पर्यावरण व बागकाम

आनंदछंद ऐसा - स्वाती२

Submitted by स्वाती२ on 28 February, 2020 - 08:43

मी जेव्हा लहानपणीच्या आठवणीत मागे मागे जाते तेव्हा मला कायम आजोबा, मामा, आई, गडीमाणसे यांच्यासोबत आजोळच्या किंवा माहेरच्या आवारात लूडबूड करणारी मी दिसते. कोकणात रहाताना बागकाम हा जगण्याचाच एक भाग होता मात्र त्याचे खर्‍या अर्थाने छंदात रुपांतर झाले ते अमेरीकेत आल्यावर. भारतात असताना मला कुणी विचारले असते की तुझे छंद काय तर मी वाचन, विणकाम, हस्तकला वगैरे यादी दिली असती. पण म्हणताना आपण एखाद्या गोष्टीपासून दुरावल्याशिवाय तिचे महत्व जाणवत नाही तसे काहीसे माझे झाले. इथे अमेरीकेत लग्न होवून आले, दोन महिन्यात नव्याची नवलाई संपली, पानगळ सुरु झाली आणि काहीतरी टोचू लागले.

विषय: 

माझे सौर ऊर्जा व इतर बरेच पर्यावरणपूरक प्रयोग व उपक्रम

Submitted by प्रमोद् ताम्बे on 30 March, 2014 - 06:11

सौर ऊर्जा निर्मिती (सोलर एनर्जी)
ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीत , पर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून आपण आपला खारीचा वाटा म्हणून हातभार लावावा व विजेची राष्ट्रीय बचत व्हावी केवळ या बहुउद्देशानेच मी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या “ सौर ऊर्जा निर्मिती “ चा वापर करायचे ठरवले
 सोलर पॅनेल्स xxx.jpg

Subscribe to RSS - पर्यावरण व बागकाम