आनंदयात्री

स्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...

Submitted by आनंदयात्री on 2 January, 2013 - 00:44

२०१३ चा पहिला सूर्योदय सुधागडवरून पाहिला. हवामान ढगाळ असल्यामुळे सूर्यरावांनी पहिल्याच दिवशी 'लेटमार्क' नोंदवला. घनगड डोंगररांगेच्या पाठीमागून या सूर्योदयाची काही प्रकाशचित्रे -



दाटते आहे निराशा (तरही)

Submitted by आनंदयात्री on 15 November, 2012 - 01:46

'दाटते आहे निराशा फार हल्ली' या अतिशय सहज तरीही प्रभावी ओळीबद्दल ज्यांची कुणाची असेल त्यांचे अभिनंदन! मला फार आवडली ही ओळ.. माझा हा प्रयत्न
(मूळ गझलेत चिकार शेर आहेत. त्यापैकी निवडक शेर इथे देतोय. संपूर्ण गझल ब्लॉगवर वाचता येईल)

दाटते आहे निराशा फार हल्ली
देत नाही दु:खही आधार हल्ली

बंद काचेमागचे दिसते कुणाला?
लाजही करते खुला व्यभिचार हल्ली

प्रेम, नाती, दु:ख, शपथा, मौन, ओळी
वाटती हे फक्त सोपस्कार हल्ली

मुखवटे ती घालते जुलमी सुखाचे
वेदना जगते तिची लाचार हल्ली

ठेचली जातात स्वप्ने शेकड्यांनी
धावते आयुष्य बेदरकार हल्ली

भेट अपुली हेच औषध फक्त आता

तुला दुरून पाहणे (तरही)

Submitted by आनंदयात्री on 12 October, 2012 - 06:00

तुझे दुरून लाजणे निमित्त वाटते मला
तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला

तुला जपावया कुणी जवळ कशास पाहिजे?
तुझ्यासभोवती तुझीच गस्त वाटते मला

मनातल्या मनात छान मोकळीक वाटते
घरातल्या घरात फार शिस्त वाटते मला

तुझ्यासवे समग्र विश्व पूर्ण वाटते मला
तुझ्याविना स्वतःमध्येच रिक्त वाटते मला

अनोळखी बनून वाट चालतो कधीकधी
कुणास साथ द्यायची शिकस्त वाटते मला

तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?

तुझ्या भयाण अंतरात गारठा विसावतो
तुझ्या विराण सावलीत तप्त वाटते मला

- नचिकेत जोशी

किल्ले अंजनेरी उर्फ ऋष्यमूक पर्वत

Submitted by आनंदयात्री on 10 October, 2012 - 01:57

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट. ऑफिसच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आठवडाभर नाशिकमध्ये होतो. देवही आम्हा ट्रेकर्सच्या बाबतीत कधी कधी अगदी मेहेरबान होतो. यावेळी मेहेरबानी झाली ती प्रोजेक्टच्या ठिकाणावर! यावेळी कॉलेज होते ते अंजनेरी गावापासून जेमतेम दोन किमीवर! समोर अंजनेरी किल्ला! अगदी पहिल्याच दिवशी दिवसभर गडमाथ्यावर धुकेजलेले ढग होते आणि कॉलेजमध्ये मी बैचेन! कधी एकदा अंजनेरीला जाऊन येतो असे झाले होते. कॉलेजमधूनच गडाचे फोटो घेणे 'तत्त्वात' बसत नव्हते.

विषय: 

पहाट

Submitted by आनंदयात्री on 5 September, 2012 - 07:59

उजाडताना दिसू लागली उजाड फसवी वाट
हूल देऊनी दूर उगवली मोहक धुंद पहाट

घटिका साऱ्या बोलत होत्या अंधाराची भाषा
मनात जागी तरी उद्याच्या उजाडण्य़ाची आशा
खरीच होतील स्वप्ने ऐसी समीप आली वेळ
त्या वेळेची वाट पहाती तळहातीच्या रेषा
परंतु बहुधा ठाऊक तिजला माझे भग्न ललाट
हूल देऊनी दूर उगवली मोहक धुंद पहाट

प्रवास थोडा तरिही होती सहवासाची आस
कुणी सावली बनून होता एक सभोती भास
वाट विलगण्य़ापूर्वीच गेला अलगद सुटुनी हात
मागे उरली आठवणींची ठसठसणारी रात
राहिलाच दूर किनारा, मी तहानलेली लाट
हूल देऊनी दूर उगवली मोहक धुंद पहाट

नव्या प्रवासा निघण्यापूर्वी सहज वळवली मान

विषय क्रमांक १ - 'मै अपनी फेवरिट हूँ' अर्थात 'गीत'!

Submitted by आनंदयात्री on 31 August, 2012 - 10:42

आयुष्य नामक प्रवासाला निघालेल्या प्रत्येक मुसाफिराची कहाणी वेगळी! आयुष्य म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांतून प्रवास करत करत शेवटी एका शाश्वत मुक्कामाला पोचण्याची औपचारिकता! पण तो मुक्काम अटळ आहे, म्हणून प्रवास करायचं थोडीच टाळावं?

गीत - एक अतिशयच बिनधास्त तरीही भाबडी 'भटिंडा की सिखणी'! आयुष्य जगण्याच्या कल्पना अगदीच मोकळ्या-ढाकळ्या! तरीही खानदानी परंपरा, संस्कार, कुटुंब यांना मानणारी! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर मनापासून प्रेम करणारी!

विषय: 

आपलं माणूस

Submitted by आनंदयात्री on 28 August, 2012 - 23:11

आपलं माणूस जेव्हा आपलं नसल्याची शंका येते,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच नात्यावर!
एकीकडे असं काही नसण्याची आशा
आणि दुसरीकडे असण्याचं भयसूचक वास्तव
न स्वीकारण्याची इच्छा!

आपलं माणूस जेव्हा आपलं नसल्याचा समज पक्का होतो,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच असण्यावर!
'एकत्र घालवलेल्या सेकंदांचं आणि आठवणींत घालवलेल्या तासांचं
आता काय करायचं', या विचारातून आलेली हतबलता!

आपलं माणूस जेव्हा आपलंच असल्याची खात्री पटते,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच स्वभावावर,
आणि गवसतं - संपण्याच्या वाटेवरून जीव वाचल्यागत
परत आलेलं आणि बरंच काही शिकलेलं - स्वतःचंच इवलंसं मन!

सत्यमेव जयते" अंतिम भाग १३ (We The People)

Submitted by आनंदयात्री on 29 July, 2012 - 00:15

नमस्ते दोस्तहो!

'सत्यमेव जयते' च्या आज प्रसारित होणार्‍या शेवटच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा..

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905

आनंदयात्री - नचिकेत जोशी यांचे अभिनंदन...

Submitted by सेनापती... on 13 July, 2012 - 04:57

मायबोलीवरील प्रसिद्ध भटकेश्वर श्री. आनंदयात्री उर्फ नचिकेत जोशी यांना त्यांच्या आनंदयात्रा या ब्लॉगसाठी गिरिमित्र संमेलनाने आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेत तृतिय पारितोषिक मिळाले आहे.

उत्तेजनार्थ पारितोषिक आपले अजुन एक माबोकर 'हेम' याच्या बॉर्न पीएचडी या ब्लॉगला जाहीर झाले आहे..

... चुकून झाले!

Submitted by आनंदयात्री on 13 July, 2012 - 04:44

अनेकदा जे जगून झाले!
फक्त एकदा लिहून झाले

मला म्हणे ती - विसर मला तू!
बरेच मग आठवून झाले

करून झाल्यानंतर सुचले -
जे झाले ते चुकून झाले!

कागद भिजले, कागद सुकले
जगणे सारे टिपून झाले!

कसे सारखे रडावयाचे?
बदल म्हणुन मग हसून झाले

पसार्‍यातुनी कविता उरली
जेव्हा मन आवरून झाले!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/07/blog-post.html)

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - आनंदयात्री