प्रवास
चारचा चहा
चारचा चहा touch screen असतो!
कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि
आतल्याआत मस्तसे हसतो,
How's the day? म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!
चारचा चहा screen saver असतो!
शरीराचा tab refresh करतो
मनाचे software update करतो,
What's on your mind? म्हणून
खोडीलपणे विचारतो!
चारचा चहा google map असतो !
मनाचा cursor global होतो
पण हातातला mouse local च राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो
अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !
- शिवकन्या शशी
प्रवास
आरशासमोर मी उभी निरखीत भाव चेहर्यावरचा
माझा आणि माझ्या मनातल्या अनेकांचा!
सारा प्रवासच रंजक होता
बालपणातच प्रारंभ दडला होता!
लहानपणीच लागलं जमायला
शब्दफुलांचा वापर करायला!
स्वार्थ कुणाला चुकलाय
त्यातच परमार्थ दडलाय!
मग मला छंदच लागला,
चेहर्यांच्या आतलं धुंडाळायचा!
स्वत:च्या मनातलं लपवत
दुसर्याच्या मनातलं ढोंग ओळखायचा!
काळ आता थकला, आरशापुढे नग्न झाला
चेहर्यावरचं ओझं बाजूला करत अंतरंगात डोकावला!
कधीतरी बरसलेलं निरागसत्व
शोधत शोधत शांत झाला!
जम्मू, काश्मीर व कारगिल प्रवासाबद्दल माहिती हवी आहे.
येत्या मे २०१८ मध्ये आई, बाबा व माझा नागपूरहून जम्मू, काश्मीर व कारगिल ला जाण्याचा बेत आहे. सोबत मावसभावाचे ४ जणांचे कुटुंब सुद्धा येण्याची शक्यता आहे (एकूण ७ व्यक्ती; २ ज्येष्ठ नागरिक, ३ प्रौढ, २ मुले ). आमची जम्मू, पटनीटोप, पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग, श्रीनगर व कारगिल ला भेटी द्यायची इच्छा आहे, मात्र श्रीवैष्णोदेवी टाळायचे आहे. त्यामुळे जम्मू हून प्रवास सुरु करून श्रीनगर ला संपवण्याचा बेत आहे. मेकमायट्रीप वा तत्सम websites वर अचूक माहिती दिलेली नाही.
प्रवासात टिपलेले काही मोर....
शब्द-चित्र : जिवलगा राहिले रे दूर घर माझे
जिवलगा राहिले रे दूर घर माझे
हे गाणे लहान पणापासून मनावर खोल प्रतिमा सोडून गेले आहे. जसे संगीत शिकत गेलो आणि काव्य आवडू लागले तशी ही प्रतिमा आणखीन अमूर्ततेकडे परावर्तित झाली.
-----------------------------------------------------------------------------------------------
दूर , धूसर होत गेलेल्या क्षितिजावरून येणार्या षड्जाने भरून राहिलेल्या आसमंतात जिवलगाच्या स्मरणाचे आर्त तरंग उमटवणारा कोमल ॠषभ ..
मनातील प्रतिमेतल्या घराचे दू ssssss र पण कोमल धैवताच्या श्रुतीप्रमाणे व्याकूळ करणारं
मुशकुव्हॅली, द्रास.
'नारळीपौर्णिमेला आपण पॅंगॉन्ग लेक ला रात्र काढायची' या एका गोष्टीभोवती आमचा लेह-लडाखचा दौरा आखला गेला.'
पारंपरिक टूर्सप्रमाणे नुसतं स्थलदर्शन न करता,जमलं तर एखादा ट्रेकही करावा अशी योजना ठरली. द्रास ला जाईपर्यंत परिस्थितीनुसार सोयीने हलण्याचं देखील नक्की झालं. आणि आम्ही साधारण १३ जण लेह-लडाख च्या दौऱ्यावर जायला तयार झालो.
ताडोबा - माहिती हवी आहे
नमस्कार...
गेल्या वर्षीपासून ताडोबाला जायचे होते... पुढे पुढे ढकलत आता या मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात जायचेच आहे...
इथे बरेच जण आपल्या प्रवासाची वर्णने देत असतात..
त्यामुळे मला वाटतं की ईथे व्यवस्थित माहिती मिळेल. मला पर्यटनासाठी जावे वाटण्यात खुप मोठा वाटा या वर्णनाचा व प्रकाशचित्रांचा आहे.
प्रवासाची सुरवात पुण्यातुन होईल, आम्ही दोघे आणि 5 वर्षे वयाची लेक आहे. ४-५ दिवसांची सफर असावी असे वाटते. जाताना कसे जायचे, काय काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करु नये ह्या सर्व गोष्टी बाबत मार्गदर्शन व्हावे.
प्रवासात औषधे थंड ठेवण्यासाठीची साधने
नमस्कार,
जी औषधे नेहमी थंड तपमानात ठेवावी लागतात अश्या औषधांकरता प्रवासात कोणती कूलर बॅग वापरावी? त्यात जास्तीत जास्त किती काळाकरता औषधे थंड राहू शकतात? आठ-दहा दिवसांच्या प्रवासाकरता जर मध्ये कुठेच फ्रिजची व्यवस्था नसेल तर कोणती कूलर बॅग वापरणे फायद्याचे आणि सोयीचे ठरेल? मी नेटवर शोधाशोध केली तर ३० तास कुलींगकरता आठ हजार रुपये वगैरे किंमतीच्या बॅगा उपलब्ध आहेत. तुम्हा कोणाला अश्या बॅगा वापरायचा अनुभव असेल तर तुमचे अनुभव जरूर मांडा.
अनेक धन्यवाद.
आरण्यक - मिलिंद वाटवे
एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..