही, न्हातील काही

दुःखे जगाची का रंगवू मी?
जगतो सुखाने त्यातील काही

सोडू नये सुख, कुठल्या क्षणाचे
मिळते जरी अंशातील काही

किंवा / आणि

वेसण कशाला घालू सुखाला?
मिळते किती? अंशातील काही

अंधार जितका, तितकीच आशा...
उजळेल कोनाड्यातील काही

घ्यावे 'अजय' सारे जे हवे ते

मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय

Submitted by फारएण्ड on 21 August, 2014 - 02:30

खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्‍या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्‍या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 01:59

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

माहिती हवी आहे

Submitted by नितीनचंद्र on 16 August, 2014 - 00:17

मध्यंतरी एका पी.एच. डी च्या मुलाखतीला ( प्रेक्षक म्हणुन ) जाण्याचा योग आला. सध्या मी काही काळ नोकरी सोडुन छोटासा व्यवसाय सुरु केला आहे.

भरपुर वेळ आहे तेर पी.एच डी का करु नये असे मनात येते आहे.

माझी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे. काही कारणामुळे मला मास्टर्स डिग्री मिळाली नाही. अश्यावेळी पी. एच डी ला भारतात कुठे अ‍ॅडमिशन मिळु शकते का ?

अनेक युनिव्ह्र्र्सिटीज चे एलिजिबीलिटी क्रायटेरीया पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतात तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मात्र मास्टर्स डिग्रीचा उल्लेख करते.

यु.जी,सी नेमके काय म्हणते ?

Pages

Subscribe to RSS - संशोधन/अभ्यास