उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण

Submitted by कांदापोहे on 18 January, 2011 - 21:50

गतवर्षीप्रमाणे यंदाही फ्लेमिंगो (रोहीत, अग्निपंख) बघायला जावे हा विचार होता पण कुणीच सोबत यायला तयार नव्हते. नेहाला फारसा उत्साह नव्हता तरी तिला व मुलांना घेऊन मी भिगवणला गेलोच. यावर्षी रोहीत अजुन आलेच नाहीत व इतर पक्षीही कमी आहेत हे तिथे पोचल्या पोचल्याच कळल्यावर आमचा हिरमोड झाला होता. पाऊस जास्ती झाल्याने पाणीपण जास्ती होते आणी पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय फ्लेमिंगो येत नाहीत ही नविनच माहीती कळली. पातळी कमी झाली तर त्यांना खाद्य शोधायला सोप्पे जाते अशी माहीती एका गावकर्‍याने सांगीतली.

तरीही प्राप्त परीस्थितीत आम्हाला अनेक पक्षी बघायला मिळालेच त्यांचा नजराणा पेश करतोय. मराठी व इंग्रजी नावे नंतर शोधुन लिहीनच तोवर तुम्ही गाणी शोधा. Proud

Black-Headed Ibis (कुदळ्या, पांढरा शराटी)

Black-Winged Stilt (शेकाट्या)

Black-Winged Stilt (शेकाट्या)

Grey Heron (राखी बलाक)

Large Egret (बगळा)

Long-Tailed Shrike (खाटीक)

Black-Headed Ibis (कुदळ्या, पांढरा शराटी)

Black-Winged Stilt (शेकाट्या)

Common Coot (चांदवा)

Large Egret (बगळा)

Grey Wagtail (करडा धोबी)

प्रकाशचित्र १२

Indian Pond Heron (वंचक)

Large Egret (बगळा)

प्रकाशचित्र १५

Wooly-Necked Stork (कांडेसर)

Black-shouldered Kite (कापशी घार)

गुलमोहर: 

मला सगळेच फोटु जबरदस्त आवडले Happy

तोवर तुम्ही गाणी शोधा.>>>>जरा एक फोटो उडणार्‍या बगळ्यांचा काढायचा ना. "बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात......" गाण्यासाठी ;-).

प्रकाशचित्र १६ पूर्ण गंडलय पण हे महाशय उंच झाडावर होते व मला त्याचा साईज आवडला त्यामुळे इकडे टाकला आहे.

साधारण १५ सलग फोटो घेतल्यावर प्रकाशचित्र १५ मिळाले आहे. कुणाला त्या पक्षाच्या तोंडातला मासा दिसला का? तसेच प्रकाशचित्र ७ मधील बाजुचे महाशय दिसत आहेत का? मी फोटो लॅपटॉपवर घेतले तेव्हा दिसले मला.

प्रकाशचित्र ११ मधील पक्षी मात्र पोझ दिल्यासारखा त्या दगडावर येऊन बसला अचानक.

प्रकाशचित्र १७ मधील ससाणा (?) दर दोन किलोमीटर नंतर दिसत होता. एकच होता की वेगवेगळे हा संशोधनाचा विषय आहे.

कांदेपोहे तुझ्या फोटोंचे कौतुक आहे. पण मला वाईट वाटत ते आमच्याइथुन गायब झालेल्या पक्षांच. वरचे फोटो पाहून मन हळहळल. मी रोज त्याच रस्त्याने येते त्यामुळे मला त्या पक्षांची आठवण रोजच येते. तेंव्हा कॅमेरा नसल्याने मी कधी त्यांना फोटोतही जपले नाही. ह्या इंडस्ट्री लाईनच्या लोकांनी नविन पोर्टसाठी पक्षांच्या पोटभरण्याच्या जागेत भराव घातला आहे त्यामुळे आता तिथे पक्षी येणारच नाहीत. वरील सर्व पक्षी आणि अजुन बर्‍याच जातीतले पक्षी तिथे येत होते.

केप्या... जबरीच फोटो..
आजच्याच सकाळ मध्ये बातमी आहे शिवडी येथे रोहित पक्ष्यांचे आगमन म्हणून... परत आल्यावर परत एकदा भिगवणला चक्कर मारलीस तर रोहित पण दिसतील बहुतेक..

Pages