शृंगार १२

Submitted by अनाहुत on 18 April, 2016 - 07:09

" Hi friend how r u ? " - राधिका

" I m fine n hows u ? " - मी

" काय बोलू fine म्हणू की खर सांगू ? " - राधिका

" खरच सांग . " - मी

" काही प्रॉब्लेम असला की कुणापुढे बोलाव तेच समजत नाही . बाबा किती रागीट आहेत ते तुम्हाला माहीत आहेच . त्यामुळे त्यांच्यासमोर काही बोलायची हिंमत्तच होत नाही . आणि आई एकतर ignore करते नाहीतर भांडायला येऊ का तिथे अस बोलते , त्यामुळे तिला काही सांगण्यात अर्थ वाटत नाही . तुम्ही सांगत होता ते पटत आहे , काही bad girls पण असतात . आमच्या क्लासमधे पण एक ग्रूप आहे , ज्या सगळ्यांना टॉंन्ट मारतात , खूप वाईट कमेंट करतात . Even girls नी ज्या गोष्टींमधे दुस-या girl ला मदत करावी किंवा तिला समजून तरी घ्याव त्या टॉपिकवर या टॉंटिंग करतात even about ... जाऊ द्या . त्यांना स्वतःलाही हे फेस करायच असूनही त्या अस कस करू शकतात ते समजतच नाही . आणि काही गोष्टी classmates ना ज्या good friend वाटतात म्हणून सांगितल्या त्यानी त्या गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या . त्यामुळे कुणाशी काही बोलाव काही शेअर कराव की नाही हा प्रश्न पडतो . पण का कुणास ठाऊक तुमच्यासोबत बोलावस वाटल , हे शेअर करावस वाटल . तुमच्याशी बोलून आधार वाटतो . " - राधिका

" तुला ऐकतोय तेव्हा मला अस वाटायला लागल आहे की स्वतःबरोबरच बोलतो आहे . स्वतःलाच ऐकतो आहे . मीही सुरूवातीपासून थोडा अबोल , काहीसा एकलकोंडाच त्यामुळे मित्रही फार कमीच . पण पुढे त्या घटनेनंतर मला पुढे अनेक दिवस फार दडपण वाटत होत , अगदी शाळा सुरू झाली तरीही . आमची काहीतरी internal exam छोटी test वगैरे होती . त्यात मला फारच कमी मार्क्स् मिळाले होते हे मी माझ्या एका मित्राला सांगत होतो . तिथे मला याच कारण शेअर करायच होत पण तिथे कुणीतरी आल त्यामुळे मला पुढे बोलता आल नाही पण नंतर मला समजल की मला कमी मार्क्स् मिळाले हे सर्वांना समजल आहे , त्या तसल्या टेस्टला फारसा काही अर्थ नसतो पण मी फेल झालो अशी जाहिरातच झाली , आमचे नातेवाईक शेजारी सर्वांनाच . मी हुशार विद्यार्थी त्यात अस म्हटल्यावर नातेवाईकांनी लक्ष द्या अशी पालकांकडे सूचना केली . याच मला वाईट वाटत होतच पण ज्याला आपण मित्र मानून हे सांगू इच्छित होतो त्याने हे सर्वांपर्यंत पोहोचवल याच जास्त वाईट वाटत होत . पण याच्यानंतर जी गोष्ट सांगणार होतो ती सांगणच अशक्य झाल . मग हळूहळू सर्वांवरचाच विश्वास कमी कमी होत कायमस्वरूपी उडाला . याचा फार तोटा मला झाला पुढील आयुष्यात . सोप्या सोप्या गोष्टींचही टेंशन वाटू लागल . त्यामुळे वयापेक्षा पुढे मानसिक आणि शारिरीक स्थिती पोहोचली होती . आता जीमला जातो त्या फिजीकल वर्कआउट मुळे काही प्रमाणात परिस्थिती सुधारते आहे असे वाटते आहे . पण आपल्याला थोड समाजात मिसळायलाच हव किमान काही गोष्टी शेअर करायलाच हव्या . मेन इशू हा नाही की त्याच समाधान व्हाव पण फक्त शेअर करूनही तुझ्या मनावरचा भार थोडा हलका होईल . तुला ती सर्वांपर्यंत पोहोचायची भिती आहे ना मग असे लोक शोध जे किमान ऐकतील , जशी तुझी आई . तू म्हणते ती इग्नोर करते . पण तू ती ऐकते आहे अस समजूनच सांग . May be ती लक्ष नाही देणार पण एखादी मोठी गोष्ट जी तीला वाटेल तेव्हा नक्कीच ती काही स्टँड घेईल . तुझ्या स्कुलच्या टिचर ना सांग . जी मुलगी तुला असे टॉंट मारते तेव्हा तिला विचार की तिला हे नाही का फेस कराव लागत ? ती ऐकेल . नाहीच ऐकल तर इतर मैत्रीणींना सोबत घेऊन तिची तक्रार कर टीचरकडे . ती होईल ठीक पण नाहीच झाली तरी तुझ्या सोबत तेव्हा अशा मैत्रीणी असतील ज्यांना हा त्रास होतो आहे तिच्यामुळे आणि त्यांच्यासाठी तू heroच असशील . ज्यामुळे त्या तुझ्या आणखी close friends बनतील . आणि तुला भविष्यात चांगली साथही देतील . आयुष्य म्हणजे काही सगळ्या गोष्टी परफेक्ट करणे किंवा असणे नाही तर आपण परफेक्ट होण्याचा आणि सगळ परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणे आहे . " - मी

" थँक्स तुमच्यामुळे फार आधार वाटला . आणि confidence ही वाटतो आहे . पण एक शंका आहे मी त्यांना hero का वाटेन heroine का नाही ? "

...क्रमशः

भाग १ http://www.maayboli.com/node/55229
भाग २ http://www.maayboli.com/node/55239
भाग ३ http://www.maayboli.com/node/55264
भाग ४ http://www.maayboli.com/node/55293
भाग ५ http://www.maayboli.com/node/55354
भाग ६ http://www.maayboli.com/node/55545
भाग ७ http://www.maayboli.com/node/55591
भाग ८ http://www.maayboli.com/node/58057
भाग ९ http://www.maayboli.com/node/58315
भाग १० http://www.maayboli.com/node/58327
भाग ११ http://www.maayboli.com/node/58339

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक दोन पॅराचे भाग करून सर्व्हर स्पेस खाण्यापेक्षा एकातच का नाही करत दोन भाग मिक्स. निदान वाचताना सलगता तरी राहील.

अनाहूत यांना बरेच मुद्दे एका कथेत कव्हर करायचे आहेत.त्याचा कंटेक्स्ट कदाचित पुढच्या भागांमध्ये असू शकेल.
आपल्याला बरंच काही सांगायचं असतं, पण एक मुद्दा आवडला की त्यावर जास्त जास्त लिहीणं होतं.यात काही मुद्दे विसरलेही जातात.

अनाहूत यांना बरेच मुद्दे एका कथेत कव्हर करायचे आहेत.त्याचा कंटेक्स्ट कदाचित पुढच्या भागांमध्ये असू शकेल. >>>>+११११

एक अनाहूत सल्ला: भाग थोडे मोठे टाका. गेले तीन चार भाग एकच विषय चालू आहे. किमान एक पॉइंट कव्हर होइल इतपत मोठा भाग टाकलात तर वाचायला बरे पडेल.

नववीच्या मुलीबरोबर बोलण्याचा हा भाग आधीपासून ट्रॅकबाहेर चालला आहे. पुन्हाएकदा : हे कायद्याच्या दृष्टीने चूक आहे.

हे कायद्याच्या दृष्टीने चूक आहे >>>> हा आक्षेप समजला नाही. कायद्याच्या दृष्टीनं चूक असलेल्या अनेक गोष्टी कथा-कादंबर्‍यांमध्ये येतात की. उदा: चोरी, खून, आत्महत्या, मायनर्न्सनं केलेलं धुम्रपान अथवा रसपान.