ललितलेखन

गर्दी

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 9 November, 2019 - 02:04

"आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत" हे कळणं खूप गरजेचं असत.
प्रत्येकजण वेगळा असतो,चेहरा वेगळा,रंग वेगळा,गुण-दोष वेगळे आणि या वेगळं असण्यातच त्याच्या जन्माला येण्याचं कारण असतं.
प्रत्येकजण जर असा वेगळा नसता तर त्याची निर्मिती देवाला का करावीशी वाटली असती?

एकसारख्या दोन गोष्टी बनवणं आपल्याला माणूस म्हणून जिथं बोअर होत तिथं देवाला एकाच साच्यातल्या दोन मूर्ती बनवण्यात काय रस असेल?
आपण वेगळे आहोत हे एकतर स्वतःला लवकर लक्षात येत नाही,याच एक कारण म्हणजे वेगळं असण्याची आणि इतरांसारखं नसण्याची भीतीच मनात बसलेली असते.आपण वेगळे आहोत म्हणजे दुसऱ्यासारखे नाही आहोत हेच पटत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

क्षण वेचताना-1

Submitted by व्यक्त अव्यक्त on 21 June, 2018 - 13:01

क्षण
घड्याळाची टिकटिक वाजते आहे न माझ्या हातातून निसटणार्या वेळेची मला आठवण करून देत आहे. टिक टिक म्हणता म्हणता मुठीत घट्ट धरून ठेवलेला तो क्षण टिकता टिकत नाही, न आयुष्य पुढे सरकत राहतं.अश्याच छोट्या छोट्या क्षणांनी ते घडत राहतं, आकार घेत राहतं.
किती छोट्या छोट्या तुकड्यानी बनलेलं हे आपलं जगणं, क्षणांच्या कुपितून दरवळणाऱ्या आठवणींवर तर तग धरून असतं.

पुलंना आठवताना....

Submitted by rar on 12 June, 2018 - 12:01

गेले दोन दिवस आणि आजही, पुलं गेल्यानंतर २००० सालच्या लोकसत्ता, मटा मधे लिहिलेले अग्रलेख फेसबुकवर वाचनात आले. आपोआपच पुस्तकांच्या कपाटात फोल्डरमधे नीट जपून ठेवलेली 'जून २०००' मधली अनेक वर्तमानपत्र बाहेर काढली गेली. त्यातले 'अग्रलेख' परत एकदा वाचले गेले. पुलं गेले तेव्हा मी भारतात नव्हते, पण त्या दिवशी पुलंविषयी लेख असलेल्या बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांची एक एक्स्ट्रा प्रत खास माझ्यासाठी आई-बाबांनी घेऊन ठेवली होती. वर्तमानपत्रांचं एक मोठ्ठं बाड आई-बाबा त्यांच्या नंतरच्या अमेरीका ट्रीप मधे माझ्यासाठी घेऊन आले होते.

पाऊस - रायगड प्रदक्षिणेतला!

Submitted by आनंदयात्री on 28 July, 2014 - 01:59

तो कोसळला! बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच! एकदा धाडबिडीच्या खिंडीत आणि नंतर काळकाईच्या खिंडीत!

सोमजाई मंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात केली तेव्हा त्याने जोरदार सलामी दिली. भातशिवारं हिरवीगार रोपांनी डोलत होती. पाऊलवाटांमध्ये पाणी पाणी झालं होतं. चिखल मायेने पाय धरून ठेवत होता. सारवलेल्या अंगणातून आणि पागोळ्यांच्या तळ्यांतून आम्ही झपाझप पाय उचलत होतो. पावसाचा दमटपणा त्या कौलातून आत उतरणारा. घरातले म्हातारे आम्हाला निरखून बघणारे. घरातले कर्ते भातखाचरांमध्ये लावणीमध्ये बुडालेले.

आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !

Submitted by किंकर on 6 June, 2013 - 00:01

मराठी भाषा आणि साहित्य यांची सांगड घालताना,सर्वात प्रथम काय जाणवते तर भाषा,संवाद यातून साहित्य समृद्ध होत जाते आणि समृद्ध साहित्य माणसास परिपूर्ण बनवते.आणि हे सहजतेने घडते शब्द सामर्थ्यातून….

'शब्द' जो विचारांचे माध्यम बनून माणसास व्यक्त करतो.असे व्यक्त होणे ज्यांना सहजतेने जमते,त्यांना आपण विचारवंत, प्रज्ञावंत ,साहित्यिक,लेखक,कवी,ललित रचनाकार,समीक्षक अशा विविध उपाध्या देवून संबोधत असतो.पण अनेकदा अशा अभ्यासू लोकांसमोर देखील असे अनेक प्रसंग घडतात किंवा अशी परिस्थिती उभी ठाकते कि,तेही सहजतेने म्हणतात, काय बोलू ? माझ्याकडे शब्द नाहीत.

!!रम्य ते बालपण!!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:26

!!रम्य ते बालपण!!

'रम्य ते बालपण' बर्‍याच जणांकडून ऐकल आहे आणि खुपदा वाचलं आहे...

सणासुदीला घरी आलो कि विचारचक्र भिरभिरत अन् मनाचं कालचक्र उलट फिरायला लागतं, नकळत तुलना चालू होते, लहानपणीची लगबग, उत्साह, हुरूप आठवतो सण- समारंभातला.
मग तो सण गौरी-गणपतीचा असो वा पोळा, नागपंचमी, दिवाळी, संक्रांतीचा.
त्यावेळी दुर्वा-आघाडा निवडताना, तोरणं-माळा बनवताना केलीली कुचराई आठवते अन हसु येतं.

देवाची आरती चालू असताना हमखास येणारा कंटाळा, पोटातल्या भुकेवर मनातल्या बाल-श्रध्देने Happy मात करताना उडालेली तारांबळ;
त्यावेळी सकाळी लवकर उठून आईला केलेली 'मदत' (खरंतर उठलो तीच फार मोठी मदत व्हायची);

शब्दखुणा: 

त्रिवार अर्जुन!!!

Submitted by आदित्य डोंगरे on 14 January, 2012 - 13:58

त्रिवार अर्जुन!!!
महाभारत! भारतीय माणसाचा जीव की प्राण! यातील अनेक पात्रांना अनेक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी आदर्श मानत आलेली आहेत. पण त्यातल्या त्यात अर्जुन हा सर्वांना, विशेषतः तरुणांना नेहेमीच हवा हवासा वाटलेला आहे. लाडका असणं ठीक आहे, पण आजच्या तरुणासमोर तो आदर्श ठेवू शकेल? होय, अगदी नक्कीच ठेवू शकेल. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात IT industry मध्ये काम करणारया तरुणांसमोर तर शब्दशः त्रिवार आदर्श ठेवू शकेल तो. त्याच्या जीवनातील ३ प्रसंगांमुळे.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - ललितलेखन