हिंदू समाजातील उपवर मुलांसाठी पोषाखाची कमतरता आणी त्यावर उपाय.

Submitted by बाळू पॅराजंपे on 25 March, 2015 - 14:03

गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षा ने जाणवू लागलेली आहे. विशेषतः पुण्या मुंबईबाहेर आणी आय टी व्यतिरिक्त इतर क्षेत्रात नोकरी करणार्‍या मुलांच्याबाबतीत तर जास्तच. शेती किंवा भिक्षुकी करणार्‍या मुलांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात सत्तर मुले आणी तीन मुली आल्या होत्या. तीनही मुलींनी मुलांचे पोषाख परिधान केले होते. मुलींनी परिधान केलेले पोषाख नको असं म्हटल्याने पोषाखाचे पर्याय कमी होत चाललेले आहेत. आधीच मुलांसाठी पर्याय अल्प असतात.

या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.

१ . हिंदू मुलांनी पुरूषीच पोषाख हवा हा आग्रह सुरुवातीलाच सोडून देणे. मुलींनी पुरूषी पोषाखावर कब्जा केला असल्यास मुलींच्या पोषाखात बदल करून ते मुलांसाठी वापरण्यास हरकत नसावी. काही वर्षे पोषाख शोधण्यात गेल्यावर धोबी का कुत्ता अशी गत झालेली अनेक मुले पहाण्यात आहेत.

२ मुस्लिम समाजाप्रमाणे मुलांसाठी शेरवानी आणि मुलींसाठी बुरख्या ची प्रथा सुरु करणे.

इतर दूरगामी उपायांचे व सूचनांचे स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाण!

केव्हढा ज्वलंत प्रश्न! अजूनपर्यंत कुणाचेहि या विषयाकडे लक्ष जाऊ नये आँ!
एकूणच लग्नांमधे बायकांचे फारच नखरे असतात - कपडे काय, मेंदी काय, हेअरस्टाईल काय?? बिचारे नवरे! इतर पुरुषांकडे तर कुणाचेहि लक्षच नसते!!
Proud

बिचारे नवरे! इतर पुरुषांकडे तर कुणाचेहि लक्षच नसते!!>>>>>हे काय ते येकदम खर बोल्लात. त्या नवरे मन्डळीन्सकट इतर पुरुषान्चे व बायान्चे पण या नटमोगर्‍यान्कडेच लक्ष असते.

शेरवानीचे बिल मुस्लिम समाजावर का फाडत आहात?

शाहरूख खान ती घालून लै जा लै जा दिल लै जा लै जा करत नाचतो म्हणून?

की त्याला ते तसे घालायला सांगणारी फराह खान असते म्हणून?

मी ऋन्मेष, जन्माने हिंदू, माझ्या लग्नाचे सात फेरे शेरवानी घालूनच घेणार आहे.

आणि माझ्या या पोशाखाला माझी ग'फ्रेंड राजी झाली आहे.

ओये शाहरुखदा पन्खे. जरा मैनु ये वता के तेरी कुडी राजी कैसी होगयी रे? के वो सोणी कुडी तेरेनु बल्ले बल्ले करके नचावान्गा है. जरा गफ्रेन्ड नाल जाके ये पता लगा के वो क्या पहेणेनेवली ए. गल सुन तू मेरी पैले. आया वड्डा शारुखदा पन्खा.

जरा गफ्रेन्ड नाल जाके ये पता लगा के वो क्या पहेणेनेवली ए.
>>>>>
रश्मीताई धागा मुलांच्या पोशाखाचा आहे तर मुलींच्या पोशाखाच्या अवांतर पोस्ट का टाकत आहात.. नंतर मी याचे उत्तर दिले तर धागा विषयबाह्य करण्याचे बिल माझ्या नावावर पडते Sad

झकासरावांना एक मात्रा उगाच दिसते.
Happy

मी झक्कीकाकांना तेच लिहिणार होते.
आजकाल आनंदी लोकांमुळे पुरुष नटून सजून आले तर लग्नं इत्यादी समारंभात त्यांच्याकडेही पाहणारे दिसतील.

"गे" बोलाय्ला इत्के का लाजायचे म्हंतो मी

तसंबी वंगाळ श्बूद बी इंग्लीशमधी बोल्ले त चाल्ते ना राव हा तर आनंदी शोब्द Wink

आजकाल आनंदी लोकांमुळे पुरुष नटून सजून आले तर लग्नं इत्यादी समारंभात त्यांच्याकडेही पाहणारे दिसतील.
------ सौन्दर्य हे बघणार्‍याच्या नजरेत असते, त्यामुळे समोरच्या व्यक्तीने काय परिधान केले आहे याला खुप महत्व रहात नाही :स्मित:..

उदय, ते आहेच.
मलाम्हणायचंय मुली नटून थटून येतात म्हणून लोक त्यांच्याकडे बघत बसतात तसे मुलं नटून थटून आली तर त्यांच्याकडेही लोक बघतील की!
Wink

ऋन्मेऽऽष तुझे लग्न झाले आहे न ? मला आसे कोठल्यातरी धाग्यावर वाचलेले दिसते.

सॉरी जर मी हे खाजगी विचारात असेन.

नाही म्हणजे मला बाकापोरे आसोन गर्ल फ्रेंड ठेवणाऱ्या आणि त्याबद्दल बिंधास बोलणार्या पुरुषाबद्दल भयंकर आदर आहे . कसे की जमते हे ?

प्रशू, तुम्ही धाग्याच्या अनुशंगाने काही पोस्ट लिहिली तर मिस व्हायला नको म्हणून आम्ही विपूत वगैरे न जाता इथेच ठिय्या देऊन बसलोय.
Wink

Pages