आनंदयात्री

सह्यमेळावा २०१५ - भाग २: किल्ले चौल्हेर

Submitted by आनंदयात्री on 15 July, 2015 - 00:26

सह्यमेळावा २०१५ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान

Submitted by आनंदयात्री on 13 July, 2015 - 00:20

तो दिवस मला आजही लक्षात नाही. ती वेळ मला आजही आठवत नाही. 'यंदाचा सह्यमेळावा केव्हा घ्यायचा आणि कुठे घ्यायचा' हा वरकरणी साधाच प्रश्न कुणीतरी वॉट्सअ‍ॅप गृपवर पोस्ट केला आणि 'हर हर महादेव!'च्या आवेशात तमाम इंडिया-स्थित मेंब्रानी रात्रीचा दिवस करून सगळा मोबाईल डेटा वॉट्सअ‍ॅपवर उधळला. पार सुधागडपासून सिंधुदुर्गापर्यंत आणि कोकणच्या खाडीपासून आपापल्या घराच्या माडीपर्यंत सगळी ठिकाणे डिस्कस केली. अगदी पॉवरबँकपासून हायड्राबॅगपर्यंत आणि ट्रेकिंगसॅक पासून हेडटॉर्चपर्यंत सगळ्या गोष्टींची खरेदी होत आली, तरी ठिकाण काही निश्चित होईना! वॉट्सअ‍ॅपचा गृप नुसता ओसंडून वाहत होता.

विषय: 

नटून बसलेल्या बागेचा...

Submitted by आनंदयात्री on 16 June, 2015 - 04:52

नटून बसलेल्या बागेचा सोस तेवढा नाही
शोधत आहे ज्याला मी तो इथे केवडा नाही

ठरव तुझी तू तहान आधी, पाणी नंतर शोधू!
दुरून आलेला कुठलाही मेघ कोरडा नाही

शब्द तुझा घेऊन परततो, दाद-दागिने मोठे
त्या लक्ष्मीला भुलण्याइतका अर्थ भाबडा नाही

मैफल संपत असताना तो स्वतःशीच पुटपुटला -
ह्या नावाला टाळ्यांचा अद्याप तुटवडा नाही

गर्दीमध्ये इथल्या जो तो एकाकी जगणारा
हे बघताना मिळे दिलासा, मीच एकटा नाही!

नजर जगाची नको तेवढी पार पोचते हल्ली
एकहि कपडा देहावरचा तसा तोकडा नाही

'सॉरी' म्हटल्यावर हरल्याचा फील मला ना येतो
ईगो असला मला तरीही, तुझ्याएवढा नाही!

आनंदयात्री

Submitted by सुमुक्ता on 16 December, 2014 - 10:18

"आनंदयात्री मी आनंदयात्री" -- कधीतरी लहानपणी वाचलेली मंगेश पाडगावकरांची कविता मध्यंतरी पुन्हा एकदा वाचनात आली आणि शाळेतल्या न-कळत्या वयातला न उमगलेला कवितेचा अर्थ मनाला भिडला. विशेषतः कवितेचे शेवटचे कडवे.

हलके काढून कंटक पायींचे
स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

धूळ साचू दे जराशी

Submitted by आनंदयात्री on 2 December, 2014 - 00:54

(ज्येष्ठ गझलकारा संगीता जोशी यांची 'हे असे आभासवाणे चांदणे आता नको' ही ओळ व्हॉट्सअ‍ॅप वर एका गप्पांमध्ये मिळाली. त्यावर गझल लिहिण्याचा हा प्रयत्न.)

लाघवी बोलून हे नाकारणे आता नको
हे असे आभासवाणे चांदणे आता नको

एकट्याच्या सोबतीला ज्याक्षणी आलीस तू -
अन् मला वाटून गेले, थांबणे आता नको!

बहर ओसरताच आले भान वार्‍याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको

त्या निरोपाच्या क्षणी ती बोलली नजरेतुनी -
एकही कुठलेच हळवे मागणे आता नको

मी मनाच्या जवळ आता जात नाही फारसा
खोल या डोहामध्ये डोकावणे आता नको

तूच बोलावेस आता, 'हो' म्हणावे मी तुला
पण अबोल्याच्या दिशेने खेचणे आता नको

पाऊस - रायगड प्रदक्षिणेतला!

Submitted by आनंदयात्री on 28 July, 2014 - 01:59

तो कोसळला! बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच! एकदा धाडबिडीच्या खिंडीत आणि नंतर काळकाईच्या खिंडीत!

सोमजाई मंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात केली तेव्हा त्याने जोरदार सलामी दिली. भातशिवारं हिरवीगार रोपांनी डोलत होती. पाऊलवाटांमध्ये पाणी पाणी झालं होतं. चिखल मायेने पाय धरून ठेवत होता. सारवलेल्या अंगणातून आणि पागोळ्यांच्या तळ्यांतून आम्ही झपाझप पाय उचलत होतो. पावसाचा दमटपणा त्या कौलातून आत उतरणारा. घरातले म्हातारे आम्हाला निरखून बघणारे. घरातले कर्ते भातखाचरांमध्ये लावणीमध्ये बुडालेले.

आलायस तर खरा!

Submitted by आनंदयात्री on 16 June, 2014 - 00:29

आलायस तर खरा...
आता थांबणार आहेस की
दडी मारणार आहेस लगेच
हुरहूर लावून?

मनाचं ओसाड माळरान आधीच तापलंय, वैतागलंय...
त्यावर आता पाऊलभर हिरवी शाल पांघरशील,
निष्प्राण पायवाटेत नवी ओढ रुजवशील
आणि नंतर नेहमीच्या लहरीपणाने पाठ फिरवशील!
मग पहिल्याहून अधिक असह्य
दुष्काळ सोसावा लागेल...

हे सगळं व्हायच्या आधीच सांगतोय -
एकतर थांब तरी, किंवा मग जा तरी!

तुझी वाट पाहणं चालूच राहील -
तू सगळे बहाणे विसरून, तुझा हट्टीपणा सोडून,
आवेगाने, ओढीने आणि तृप्त मनाने
बरसू लागेपर्यंत!

तेवढा उन्हाळा सहन होईल या मनाला...

- नचिकेत जोशी

'आजोबा' प्रिमीअर

Submitted by आनंदयात्री on 12 May, 2014 - 06:56

'कृपया सगळ्यांनी लवकरात लवकर बसून घ्या. खुर्च्या पुरणार नाहीयेत, त्यामुळे मिळेल तिथे बसून घ्या प्लीज. मराठी चित्रपटांच्या प्रीमिअरला इतकी गर्दी होत असेल तर मराठी सिनेमाला किती चांगले दिवस येतील हे आपण बघू शकतो'... दिग्दर्शक सुजय डहाकेच्या या वाक्यांवर जोरदार टाळ्या पडल्या आणि आम्ही (पुरूष मायबोलीकर) पायर्‍यांवर बसलो.

विषय: 

शिवशाहिरांच्या आठवणींचा 'बेलभंडारा' : पुस्तक परिचय

Submitted by आनंदयात्री on 28 April, 2014 - 02:14

पुस्तकाचे नावः बेलभंडारा
लेखक - डॉ. सागर देशपांडे
प्रकाशन - सह्याद्री प्रकाशन
प्रथमावृत्ती - ३ ऑगस्ट २०११
किंमत - रू. ६९९

*********************

... तितकीच आहे!

Submitted by आनंदयात्री on 25 March, 2014 - 05:58

आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
प्रार्थनेमध्ये अजूनी याचना तितकीच आहे

विषय कुठलाही असू दे, बोलण्याचा हक्क आहे!
हातवारे ठाम जितके, वल्गना तितकीच आहे

'लांबुनी पाहेन' म्हणतो, सर्वथा रममाण होतो
घेउनी संन्यास अजुनी, वासना तितकीच आहे

टाकतो कुंपण सभोती, आत मग बेफाम जगतो
जेवढे आहे खरे हे, कल्पना तितकीच आहे

या ढगांच्या आतले कोणी रिते झाले असावे!
बरसणे झाले कमी पण गर्जना तितकीच आहे

फार भारावून जाण्याएवढे काहीच नाही
(या नव्या दु:खातसुद्धा यातना तितकीच आहे)

Pages

Subscribe to RSS - आनंदयात्री