!!रम्य ते बालपण!!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:26

!!रम्य ते बालपण!!

'रम्य ते बालपण' बर्‍याच जणांकडून ऐकल आहे आणि खुपदा वाचलं आहे...

सणासुदीला घरी आलो कि विचारचक्र भिरभिरत अन् मनाचं कालचक्र उलट फिरायला लागतं, नकळत तुलना चालू होते, लहानपणीची लगबग, उत्साह, हुरूप आठवतो सण- समारंभातला.
मग तो सण गौरी-गणपतीचा असो वा पोळा, नागपंचमी, दिवाळी, संक्रांतीचा.
त्यावेळी दुर्वा-आघाडा निवडताना, तोरणं-माळा बनवताना केलीली कुचराई आठवते अन हसु येतं.

देवाची आरती चालू असताना हमखास येणारा कंटाळा, पोटातल्या भुकेवर मनातल्या बाल-श्रध्देने Happy मात करताना उडालेली तारांबळ;
त्यावेळी सकाळी लवकर उठून आईला केलेली 'मदत' (खरंतर उठलो तीच फार मोठी मदत व्हायची);
सुवासिनी मुंज्या यांना सणाच्या टायमात आलेल्या डिमांड मुळे एकेका दिवशी २-३ घरी जेवायची आमंत्रण असल्याने त्यांच्यामुळे तर कधी वडिलांनी रंगात येऊन पुजा करण्याने दुपारी २-३ पर्यंत लांबणारी जेवणे त्यानंतर आयत्या विड्यांवर ताव मारून कोणाची जीभ जास्त रंगली ते पाहण्यातली मजा;
जांभया येत असतानाही आजोबांनी सक्तीने वदवून घेतलेले श्लोक;
प्रत्येक वर्षी रंगपंचमीला पिचकारी , नागपंचमीच्या जत्रेत जाण्यासाठी लावलेला तगादा तर गणपतीला पायात गोळे अन् डोक्यावर वर्षासरींचा मारा झेलत आरास पाहण्यासाठीची केलीली पायपीट, दसर्‍याला वडिलांबरोबर केलेल सिमोलंघन.
या सगळ्याबद्दल दरवर्षी तितकीच नवलाई असायची.

मग वाढत्या वयात दहावी-बारावीच्या अभ्यास या सगळ्यांवर वरचढ ठरत गेला पुस्तक समोर घेऊन बसण्याने त्या काहीश्या त्यावेळी कंटाळवाण्या वाटणार्‍या कामांमधून सुटका मिळाल्याचा समाधान मिळालं पण ते फार काळ टिकलं नाही.
कारण ती सगळी कामं, सणवार, पद्धती साजर्‍या करण्यात एक वेगळा आनंद असतो ते आत्ता कळतंय

आज जाणवतं ते विश्व फार सुंदर आणि निरागस होतं, जगतो आहे तेच जीवन त्यापलीकड देव हा तेंव्हाचा दृष्टीकोन आता हवा हवासा वाटतो.
त्यावेळी TV मध्ये पाहिलेलं पुणे-मुंबई स्वप्नवत दुनिया वाटायची , उंच उंच इमारती पाहून हरखून जायचो धावणार्‍या लोकल उडणारी विमानं भुरळ घालायची.

लहानपणीचा ते एक चांगला असत छोटासा बगीचापण मनात आनंदाचा कारंजा उसळून द्यायचा... वय वाढलं कि तुलना चालू होते आणि सुख-आनंद दुरावतो.

आता ती सणांची कामं करायला घेतली तर तासा-दोन तासात संपतात हे लक्षात येऊन लहानपणी केलेल्या चालढकल पणाची गमंत वाटते.
आता खूप वेळ चालून पायात गोळे येत नाहीत कारण पाय दूरच्या अंतरांना सरावली आहेत.
स्तोत्र-आरत्या म्हणण्याचाही फारसा आग्रह आता होत नाही अन कंटाळाहि येत नाही कारण ती १० मिनिटांत संपणार हे ठाऊक झालय.
गणपती शाडूचा वा प्लास्टर ऑफ पॅरीसचा असतो, फटक्यांनी प्रदूषण वाढत , रंगपंचमीचे रंग त्वचेला हानीकारक असतात वैगेरे वैगेरे या सगळ्या जाणीवा वाढल्याने आयुष्यातील रंगतता कमी होते होतेय का?

मग एके दिवशी ३-४ वर्षाची चिमुरडी भाची घरात सोवळ्यात ठेवलेल्या गणपतीच्या मूर्तीला वडील धार्‍यांच्या धाकाला धुडकावून कवेत घेऊन घरभर बागडू लागते.
त्याला आपल्यातल खाऊ भरव न्हाउ घाल स्वतः बरोबर निजू घाल या असल्या कारभारान सगळ्यांना मनमुराद हसवते.
एक रसरसीत चैतन्य घरात निर्माण करते.
अन मग रम्य ते बालपण ची खऱ्या अर्थानं फिरून प्रचीती येते!

--सारंग पात्रुडकर (ऑगस्ट 2009)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<मग एके दिवशी ३-४ वर्षाची चिमुरडी भाची घरात सोवळ्यात ठेवलेल्या गणपतीच्या मूर्तीला वडील धारयांच्या धाकाला धुडकावून कवेत घेऊन घरभर बागडू लागते.
त्याला आपल्यातल खाऊ भरव न्हावू घाल स्वतः बरोबर निजू घाल या असल्या कारभारान सगळ्यांना मनमुराद हसवते एक रसरसीत चैतन्य घरात निर्माण करते
अन मग रम्य ते बालपण ची खऱ्या अर्थानं फिरून प्रचीती येते!
>>
काय म्हणून हरवतं हे निरागस मोकळं आभाळ?
लेख आवडला... ह्या शेवटच्या परिच्छेदानं गंमत हसू फुटलं. (थोडकाच शुद्धलेखनाकडे लक्षं दिला तर?)

चांगलं लिहिलंय. शुद्धलेखन सुधारा आणि मुख्य म्हणजे पूर्णविराम वापरा. Happy

>>> गणपतीला पायात गोळे अन् डोक्यावर श्रावणसरींचा मारा झेलत आरास पाहण्यासाठीची केलीली पायपीट >>> गणपतीत श्रावणसरी कशा पडतील हो?

भादोसरी वाचा हो मामीसा. नुकताच सरलेला असतो श्रावण, अन असेही ऋतुचक्र महिना दोन महिने पुढे सरकलेय Wink
***
लिखाण आवडले.

मामी/इब्लिस धन्यवाद.

गणपती मधे पाउस अधून-मधुन येतो, उन्ह-पावसाचा लपंडाव त्यादिवसातही खुपदा चालु असतो म्हणुन technical mistake Happy झाली.
good catch मामी.
शुन्य मिनिटांत दुरुस्ती करतो Happy
शुध्द-लेखन मात्र फार अवघड विषय आहे, सुधारण्याचे प्रयत्न चालू आहेत.

सारंग पात्रुडकर (की पाथरूडकर?),

विषय नेहमीचाच आहे. पण खूप चांगल्या रीतीने खुलवलाय. प्रामाणिकपणे लिहिलेलं मनाला भिडतं. पुढील लेखन असंच असू द्यात! Happy

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद गा. पै.

छेडल आहे तर थोडं विषयांतर करु.
पात्रुडकर की पाथरूडकर? हे पहेलवान की पैलवान सारखं कोड पुर्वज्यांना पडलं असाव Happy
अपभ्रंश होत होत पात्रुडकर झालं असेल. सध्या तेच लावत आहोत.
इंग्रजी मधुन मराठी मधे येताना मात्र लोक गल्लत करतातच, चालायचच, इंग्रज काळापासुन ते होत आल असल पाहिजे.