मराठी..... भाषा आणि जात !!!!

Submitted by svaag on 29 August, 2016 - 06:57

मराठी..... भाषा आणि जात !!!!
खूप ऐकतो, खूप चर्चा करतो....... कुठे आहे मराठी भाषा...... कशी टिकणार आपली मायबोली.....
पण मराठी भाषा म्हणजे नक्की कोणती............. कारण इथेही मराठी भाषेपेक्षा जातीवर अवलंबून असणार्‍या मराठी भाषेवरून मराठी माणसांतच जुंपते.

पण त्यापलीकडे आपण काही करतो का????

बघायला छोटा पण खूप मोठा प्रश्न आहे हा..................

नाही नाही, इथे पुन्हा एकदा ह्या विषयावर चर्चा नाही करणार; तर एक किस्सा सांगणार आहे..... परवाच नकळत घडलेला...... पण पुन्हा ह्या विषयावरील विचारांत घेऊन जाणारा.

परवा काय झाले, तर शेजारचा एक छोटू घरी आला. छोटू म्हणजे शेजारी राहणारा एक लहान मुलगा... असेल दुसरी तिसरीत. कॉन्वेंट शाळेत शिकतो (मर्‍हाठी शाळा नाही बरे का). तर तो आपला गणिताची पुस्तके घेऊन आला (आला कसला तो.... अभ्यासासाठी कधीही येणार नाही तो. आईनेच पाठवले बिचार्‍याला)........तर मी त्याला गणिते समजावून सांगितली (म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न केला हो). तर हा बाबा आपला आनी-पानी निघाला. झाले मराठी बाणा खडबडून जागा झाला आणि गणिते राहिली बाजूला आणि मराठीची शाळा सुरु झाली.

मला हट्ट सोडवेना आणि त्याला ते काही जमेना..... (नवरा TV पेक्षा live drama enjoy करतोय....... हातात चहाचा कप आणि समोर live drama ).

शेवटी वैतागून मी छोटुला बोललेच, काय रे तुझी भाषा अशी (पाठून नवर्‍याची commentary एव्हाना सुरु झाली होती..... "मै तुम्हारे भाषा के बरे मे बोल रही हू"). आणि छोटू बिचारा गोंधळलेल्या अवस्थेत. मी त्याला बोलले अरे बाबा मराठीच आहेस ना रे तू आणि भाषा बघ कशी . आता मात्र छोटूचे Expressions पाहण्यालायक होते. भाषा युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात म्हणाला.... 'अहो काकी मी मराठी नाही आहे.... मी तर कोळी आहे" आणि नाचत नाचत घरी गेला.

दोन क्षण तर काही कळलेच नाही पण पाठून नवर्‍याचे (छद्मी) हास्य मात्र ऐकू आले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users