मेंदुविज्ञान

प्रबळ मेंदु - डावा की उजवा ?

Submitted by बाजिंदा on 9 January, 2016 - 10:58

वर्तमानपत्रात आलेल्या एका क्विझवरुन खालील प्रश्न लिहिलेले आहेत.
तुमचा कोणता मेंदु प्रबळ आहे हे खाली प्रश्नोत्तरावरुन ओळखता येऊ शकेल
१. तुम्ही नातेवाईकांशी , मित्रांशी वाद घालताना तुम्ही कुठ्ला मार्ग अवलंबता ?
अ. अवास्तव आणि कल्पित मुद्दे मांडता.
ब. तथ्य आणि डाटा वापरता.

२. जर तुम्हाला १ आठवड्याची परदेशात जाण्याची फुकट संधी मिळाली तर तुम्ही कोणाला बरोबर न्याल ?
अ. आईवडिलांना
ब. गफ्रे/ बॉफे / मित्र

३. तुमच्या ऑफीसमध्ये जर मतदान घेतलं तर तुमचे मित्र तुमचा उल्लेख कसा करतील ?
अ. सर्वांबरोबर मिसळणारी व्यक्ती
ब. एकलकोंडी व्यक्ती

४. सकाळी कपडे घालताना तुम्ही

मेंदुतला माणुस

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 March, 2015 - 03:24

हे पुस्तक माणसातल्या मेंदुवरच नाही तर मेंदुतल्या माणसावरच आहे. म्हणजे पुस्तकाच स्वरुप हे रोजच्या व्यवहारातल मेंदुविज्ञान अस आहे. रंजकता व सुलभीकरण हे वैज्ञानिक आशयाला बाधा आणणारे असते असा गैरसमज जो असतो तो या पुस्तकाने नक्की दूर होतो. पुस्तकाची शैली ही वाचकाभिमुख आहे. चांगले नातेसंबंध जपण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी विज्ञान हे एक साधन आहे अशी लेखकद्वयांची धारणा आहे. को॓हम्‍ हा प्रश्न अध्यात्मात जेव्हढा गहन आहे तेवढाच विज्ञानात. माझ्या जगण्याचे प्रयोजन काय? जाणीव म्हणजे काय? आकलन म्हणजे काय? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपापल्या परीने वैज्ञानिक व तत्वज्ञ करीत आलेले आहेत.

Subscribe to RSS - मेंदुविज्ञान