ताडोबा - माहिती हवी आहे

Submitted by सुहृद on 29 March, 2017 - 04:09

नमस्कार...

गेल्या वर्षीपासून ताडोबाला जायचे होते... पुढे पुढे ढकलत आता या मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात जायचेच आहे...
इथे बरेच जण आपल्या प्रवासाची वर्णने देत असतात..
त्यामुळे मला वाटतं की ईथे व्यवस्थित माहिती मिळेल. मला पर्यटनासाठी जावे वाटण्यात खुप मोठा वाटा या वर्णनाचा व प्रकाशचित्रांचा आहे.

प्रवासाची सुरवात पुण्यातुन होईल, आम्ही दोघे आणि 5 वर्षे वयाची लेक आहे. ४-५ दिवसांची सफर असावी असे वाटते. जाताना कसे जायचे, काय काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करु नये ह्या सर्व गोष्टी बाबत मार्गदर्शन व्हावे.

हे कोणत्या ग्रुप मधे टाकावे नाही कळल्यामुळे इथे टाकत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताडोबाला आम्ही 2011 साली गेलो होतो.
50° तापमान होते.पण मे महिन्यात गेल्यामुळे पाणवठ्यांवर साइटिंग चांगले होते. आम्हाला खुप वाघ दिसले होते...

मी ताडोबाला गेले नाहीये अजून, पण मागच्या वर्षी एक सफारी केली त्यावरून लिहीते.

१. ह्या सफारींमध्ये जीपमधून उतरलेलं चालत नाही. वन्यप्राणी व पक्षी बघायची आवड आहे म्हणूनच ताडोबाला जाता आहात हे स्पष्ट आहे, त्यामुळे दुर्बीण घेऊन जाच. जर नसेल तर नक्की विकत घ्या, चांगली गुंतवणूक आहे.

२. कपड्यांचे रंग पर्यावरणाशी मिळते जुळते असतील हे बघा. ऑफ व्हाईट, ग्रे, हिरवा ह्या रंगाचे कपडे चालतील. भडक रंगाच्या कपड्यांमुळे प्राणी-पक्षी बिचकतात.

३. मे मध्ये तिथे कडक उन्हाळा असेल. टोपी, गॉगल नेणं श्रेयस्कर. तसंच ह्या सफारींमध्ये मोठ्या आवाजात गप्पा/बडबड करून नाही चालत हे लक्षात ठेवावं.

धन्यवाद सर्वांना..

निरु तुम्ही बुकिंग कसे केले होते याची माहिती देऊ शकाल का?

आऊटडोअर्स मुद्दे लक्षात आले आहेत.. काळजी घेईन.

booking is done online. Pls keep in mind that you have to carry identification proof with you. You can not take extra person along with you apart from those declared while booking. Else they will ask you to pay Rs.1000/- per extra person.

must cover face n hair as far as possible because of dust.

<<<<निरु तुम्ही बुकिंग कसे केले होते याची माहिती देऊ शकाल का?>>>

मी ठाण्याच्या विहंग ट्रॅव्हल्स बरोबर गेलो होतो...

आरे वा नक्की जा मी २०१४ ला जाऊन आलो माझ्या दोन्ही मुलांना घेऊन ... उत्तम सोया आहे तिथे आणि खूप नीट मैण्टिन ठेवला आहे.
मुलं पण नक्की एन्जॉय करतील ... अजून एक सल्ला फक्त वाघ वाघ असा ना करता इतरही प्राणी पाहावे उदाहरण अस्वल, कोल्हे, गवे (कोळसा ला खूप गवे आहेत) मोर ... तसेच बरेच पक्षी पण दिसतात ...

कपड्यांचे रंग पर्यावरणाशी मिळते जुळते असतील हे बघा. ऑफ व्हाईट, ग्रे, हिरवा ह्या रंगाचे कपडे चालतील.
मे मध्ये तिथे कडक उन्हाळा असेल. टोपी, गॉगल नेणं श्रेयस्कर.

अजून एक सल्ला फक्त वाघ वाघ असा ना करता इतरही प्राणी पाहावे उदाहरण अस्वल, कोल्हे, गवे (कोळसा ला खूप गवे आहेत) मोर ... तसेच बरेच पक्षी पण दिसतात ...>>>> हा सल्ला फारच महत्वाचा आहे. काल मी पण हे लिहीणार होते पण राहून गेलं आणि नंतर लिहायचा कंटाळा केला.

मागच्या वर्षी आम्ही बांधवगडला जाऊन आलो. मी पहिलट्करीण होते. पाच सफारींमध्ये वाघ दिसलाच नाही, अगदी पहिल्या दिवशी जितका दिसला त्याला दिसला म्हणणं अयोग्यच होईल. दुसर्‍या जीपमध्ये असणार्‍या आमच्या ग्रूपला २-३ दा मस्त दर्शन झालं. Proud पण मला फार काही वाईट नाही वाटलं खरंतर, कारण मी ते जंगलाचं वातावरण प्रचंड एन्जॉय केलं. इतक्या पक्ष्याची नावं खरंतर पहिल्यांदाच ऐकली मी. मला तिथून परतच यावंसं वाटत नव्हतं. घरी आल्यावर बाबांशी बोलताना त्यांना सगळं सांगताना वाघ नाही दिसला अजिबात हे सांगितल्यावर त्यांचा प्रतिसाद मजेशीर होता. ते म्हणाले नाही दिसला प्रत्यक्षात मग काय झालं? आपण टिव्हीवर बघतो नां. Uhoh Lol

आऊट्डोअर्स...मस्त अनुभव...
सर्वांनी सांगितलय तरी परत एकदा सांगते...विदर्भातल उन जरा जपुनच..यावर्षी तापमान जरा जास्तच आहे त्यात तुम्ही मे मधे ५ वर्षाच्या चिमुरडीला घेऊन जाणार म्हणजे व्यवस्थित इंतजाम करुन जा..माठातल थंड पाणी प्या, फ्रिजच पाणी निदान उन्हात तरी टाळा, रुमाल, सुती कपडे, टोप्या सगळं जवळ ठेवा...सोबतीला ग्लुकोज किंवा खडीसाखर जिर्‍याचं पाणी वरचेवर पित राहा..वॉटर्लेव्हल आणि एनर्जी मेंटेन राहिल..
तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा... Happy

टीना + १
मे महिना ताडोबा लहान मुल वाचुन हेच डोकयात आलं पहिलं माझ्या.
योग्य ती काळजी घ्या.

नक्की काळजी घेईन..
खरतर अजुन बुकिंग केलेले नाही.
अंदाज घेत आहे
झेपणेबल वाटल नाही तर जुन मधे छोटी मोठी सहल करेन... 8 ते 10 दिवसात ठरेल..

शक्य असल्यास मोहर्ली गेट वरुन सफारी घ्या..
तिकड़े या सुमारास temp खूप (above 50) असल्याने काळजी घेणे.. शुभ यात्रा

तुमची मुलगी पाच वर्षांची आहे म्हणून एक शंका आली.
जंगल सफारीमध्ये बराच वेळ शांत बसावं लागतं, सारखे काही प्राणी / पक्षी दिसतीलच असं नाही. दिसले तरी बरेच वेळा लांबून / अर्धवट दिसणारे प्राणी बघायला मुलांना मजा वाटत नाही. दुर्बिणीतून नेमकं काय बघायचं हे समजत नाही. लेक कंटाळणार नाही ना?

काळजी घेतली तर काही हरकत नाही गं...
लोक राहतातच ना तिथेपन.. पण इकडल्या पेक्षा तिकडे उन जास्त म्हणुन अगाऊ काळजी घ्या एवढचं..

स्वधा आहो जा काही काळजी नका करू फक्त मुलीचे कांन नीट बांधा आणि जवळ सतत एक कांदा बाळगा ... पहाटेची सफारी असते तेव्हा उन्हाची काळजी नाही पण दुपारची सफारी मात्र जरा जपून करा

>>जंगल सफारीमध्ये बराच वेळ शांत बसावं लागतं, सारखे काही प्राणी / पक्षी दिसतीलच असं नाही. दिसले तरी बरेच वेळा लांबून / अर्धवट दिसणारे प्राणी बघायला मुलांना मजा वाटत नाही. दुर्बिणीतून नेमकं काय बघायचं हे समजत नाही. लेक कंटाळणार नाही ना?--

हो हे ही खरे आहे. मुले कंटाळतात. रणथंबोर सफारीच्या वेळी माझा मुलगाही ५ वर्षांचा होता, तो शांत बसायचा नाही मग इतर लोक वारंवार लुक द्यायचे. पण मुलं आवाज करणारच ना. पहाटेच्या सफारीसाठी उठुन आवरणे मुश्कील व्हायचे , मी फक्त दुपार आणी संध्याकाळ सफारी केली होती. अर्थात मी थंडीत गेले होते म्हणुन दुपार सुसह्य होती, इनफॅक्ट सुखद होती.

My son loved jungle safari. Thrice we went to various jungle resorts kabini, b r hills and (obviously) bannerghatta. No tiger sighting either in kabini or br hills but he was excited about whole looking for tiger exercise. Finding tiger paw. At bannerghatta we saw so many tigers and lions but till date finding tiger paw at kabini is awesome most thing happened to him. We gave him binocular and his own camera (old first digital camera). He was all set for nature. kids enjoy jungle.

गौरी ती ही शंका आहेच... जायचा मोह सोडवत नाही आणि पिल्लूची काळजी वाटतेय..>>>>>> मी माझ्या लेकीला ती साधारण साडेतीन चार वर्षांची असल्या पासुन नेहेमी नेते सफारीला. बर्याच वेळेला नणंदेच्या दोन मुलांना पण घेउन जाते.मुलांबरोबर जाताना काही पुर्वतयारी म्हणजे
1-सफारीत काय असते हे आधी सांगुन मुलांना आधी excite करुन ठेवणे
2- सफारी दरम्यान काही शांत पणे करण्यासारख्या गोष्टी बरोबर ठेवणे (चित्रकला / जिकडे तिकडे चिकटवायला टिकल्या / rubic cube वगैरे )
3- उन्हासाठी टोप्या / scarf भरपुर बाळगणे - हवेने उडतात कधी कधी
4- खायला न आवज करणारा खाउ बरोबर ठेवणे (चुरचुर वाजणार्या प्लास्टिक पिश्व्या नको )
5- शक्यतोवर सम्पुर्ण सफारी आपण आप्ल्या साठी ठेवणे म्हणजे मुलांच्या आवाजाचा इतरांना त्रास होत नाही .... अर्थात वरची सगळी पथ्य पाळल्यावर माझ्या बरोबर कधीच मुलांनी त्रास नाही दिलेला.
6- Birds of Indian continent आणि Indian animals ही दोन पुस्तकं मी दरवेळी बाळगते. प्रत्येक सफारी नंतर आज काय पाहिलं हे त्या पुस्तकात मुलंबरोबर शोधतो. त्यांना प्रचंड आवडतं....
7- मुलांसाठी स्वतंत्र दुर्बिण असावी ..ही साधी पण चालते पण त्याना focus न करता आल्याने आपली दुर्बीण सारखी out of focus होत नाही आणि त्यांना पण special वाटते.

एकुणच ट्रिप साठी महत्वाचे म्हणजे आधीच चांगला गाईड शोधणे . मी जनरली नेट वर चांगला आणि स्थानिक naturalist शोधते आणि त्यालाच आमच्या सफारी arrange करायला सांगते ... आणि हे ही सांगते की मला वाघ बघायचाय पण जंगल /इतर प्राणी / पक्षी पण बघायचे आहेत ....

मे महीना प्राणी बघायला एकदम छान ... मी ताडोबा / कान्हा /गीर / रणथंबोर मे मध्येच पाहिले आहेत. दरवेळी लेक होतीच बरोबर . योग्य काळजी घेतल्यावर अजीबात त्रास झाला नाही ....
मस्त होईल तुमची पण Trip

ताडोबा नावाचं खूप छान माहितपूर्ण पुस्तक आहे. ते विकत घ्या आणि वाचा. सफर नक्कीच यशस्वी होईल.

नक्की काळजी घेईन..
खरतर अजुन बुकिंग केलेले नाही.
अंदाज घेत आहे
झेपणेबल वाटल नाही तर जुन मधे छोटी मोठी सहल करेन... 8 ते 10 दिवसात ठरेल..
>>>>
ईथे माहिती मिळेल
https://www.maayboli.com/node/77048

बुकिंग साठी
विद्यानंद जोशी ९८३३४६४०३३

Enjoy your trip!