क्रिएटिव्हिटीचे नमुने - छंद

Submitted by घायल on 17 February, 2016 - 22:45

हल्ली छंद, कलांशी संबंधित स्तिमित व्हायला लावणारे व्हिडीओज पहायला मिळतात. नंतर मात्र ते सापडत नाहीत. असे आपल्याला पहायला मिळालेले व्हिडीओज सर्वांसाठी शेअर करण्यासाठी हा धागा. प्रकाशचित्रं, मोबाईलने घेतलेले व्हिडीओज, प्रचि हे सुद्धा चालतील. स्वतःचे असतील तर मग धावेल.

इथे एक नमुना म्हणून एक व्हिडीओ शेअर करतोय
https://www.facebook.com/sandeshnewspaper/videos/10153691626765380/

असा केक पूर्वी पाहिला नव्हता. जबरदस्त कलाकारी !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टी.एल.सी. चॅनल वर " अल्टीमेट केक्स" आणि "बेक केक" नावाचे कार्येक्रम लागतात. त्यातले केक आणि त्यान्ची क्लपकता पाहिलित तर हे काहीच नाही असे म्हणावे लागेल. हा केक फॉन्डन्ट चा आहे. म्हणजे केक नेहेमीचाच. पण वरचं आय्सिंग फॉन्डन्ट चे . फॉन्डन्ट हा प्रकार खुप ताणता येतो. साधारण लहान मुले जो रबरी डोव्ह वापरतात खेळायला तसा असतो. त्यामुळे त्याचे कोणतेही आकार करता येतात. अनेक चुका सुध्धा दुरुस्त करता येतात.
माझी मुलगी हे सगळे प्रकार करते. पुढे कधी केला तर फोटो टाकते.

टी.एल.सी. चॅनल वर " अल्टीमेट केक्स" आणि "बेक केक" नावाचे कार्येक्रम लागतात >>> भन्नाट असतात ते केक्स

माझी मुलगी हे सगळे प्रकार करते. पुढे कधी केला तर फोटो टाकते.>>>> मस्तच. लवकर टाका फोटो.

केक उदाहरणार्थ दिलाय. आपल्याला माहीत असलेली कुठलीही कौशल्याधारीत रचना चालू शकेल.

छान धागा!
मस्त कलाकृती.

लिंबुदादा: माझे फेसबुक अकाउंट नाही पण वरिल व्हिडिओ बघता आले. फेसबुक ब्लॉक्ड आहे का तुमच्याकडे?

आमच्यात सगळेच ब्लॉक्ड आहे. Sad अपवाद फक्त मायबोलीचा. Happy त्याकरताही माझा अ‍ॅडमिनकडचा "वठ" कामास आलाय.... Wink
.
.
अ‍ॅडमिन म्हणजे आमच्या कॉम्प्युटार/लॅन सिस्टिमचे अ‍ॅडमिन... कृपया गैरसमज नसावा... Proud

ओरिगामी बॅट मस्तच.. मी शिकली बनवायला यिप्पी..
विमान, ससा, पेंदा, साध जहाज अन शिडाच जहाज व्यतिरिक्त काहीच नव्हत येत मला..
थँक्यु लिंक करिता.. पण वरचेवर पहाण्याकरिता हे डाउनलोड कसे करता यायला हवे होते Sad

मला स्वतःला फूड कार्व्हींग खुप आवडते. त्याच्या स्पेशल नाईव्ज पण आहेत माझ्याकडे ( अर्थात मला फार काही जमत नाही ) थायलंड ला तर ते खुपच बघायला मिळाले.

https://www.youtube.com/watch?v=JA3uJ3Vap2g

हा, आणि आजूबाजूचे व्हीडिओज बघा.

हे बघा http://diply.com/auntyacid/article/cement-placecard-holder-diy-tutorial/1

थोपूवर दिसल..
याला नक्की काय म्हणाव माहिती नाही. काँक्रिट ब्लॉक्स म्हणुया..
पेपरवेट प्रमाणे सुद्धा युझ करता येतील..
त्यांना रंगवल्यावर सुद्धा मस्त वाटतील.. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा आपण बनवू शकतो नाही का ?
मला आवडली आयडीया..

दा लिंक बघते जरा वेळाने Happy

हे DIY कॅटेगरीत येते. पण असा धागा शोधूनही सापडला नाही. इथे जर अनावश्यक असेल तर उडवले तरीही चालेल.

मला कारचे हॅलोजन बल्ब (हेडहोते) बदलायचे होते. पण हेडलाईट बीमची काच डल झाली होती. पिवळी पडली होती.
तिचं रिस्टोरेशन करण्यासाठी १२०० चा पॉलीशपेपर, एक रबिंग पॉलिशिंगची डबी आणि एक मायक्रोफायबर क्लोथ एव्हढे १२० रू चे सामान आणले. १२०० ग्रेडच्या पॉलीश पेपरने घासण्याआधी हेडलाईट ग्लास वर पाणी टाकले. त्यानंतर घासताना पिवळे पाणी वहायला लागले. पाच मिनिटे घासल्यावर बराच फरक पडला. असे बराच वेळ केले. मग पुसून घेतले. वाळू दिले. त्यानंतर रबिंग पॉलिशिंग सोल्युशन लावले. एक स्पंजचा तुकडाही आणला होता. सोल्युशन सहा मिनिटे ठेवले. त्यानंतर स्पंजने हळूहळू प्रेशर देऊन घासायला सुरूवात केली. सोल्युशन जरासं जास्त लागले होते. मग परत पॉलीश पेपर मारला. आता वाट न बघता पातळ लेयर दिला आणि घासले. सगळे पिवळेपण निघून गेले होते. हेडलाईट ची बीम पण सुधारली. डावीकडचा हेडलाईट तुटल्याने बदलला होता. दोन्ही सारखे काही झाले नाहीत. पण एलईडी साठी हा जुना वाटत होता.
मग गॅरेज मधे हेडलाईट बदलायला गेलो. काहीही किंमती सांगतात. शिवाय मजुरी. मग इंडियामार्ट वरून मागवला. घरीच बदलला. आता एलईडीची जोडी मागवली आहे. ती आली कि हॅलोजन बल्ब काढून ठेवणार आणि एलईडी टाकणार. कारच्या बाबत सोपे आहे. फक्त होल्डर एच ४ असेल तर तोच एलईडी मागवावा. नाहीतर बसवताना आणि वायरिंग करताना इलेक्ट्रिशियनची गरज लागेल.

आता अ‍ॅक्टिवाबद्दल.

बायकोची तक्रार होती रात्रीचे हेडलाईटमधे नीट दिसत नाही. अ‍ॅक्टिव्हाचा प्रॉब्लेम म्हणजे जर एलईडी टाकला तर त्याचे लाईफ तासात ठरलेले असते. ४ जी नंतर दिवा दिवस रात्र चालू राहतो. ते परवडत नाही. एलईडी टाकायचा तर त्याचे वायरिंग बदलावे लागते. कारच्या बाबतीत ते करावे लागत नाही. हेडलाईटला इंजिनचा पावर सप्लाय असल्याने जसजसे इंजिन रेज करावे तसा लाईट कमी जास्त होतो. एलईडीला १२ व्होल्ट नियमित सप्लाय लागतो. इंजिन जास्त रेज झाले तर एलईडी उडतो.

माझ्याकडे मल्टीमीटर पण नव्हता. त्याहीपेक्षा खरे कारण म्हणजे समोरचा पॅनेल काढताना त्यातला एक स्क्रू फिरतच नव्हता. जाम झालेला. मग बाकीचे सगळे पुन्हा बसवले. कोपर्‍यावर गॅरेजमधे गेलो. त्यालाही तोच प्रॉब्लेम आला. पण त्याने दुसरा एक धारदार स्क्रू ड्राय्व्हर घेतला. स्क्रूच्या हेडमधे तो घालून वरून हातोडीने ठोकले. मग स्क्रू फिरायला लागला.
त्याला मी स्विच बसवून द्यायची विनंती केली. स्विच साठी पुन्हा वेगळे वायरिंग आले. एलईडी बॅटरीवरून घेतला. आता दिवसा गाडी बाहेर काढताना हेडलाईट बंद ठेवता येतो. रात्री झगझगीत प्रकाश पडतोय. यापूर्वी कधीच एव्हढा प्रकाश मिळाला नव्हता.

आता पुढचे लक्ष्य आहे जाडीभरडी माऊंटन बाईक घरच्या घरी इलेक्ट्रिक बाईक मधे कन्व्हर्ट करायची.
जेव्हां केव्हां मुहूर्त लागेल तेव्हां.

शांत माणुस, बटाटे वडे व्यवसाय चांगलाच प्रोफिटेबल दिसतो आहे. Wink
कार, ऍक्टिव्हा, माऊंटन बाईक.......जोशी / रोहित वडेवालेचं समजु शकते, पण सारस बागेत एवढा व्यवसाय म्हणजे जबरदस्तच की Proud

मागच्या आयडीबरोबर तो व्यवसाय गेला>> मग काय, मी नव्या घरासमोर वडापावच्या गाडीसाठी किती आशेने जागा राखून ठेवलेली.. सगळ्यावर तेल ओतलं तुम्ही

कर्ज पिक्चर मधल्या ऋषी कपूरप्रमाणे मागच्या जन्मातले काही काही निगेटिव्ह रील्स मधे आठवतेय. एक टुमदार घर, वडापाव ची गाडी....
क्या जमाना था

हा जुना धागा घेऊन पॉलिश मारण्यापेक्षा नवा धागा काढावा.
बाकी कला कुठे संपते आणि diy कुठे सुरू होते हे समजले नाही मला. माझे बरेच प्रयोग हे रिकामपणचे उद्योग सदरात येतात असे शेरे मिळतात.