बालपण

बालपणीच्या गमती-जमती- 1

Submitted by मनस्वि on 24 December, 2011 - 05:33

मी एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या घरात वाढले. सख्खी-चुलत मिळून आम्ही पाच भावंडे (दोन मुली, तीन मुले) एकत्र राहत होतो. प्रत्येकाचा स्वभाव निराळा. त्यातून भांडणे, वाद आणि खोड्या या उद्भवणारच! लहान भावंडांना आजीकडून full protection मिळायचे. त्यांनी कितीही खोड्या केल्या तरी आजी पाठीशी घालणार हे गृहीतच धरलेले असायचे. मग अश्या वेळेस निरनिराळे मार्ग शोधले जायचे कि जेणे करून आजीचा ओरडा हि खावा लागू नये आणि खोड्या काढणाऱ्या भावंडाला अद्दल देखील घडली पाहिजे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पे रु च्या झा डा मागेऽऽएऽऽ..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

'बालपणीचा काळ सुखाचा', 'लहानपण दे गा देवा' वगैरे आपण नेहेमीच ऐकतो. आता सगळंच काही रम्य नसतं,
नव्हतंच... घडणं/घडवणं नेहेमीच आपल्या हातात नसतं, म्हणून मला तरी वाटतं 'रम्य ते आठवणं' तरी आपल्या हातात असतं ना?

-------------------------------------------------------------------------------------------

वेळेचं नियोजन आम्हाला शिकवलं ते उन्हाळ्याच्या सुट्टीनं!
म्हणजे सुट्टीच्या दिवसातला एकही क्षण वाया न जाऊ देता आणि 'मॅक्झिमम युटीलायझेशन ऑफ अ‍ॅव्हेलेबल रिसोर्सेस' या तत्वाचा वापर करून सुट्टी आनंदात कशी घालवावी हे त्या दिवसांना आठवल्यावरच ध्यानात येतं.

विषय: 
प्रकार: 

वनभोजन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

ऐन मार्गशीर्ष-पौषात जेव्हा बोचरी थंडी पडायची तेव्हा पावसाच्या पाण्यावर येणार्‍या पिकांची सुगी करून, त्याच जागी केलेली रब्बी पिके खुरपणीला आलेली असत. हवेत गारवा, सगळीकडे अजूनही असलेली हिरवळ, शेतात वार्‍याच्या लयीवर हलणारी गहू, हरभरा, वाटाणा यांची चिमुकली रोपं, खळाळत वाहणारे ओढे आणि गावाला सगळीकडून वेढणार्‍या डोंगरांवर वाढलेल्या कमरेइतक्या गवतावर अखंड लाटा उमटवणारा वारा... या सगळ्यांमुळे हे दिवस संपूच नयेत असं वाटायचं. पण म्हणतात ना- शाळू दिवस... कसे भुर्रकन निघून जातात.. आणि मग येतो रखरखीत उन्हाळा!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बालपण