इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या Liane Moriarty चे Nine Perfect Strangers वाचतेय.

हेल्थ स्पामधे केवळ दहा दिवस राहिल्यास आपले आयुष्य पूर्णपणे बदलू शकते का? तसा दावा करणाऱ्या स्पामधे रहायला गेलेल्या नऊ व्यक्तींबद्दल ही कथा आहे.

पुस्तक नुकतेच वाचायला चालू केले आहे. चांगले वाटतेय. प्रकाशित होण्याआधीच निकोल किडमनने याचे हक्क विकत घेतले होते.

ही लेखिका डोमेस्टिक फिक्शन लिहिते; त्यात गरजेनुसार थोडाफार रहस्य किंवा थरार मसाला घातलेला असतो. सोपी भाषा, छोटीछोटी वाक्य असल्याने हिची पुस्तक वाचण्यात फारशी अडचण येत नाही, पटकन वाचून होतात. आधी वाचलेली इतर पुस्तकं
• Big Little Lies
• The Husband's Secret
• What Alice forgot

ऑक्टोबर महिना आहे, हलोवीन येतोय, नुकताच गुडरीड्सवर हॉरर आठवडादेखील होऊन गेला. मग काहीतरी अमानवीय केलंच पाहिजे Wink म्हणून Twilight Saga मधले पाचही चित्रपट पाहिले. मजा आली.

पुस्तकंदेखील मला आवडली होतीच.

Twilight Saga मधले पाचही चित्रपट पाहिले. मजा आली.

पुस्तकंदेखील मला आवडली होतीच.>>>>> अॅमी, Twilight Saga माझा फेवरेट आहे. पुस्तके तर खासच. अजूनही यांची सॉफ्ट कॉपी आहे माझ्याकडे, जेव्हा मूड होईल तेव्हा वाचते .

Imdb वर ५ च्या आसपासच गुण मिळणारे Twilight सिनेमा म्हणजे आपल्या पातळीच्या फारच खाली वगैरे वाटत असेल तर Kate Winslet आणि Guy Pearce ची Mildred Pierce ही एकेक तासांचे पाच भाग असलेली मिनिसिरीज बघा.

१९२९ सालची अमेरिकन मंदी, त्यामुळे बेकार झालेला नवरा, पाय-केक वगैरे बनवून घर चालवणारी मिल्डरेड आणि त्यांची मुलगी वेदा. या तिघांचा, त्यांच्या नात्याचा पुढच्या ३०-३५ वर्षांचा प्रवास. आई आणि मुलीच्या नात्यावर फारच वेगळ्या दृष्टीकोनाच काहीतरी बघायला मिळेल.

Nine Perfect Strangers वाचून झालं की कसं आहे ते जरूर सांग.
बिग लिटल लाईझचा पहिला सीजन खूपच भारी होता, दुसऱ्या सीजन मध्ये मेरिल स्ट्रीप आहे.. पण पुढच्या वर्षी येणार आहे, आय कान्ट वेट!!

काहीही धागा काढून राहिले की लोक Uhoh
सगळे शक्यतो इंग्रजीच असेल >>> मायबोली झाली इंग्रजी... Light 1

आणि असे धागे प्रत्येकजण उघडू लागले तर काय होईल... >>+१

> या तिघांचा, त्यांच्या नात्याचा पुढच्या ३०-३५ वर्षांचा प्रवास. > हे चूक लिहलं मी वरच्या प्रतिसादात. पुढच्या ५-१० वर्षांबद्दलच आहे कथा.

आताच हा एक चांगला लेख वाचला पुस्तक आणि मालिकाबद्दलचा. तिथला प्रतिसाददेखील रोचक आहे. स्पॉइलर्स अर्थातच आहेत:
https://www.theguardian.com/books/2011/jun/24/mildred-pierce-sarah-churc...

===
VB,
Lol मी एकदाच वाचली आहेत पुस्तकं आणि चित्रपटतर आता पहिल्यादा बघितले.

===
चैतन्य,
हो सांगते Happy
Big Little Lies मालिकेबद्दल मी https://www.maayboli.com/node/67215?page=4 या धाग्यावर लिहिलं होतं.

पुस्तक , चित्रपट आणि मालिकांसाठी वेगवेगळे धागे आधीच आहेत. त्या त्या जागी लिहिलं तर बरं होईल.

> पुस्तक , चित्रपट आणि मालिकांसाठी वेगवेगळे धागे आधीच आहेत. त्या त्या जागी लिहिलं तर बरं होईल. >
त्या धाग्यात सगळीच खिचडी आहे वेगवेगळ्या भाषा, जॉन्र, काल्पनिक, राजकीय सगळंच एकत्र. गर्दीत हरवून जातं जे काही लिहील असेल ते. नंतर शोधता येत नाही.

हा धागा माझ्या स्वतःच्या भिंतीसारखा असेल. मी काय करतेय ते मलाच कळेल, ट्रॅक ठेवता येईल. विरंगुळा विभागात काढला आहे आणि आठवड्यातुन एकदाच प्रतिसाद देइन त्यामुळे इतरांना फार त्रास होईल असे वाटत नाही.

हा धागा माझ्या स्वतःच्या भिंतीसारखा असेल. >> रंगी बेरंगी पान घेता येइल त्यासाठी. इंग्रजीच वाचता ते ही ट्वायलाइट वगैरे म्हणजे कठीण.
गौरी देशपां डे जी ए कुलकर्णी नेमाडे पु ल देशपांडे, सानिया आशा बगे, सुमती क्षेत्र माडे पेंडसे विजय तेंडुलकर बा भ बोरकर गदिमा, व्यंक टेश माडगुळकर वपु हे माहीत आहेत का? थोडे वाचन स्पेक्ट्रम वाढ्वल्यास वैचारिक क्षितिजे रुंदवायचा चान्स आहे. दिवाळी येतेच आहे मराठी दिवाळी अंकांची मेजवानी असते, माहेर किस्त्रिम नवल हंस नक्की घ्या आग्रहाची विनंती.

Imdb वर ५ च्या आसपासच गुण मिळणारे Twilight सिनेमा म्हणजे आपल्या पातळीच्या फारच खाली वगैरे वाटत असेल तर
>>
म्हणून नाही, पण व्हामपायर वगैरे प्रकार आवडत नाही म्हणून पाहिले नव्हते बरीच वर्षं. नंतर कधीतरी टीव्हीवर लागला पहिला सिनेमा म्हणून पाहिला तर किळसवाणा अजिबात वाटला नाही. मग सगळेच बघितले. छान आहेत.

Nine Perfect Strangers वाचून झालं. मध्यंतरापर्यंत ठीक चाललं होतं. मग ट्विस्ट आला जो मला आवडला. पण मग पुढे काहीतरी बिझारेच चालू झालं :अओ:. शेवट उगाच ओढूनताणून केलाय.
निकोलने एक शब्दही न वाचता हक्क विकत घेतले होते म्हणे. बघू काय होतंय. चांगला दिग्दर्शक मिळाला तर ठिकठाक चित्रपट/मालिका बनू शकते

Mr Mercedes चा दुसरा सीझन बघतेय. ९ भाग बघून झाले. शेवटचा १०वा आज येणार आहे.

या सिरीजमधील तीन पुस्तकांपैकी दुसरे- Finders Keepers मला सगळ्यात जास्त आवडले होते. पण मालिकावाल्यांनी ते गाळूनच टाकलंय. आणि डायरेक्ट तिसऱ्या- End of Watch पुस्तकाकडे गेलेत.

सीझन २ ठीक आहे. हे तिसरे पुस्तक मला फारसे आवडले नव्हते. पहिले पुस्तक पूर्णपणे रहस्यकथा होती. या तिसऱ्या पुस्तकात अमानवीय काहीतरी होतंय. भूतंखेतं नाहीयेत डायरेक्ट पण अविश्वसनिय, मानवजातीच्या शारीरिक, मानसिक मर्यादेबाहेरच काहीतरी चालुय. आणि पुस्तकापेक्षा मालिकेत अजूनच भरपूर बदल केलेत.

यातला खलनायकचे काम करणारा Harry Treadaway आवडला मला. पहिल्या सिझनमध्येदेखील त्याने छान काम केलं होतं.

फायन्डर्स किपर्स वर एक छान सीजन झाला असता, मला ते पुस्तकं इतकं आवडलं होतं की मी त्याची हार्ड कव्हर कॉपी घेतली होती, या सिरीजचे बरेच संदर्भ द आऊटसायडर बुक मध्ये पण येतात, ती हॉली आहे ना, ती पण द आऊटसायडर मध्ये आहे.

गुडरीड्सचे नॉमिनेशन आले आहेत, मिस्टरी सेक्शन मध्ये बहुतेक "द आऊटसायडरला" प्राईझ मिळेल, सेक्शन मधली बाकीची पुस्तकं अजून वाचली नाहीत.

नेटफ्लिक्स वर "द इन्व्हिजिबल गेस्ट" नावाचा स्पॅनिश सिनेमा बघितला, यात मल्टिपल ट्विस्ट आहेत आणि शेवटी दिल खुश प्लॉट ट्विस्ट पण आहे, याचा हिंदी रिमेक येतोय, सुजॉय घोष करत आहे. मस्त वॉच..

Finders Keepers वर एक वेगळा चित्रपटच बनवला तरी चालेल मला. त्यात ब्रॅडी नाहीय आणि बिल-हॉली-जेरोमदेखील पाहुण्या कलाकारासारखे अधूनमधून उगवतात म्हणून मालिका निर्मात्यांनी ते पुस्तक वगळले असेल.

सीझन २ चा शेवटचा भाग मी अजून पाहू शकले नाही. पण फेसबुकवरच्या पोस्ट वाचून 'शेवट छान केला आहे; लोकांना आवडला!' असे लक्षात आले. सीझन ३ येईल असे वाटते.

===
> मला ते पुस्तकं इतकं आवडलं होतं की मी त्याची हार्ड कव्हर कॉपी घेतली होती > वा! तुझ्यासारख्या वाचक, प्रेक्षकांबद्दल आदर आहे _/\_

===
गुडरीड्सचे नॉमिनेशन मीदेखील कालच पाहिले.

https://www.goodreads.com/choiceawards/best-mystery-thriller-books-2018

∆ द आऊटसायडर जिंकेल असं वाटलं का तुला. मलातर The woman in the window जिंकेल वाटलं होत यादी बघून. आऊटसायडर वाचलं नाहीय म्हणा मी अजून.

खिड्कीतल्या बाईखेरीज यादीमधलं Then she was gone हे एकच पुस्तक वाचलं आहे. आणि स्टिफन किंग आणि जेके खेरीज Tana French, B. A. Paris, Ruth Ware हे ओळखीचे लेखक.

कालच The Wife Between Us वाचायला घेतलं. सुरुवात चांगली आहे.

===
The Invisible Guest

A young businessman wakes up in a locked hotel room next to the body of his dead lover. He hires a prestigious lawyer to defend him, and over the course of one night, they work together to find out what happened.

चांगला वाटतोय! नक्की बघेन.

सध्या माझं सगळं वाचन, बघणं, ऐकणं हे इतरांच्या अभिप्रायानुसार करतो. इतरांकडूनच काही छान दुवे मिळालेत. त्यामुळे तुमच्या या धाग्याचं स्वागत

१. गुडरीड्स चॉईस अवॉर्ड्स मध्ये पॉप्युलर पुस्तकांचा नंबर येतो, खिडकीतली बाई या पुस्तकाचं फार जोरकस प्रमोशन केलं होतं, पुस्तक तर ठीक ठाक होतं.
२. आपल्या मधातली बायको.. याचे रिव्हयुज वाचले, बघितले आहेत, बहुतेक चांगलं नाहीये,
३. खूप शोधल्यावर, "द चीअरलीडर्स" वाचायला घेतलं, कॅरा थॉमसच आहे, वायऐ सेक्शनमध्ये नॉमिनेशन आहे, आय होप इट्स गुड...
https://www.goodreads.com/book/show/30969755-the-cheerleaders

धन्यवाद व्यत्यय, टीना आणि जाई.
इथल्या शिफारसीमुळे तुम्ही काही वाचलं, बघितलं तर कसं वाटलं ते नक्की सांगा. चर्चा करायला आवडेल Happy

===
चैतन्य,
१. हो. भरपूर हवा केली होती 'खिडकीतली बाई 'ने. त्यामुळेच तर ते जिंकेलं असं वाटतं मला. पुस्तक मलाही ठीकच वाटलं होतं.
२. अरेरे Sad मी आपल्या मधे बायको, कधीकधी मी खोटं बोलते आणि सौ वेस्टअवेचा मृत्यू ही तीन पुस्तकं वाचायचं ठरवलेलं. पाच आकडी जनतेनं सरासरी 3.9 गुण दिलेत म्हणजे एकदा वाचायला हरकत नसावी. आता चालू केलंच आहे वाचायला तर पूर्ण करते.
३. रहस्य, थरारनंतर माझाही आवडता जॉन्र तरुणप्रौढ आहे. चिअरलिडर्स कसं वाटलं सांग.

बादवे गेल्यावर्षी हवा करणारे दुसरे पुस्तक वाचले का? Eleanor Oliphant is completely fine. मला ठीकच वाटलेलं.

आणि हे बघितलं का?
https://www.goodreads.com/choiceawards/best-fiction-books-2018
यातली तीन पुस्तकं मी वाचली आहेत.
Nine Perfect Strangers
An American Marriage
Still Me
तिन्ही ठीक.

The Invisible Guest: फक्त स्पॅनिश ऑडिओ आहे, त्यामुळे सबटायटल्स वाचतच बघावा लागला. ठीक ठीक वाटला. आरोपी श्रीमंत असल्याने पोलीसांनी त्याची विचारपूर करायला कचरणे आणि इतर काही गोष्टी टिपीकल बॉलिवूड मसाला वाटला.

- संपादीत.

@अॅमी
१. वायऐ आणि ऍडल्ट फिक्शन मध्ये काहीच फरक उरला नाही, दोन्ही कडे तेवढीच हिंस्त्रा, खून खराबे आहेत.
२. एलानोर ओलिफन्ट वाचलं आहे, त्याच्यातला शेवटचा ट्विस्ट आणि खिडकीतली बाई मधला मध्यंतराचा ट्विस्ट सारखाच आहे.
३. गुडरीड्सचे प्रौढ फिक्शन मधले नॉमिनेशन्स बघितले, अमेरिकन मॅरेज कसं आहे? तीनशेच पानांचं पुस्तक आहे, चांगलं असेल तर लगेच वाचून टाकतो

Pages