स्रीया
महिलाही जाणू लागल्या
सामाजिक जबाबदार्या
चांगल्या समाज निर्मितीच्या
घेऊ लागल्या खबरदार्या
झपाट्याने होणार्या प्रगतीच्या
स्रीयाही कारण झाल्या आहेत
सत्कार्य करता-करता मात्र
कुकर्मातही पुढे आल्या आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
शिकताना
शिकण्यासाठी खुप आहे
शिकणाराने जाणले पाहिजे
सदैव शिकण्याचे ध्येय
नसा-नसात भिनले पाहिजे
कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी
कधीच कुठलेही भय नसते
कधीही काहीही शिकू शकतो
शिकण्याला ठराविक वय नसते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्य
नैतिकतेचा आजकाल
का राहिला नाही धाक
सत्य जरी दिसलं तरी
का असते डोळेझाक,.?
सत्य बघतात लोक
सत्य जगतात लोक
सत्य बघता-जगता का
सत्य झाकतात लोक,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:
आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.
महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com)
घडणार्या गोष्टींत
हव्या असलेल्या गोष्टींसह
नको त्याही गोष्टी असतात
हव्या,नको त्या गोष्टींसाठी
पुन्हा-पुन्हा पुष्टी असतात
कुणी नटलेले असतात तर
कुणी मात्र तटलेले असतात
कित्येक घडणार्या गोष्टींमध्ये
दोन्ही नाट्य थाटलेले असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मुलाच्या हट्टात
स्री-पुरूषांतील विषमतेचा
अनुभव सदैव आला जातो
मुलगा नाही होत म्हणूनही
इथे स्रीचा छळ केला जातो
पारंपारिकतेचा टच घेऊन
अर्वाचिनतेवरती गदा आहे
मुलाचा हट्ट धरता-धरता
असंबध्द कुटूंब मर्यादा आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
अंधश्रध्देत
जिथे श्रध्देनं लोक जातात
तिथेही अंधश्रध्देत बुडतात
असे अंधश्रध्देचे प्रकारही
आता दाटीवाटीने घडतात
डोक्या-डोक्यात प्रगल्भ अशा
अंधश्रध्देच्या खाई आहेत
अन् अंधश्रध्दा पसरविण्याला
हल्ली बुवा बरोबर बाई आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भक्ती,...!
आहेत भक्त भोळे म्हणून
हवे तसे भुलवले जातात
भक्तांच्या भोळे पणावरच
कुठे उद्योग चालवले जातात
कित्तेक श्रध्देच्या ठिकाणीही
भोंदूगीरी सादरलेली आहे
वाढत्या दांभिक प्रकरणांमुळे
भक्ती मात्र भेदरलेली आहे,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३