पद्मावत - परीक्षण

Submitted by भागवत on 27 January, 2018 - 03:37

भव्य आणि उंच देखावे आणि सेट्स, उंची वस्त्र, कलाकारांची दमदार फळी आणि अभिनय, उत्तम छायाचित्रण आणि संवाद घेतलेली विशेष मेहनत चित्रपटात जाणवते. चित्रपटाचे पार्श्वसंगीत श्रवणीय आणि प्रभावी आहे. रजपूत लोकांची अस्मिता, लढाऊ बाणा, त्यांचा संयम, प्रथा आणि दिलदारपणा यांचा चित्रपटावर विशेष प्रभाव जाणवतो. संजय लीला भन्साळी यांचे दिग्दर्शन आणि त्यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. कोणताही चित्रपटाची कल्पना आणि पात्र आधी दिग्दर्शकाच्या विचारात आणि डोक्यात उतरतात त्याचं प्रमाणे सगळी कथा भन्साळी यांच्या दिग्दर्शनात दिसून येते.

खिलजीच्या व्यक्तिरेखेला रणवीर सिंगने पुर्ण न्याय दिला आहे. खुंखार दाखवण्यासाठी सतत विकृत हसण्याची गरज नाही. पण पूर्ण चित्रपट तो खातो. त्याची सवांदफेक जबरदस्त आहे. त्याने खिलजीचे बोलणे, विकृत वागणे आणि चालणे छान रित्या वठवलेले आहे. पात्राची क्रूरता रणवीरच्या अदाकारीत जाणवतो. काही दृश्या मध्ये रणवीरने जान आणली आहे. पण कधी-कधी त्याचा वरवरचा अभिनय आणि त्याचा वरचा जास्त फोकस कंटाळा आणतो. एक ताकतवर, खुनशी, आपमतलबी, धोकेबाज आणि क्रूर असे विविध पदर व्यवस्थित उलगडले आहेत रणवीरने. त्याची तारीफ तर व्हायलाच पाहिजे.

काही संवाद जबरदस्त आहेत. लढाईचे काहीच क्षण दाखवलेले नाहीत. लढाईचे सीन जास्त खुलवायला पाहिजे होते. बाहूबलीचे लढाईचे दृश्य आणि कथा जसा त्या चित्रपटाचा आत्मा आहे त्याच प्रकारे फक्त कथा पद्मावत चित्रपटाचा आत्मा आहे. घुमर गाणे चांगल्या रित्या छायाचित्रित केले आहे. त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. इतर गाणी लक्षात राहत नाहीत. होळीचा प्रसंग मस्त खुलवलाय. एकमेकांना रंग लावण्याचा क्षण सुंदर झाला आहे. संवाद उत्तम रित्या लिहिले आहेत. एक-दोन दृश्यावर लोकांना हसू येते. दिग्दर्शक चित्रपट करताना किंबहुना कलाकार कला सादर करताना थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेत असतो. भन्साळी यांनी सुद्धा घेतली. बाजीराव-मस्तानी वेळेस त्यांनी बाजीराव या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला नाचताना दाखवले आहे. या वेळेस राणी पद्मावतीला “घुमार” आणि खिलजी व्यक्तिरेखेला “खली बली” या गाण्यावर नाचताना दाखवले आहे.

एका प्रसंगात शाहिदचे डोळे बोलतात. त्याचा संयत अभिनय भावतो. चित्रपट जरी रणवीरची व्यक्तिरेखे वर जास्त फोकॅस करतो तरी शांत डोक्याचा शाहीद कुठे तरी भावतो. शेवटच्या लढाईचे क्षण सुद्धा ट्राय चित्रपटाची आठवण करून देतात. शेवटच्या लढाईत बाण लागलेले दृश्य मनावर ठाव करते. महारावल रतनसिंगया व्यक्तिरेखेचे पद्मावती वरील प्रेम, त्याग, रजपूताची मान आणि प्रतिष्ठा यांचे अभिनया द्वारे सुंदरपणे रेखाटले आहे. होळीचा प्रसंगाची दृश्य सुंदर आहेत. त्याचा “चिंता को तलवार की नोक पे रखे है ओ राजपूत” हा संवाद जबरदस्त आहे.

राणी पद्मावती पात्र दिपिका अक्षरश: जगली आहे. जंगलात राहणारी राजकुमारी, प्रेमिका आणि महरावल रतनसिंग यावरील प्रेम अतिशय उत्तम सादरीकरण केले आहे. हरणाच्या मागे वेगात पळणारी राजकुमारी ते चित्तौड मध्ये राहून शत्रूचे धड पाठवण्याची अट घालणारी राणी उत्तम प्रकारे सादर केली आहे. एकाच व्यक्तीच्या विविध छटा तिने लीलया सांभाळल्या आहेत. रतनसिंगच्या पहिल्या राणी सोबत खुपच कमी दृश्य आहेत. शेवटचा अर्धा तास पूर्ण तिच्या वर केंद्रीत आहे. शेवट जवळपास सगळ्यांना माहीत आहे तरी पण तिने या प्रसंगात जीव ओतला आहे आणि नेत्रदीपक शेवट केला आहे. शेवटचे दृश्य तिने पूर्णपणे जिवंत केला आहे. शेवटच्या दृश्याचा असा परिणाम होतो की प्रेक्षक शांतपणे प्रेक्षागृह सोडतात.

तरी पण चित्रपटाचा आत्मा कुठे तरी हरवलाय. कथेला नाविन्यपूर्ण खुलवता आले असते. चित्रपट प्रमाणबद्ध चौकटीच्या बाहेर जात नाही. काही प्रसंग खुलवायचे राहिलेत. महारावलच्या सेनापतीचा शहीद होण्याचा भावनिक क्षण आणखी विस्तृत केला असता तर त्याच्या व्यक्तिरेखेला न्याय मिळाला असता. मध्ये थोडा वेळ चित्रपट संथ होतो. कधी-कधी वाटते शेवट लवकर यावा. खली बली गाण्याची गरज नव्हती. हे गान उगाच मध्ये टाकल्याच वाटते. रझा मुराद आणि अदितीराव हैदरी यांनी आप-आपल्या व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. आणि मस्त अभिनय केलाय राघव या व्यक्तिरेखेने सुद्धा. चित्रपट जरूर पाहण्या सारखा आहे. नाही पाहिल्यास रणवीर, शाहिद आणि दिपिकाच्या यांच्या चांगल्या अभिनयाला मुकाल.

चित्रपटाच्या सकारात्मक बाजू
-कलाकारांची दमदार फळी
-उत्तम कथा, भव्य आणि उंच देखावे
-देखणा अभिनय

चित्रपटाच्या कमकुवत बाजू
-लढाईचे क्षण अति उत्तम करता आले असते.
-१-२ गाणी जास्तीची घुसवली आहेत
-मध्यंतरी थोडा संथ होतो
-दुसऱ्या फळीतील कलाकाराला जास्त संधी नाही

पद्मावत१.jpgpadmvat1.jpeg

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शीर्षकात स्पॉयलर लिहिलेय पण परीक्षणात काहीच स्पॉईलर आढळले नाही. आता तर खिलजी गे होता हे सुद्धा अर्ध्या मायबोलीला समजले आहे. ते सुद्धा तुमच्या परीक्षणात नव्हते. मग नेमके स्पॉईलर काय?

स्पॉयलर व्यक्ती परत्वे बदलत जाते. काही जण उगाच नाराज होतात त्यामुळे स्पॉयलर टाकलं आहे. बाकी प्रतिसादा साठी धन्यवाद!!!

अलाउदीनचा सेनापती कम पार्टनर गफूर मालिकचा रोल केलेल्या जिम सर्भचा उल्लेख विसरलात आपण. त्याने कमाल केलीय. नीरजातील अतिरेक्याच्या रोलनंतर अशा रोलमध्ये त्याला पाहणं हे सरप्राइज ठरतं. गे असूनही त्याची हुशारी, शौर्य, अलाउदीन पद्मावती किंवा इतर महिलांविषयी बोलत असताना त्याचे बदलणारे हावभाव, हे अप्रतिमच.

चेस सुरू असताना अलाउदीन जेव्हा पद्मावतीचं नाव घेतो, तेव्हा शाहीद कपूर ज्या प्रकारे व्यक्त होतो, तेही जबरी. फक्त, त्याची उंची मार खाते. बाकी महारावलचा रूबाब, संवादफेक मस्तच वठवलीय. गोरा बादलचं काम करणारा टीव्ही स्टारही मोजक्या प्रसंगांत जान ओततो. आधी राजगुरू असलेला आणि नंतर अलाउदीनला जाऊन मिळालेल्या राजगुरूने पद्मावतीला पहिल्यांदा पाहिल्यानंतर नुसत्या डोळ्यांनी जे वखवखलेपण व्यक्त केलंय... तेही जबरी.

डिटेल प्रतिसादासाठी धन्यवाद टोच्या!!!
राघव या व्यक्तिरेखेचा उल्लेख केला आहे. मलिक गफूर या पात्रा उल्लेख राहिला आहे त्याने त्याचा रोल मध्ये कमाल केली आहे.

हो, मलिक गफुरचा रोल केलेला अ‍ॅक्टर (जिम सर्भ) ताकदिचा कलाकार आहे. गुगल केल्यावर आढळुन आलं कि हा पठ्ठा आमच्याच गांवातुन शिकलेला आहे...

करणी सेनेने अशी करणी करावे की रस्त्यावर जाळपोळ अथवा हिंसक प्रदर्शने करण्या ऐवजी एकदाच त्या भुस्नळ्याची तंगडी तोडून टाकावी . पुन्हा कुणाची हिम्मत व्हायची नाही खिल्जीचे उदात्तीकर्ण करुन इतिहासावर थुंकण्याची !

गे असूनही त्याची हुशारी, शौर्य, अलाउदीन पद्मावती किंवा इतर महिलांविषयी बोलत असताना त्याचे बदलणारे हावभाव, हे अप्रतिमच. >>
गे असूनही म्हणजे? गे हुशार नसतात? किती गे पाहिलेत? लैंगिकता व या गुणांचा नेमका काय संबंध असतो? का असेल असे वाटते? अशा डिस्क्रिमिनीशन ने काय साधले जाते?

भिडे साहेब, तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का?

असल्यास खिलजी चे उदात्तीकरण झाले असे तुम्हाला कोणत्या प्रसंगामुळे वाटते?

जर चित्रपट पहिला नसेल, तर " भन्साळी खिल्जीचे उदात्तीकरण केले आहे आणि इतिहासावर थुंकला आहे" असे विधान आपण कोणत्या माहितीच्या आधारे केले आहे?

अल्लाउद्दीन हा फक्त एक क्रूर राजा होता अशी माहिती मला शाळेत इतिहास शिकवताना सान्गितलि गेली. तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग होता. त्याने त्याच्या कारकीर्दीत अनेक प्रशासकीय, सामाजिक, लष्करी व महसुल सुधारणा केल्या. तसेच त्याने मोन्गोल सैन्याचा सहा वेळा पराभव केला. हे सर्व लिहिण्यात त्याचे उदात्तीकरण करायचा हेतु नसून फक्त माहिती देण्याचाच हेतु आहे. या पोस्टवर प्रतिसाद लिहिताना या विधानाची दखल घ्यावी ही विनन्ति.

त्याने त्याच्या कारकीर्दीत अनेक प्रशासकीय, सामाजिक, लष्करी व महसुल सुधारणा केल्या. तसेच त्याने मोन्गोल सैन्याचा सहा वेळा पराभव केला. >>>> दिल्लीचे तख्त त्याच्या ताब्यात होते. ते तसेच राहावे यासाठी प्रयत्न करायला नकोत?

दिल्लीचे तख्त त्याच्या ताब्यात होते. ते तसेच राहावे यासाठी प्रयत्न करायला नकोत?>>>>>

त्या काळचा विचार करता, सैन्य आणि दडपशाहीच्या जोरावर तख्त आपल्या ताब्यात ठेवणे जास्त सोपे होते, ते न करता त्याने अनेक प्रशासकीय, सामाजिक, लष्करी व महसुल सुधारणा केल्या.
म्हणजेच इकडच्या लोकांचे जीवनमान उंचावले.

Give devil it's due.

रच्याक, क्रूर आणि कपटी अफजलखान सुद्धा " (स्वतः:ची शत्रूची नव्हे) रयत आमचे मित्र आहेत" म्हणून लिहितो आणि तसेच आचरण सुद्धा करतो.