छंद

सृजन

Submitted by संतोष वाटपाडे on 29 May, 2014 - 00:32

काळ्याकभिन्न दगडांच्या फ़टीतून
जसा कोवळा कोंब बाहेर येतो
स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी,
अगदी तसंच मनाच्या कपारीतून
शब्दांचा हिरवागार कोंब डोकावतो
त्याची तगमग थांबवण्यासाठी....

बघता बघता झाकून जाते संपुर्ण कपार
इवल्या इवल्या रोपट्यांनी
आणि पालटतो मनाचा ऋतू
वाहू लागतात भावनांचे वारे
बहरू लागते काव्याचे रान
ओली होते मुळांजवळची माती
पाऊस असला तरीही आणि नसला तरीही.....
-- संतोष वाटपाडे

शब्दखुणा: 

अंड्याचे फंडे ३ - छंद

Submitted by अंड्या on 17 March, 2013 - 11:24

"क्या दगडूशेट, सुबह सुबह लॉलीपॉप.."

ह्यॅं ह्यॅं ह्यॅं अंड्या, तू नाही सुधारणार बघ बोलत दगडूने शेवटचा झुरका मारत दातात खोचलेल्या बिडीचे थोटूक रस्त्याकडेच्या गटारात फेकले आणि अण्णाला कटींगचा आवाज देतच आमच्या दुकानात एंट्री मारली.

विषय: 

मोगरा फुलला मोगरा फुलला ...

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 3 July, 2012 - 03:05

माझ्या अंगणात मोगर्‍याचे झाड आहे त्याला फुले आली नाही म्हणुन मित्राला विचारले तर गेल्या ३/४ दिवसात अचानक तो असा बहरला. माझा कॅमेरा अगदीच साधा असल्याने प्रचि असे आलेत. गोड माना.

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥

इवलेंसे रोप लाविलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥

MG3.jpgMG4.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जिगसॉ पझल - रंगांचा खेळ बाय द पेंटर ऑफ लाईट !

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

Thomas Kinkade म्हणजे The Painter of Light हे समीकरण मला जेव्हा मी त्याच्या पेंटिंगवर आधारित पझल सोडवायला घेते तेव्हा नव्याने आणि प्रकर्षानं जाणवतं.

सकाळच्या, संध्याकाळच्या प्रकाशात, दिव्याच्या प्रकाशात हे पझल माझ्यासाठी फार वेगवेगळ्या रंगछटा घेऊन आलं.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - छंद