पुस्तक परिचय

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

Submitted by ललिता-प्रीति on 4 July, 2023 - 08:11

रशियाने युक्रेनवर आक्रमण का केलं?
अमेरिका हाच देश राजकीय, आर्थिक महासत्ता का बनला?
आखाती देशांमध्ये सतत काही ना काही खदखदत का असतं?
आफ्रिकेतले देश इतके गरीब का?
चीनला दक्षिण अमेरिकेच्या आणि आफ्रिकेच्या भूभागात रस का आहे?

विषय: 

The Three-Body Problem - Cixin Liu

Submitted by मामी on 25 May, 2023 - 04:02

कालच The Three-Body Problem हे पुस्तक / कादंबरी वाचून संपवली आणि लिहिल्यावाचून राहवेना. कादंबरी बरीच मोठी आहे आणि तिचा आवाका, तपशील आणि विषय तर फारच भव्य आणि सखोल आहे. मी माझ्या मगदुराप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही कमीजास्त झालं असेल तर समजून घ्यालच. तर .........

विषय: 

श्याम मनोहर - कळ आणि इतर

Submitted by मुग्धमानसी on 23 May, 2023 - 06:24

श्याम मनोहर यांच्या लिखाणाचं गारूड माझ्यावर नक्की कधीपासून झालं ते काही नीट सांगता येणार नाही. कारण त्यांची पुस्तके माझ्या प्रत्यक्ष हातात येण्याच्याही खूप आधीपासून मला त्यांचे लेखन आकर्षित करत होते. वाचनाच्या बाबतीत साधारण एकसारखीच आवड असण्यार्‍या मित्रांच्या तोंडून ’श्याम मनोहर’ वाचच तू एकदा. प्रेमात पडशील. असं वारंवार सांगितलं जात होतं आणि तेही त्यांच्या शैलीविषयीच्या कुतुहलवर्धक उदाहरणांसह आणि वारेमाप कौतुकासह! पुस्तकांची नावे ऐकूनच अचंभित वाटायचे. काहीतरी अचाट अनुभूती या पुस्तकांत असणार हे नक्कीच जाणवले होते.

पुस्तक परिचय : क्लोज एन्काउंटर्स (पुरुषोत्तम बेर्डे)

Submitted by ललिता-प्रीति on 22 July, 2022 - 03:43

पुस्तक आणि लेखकाच्या नावाची जोडी एकत्र पाहिली, तर वाटतं की नाट्य-चित्रसृष्टीतल्या काही व्यक्ती-वल्लींबद्दल किंवा अनुभवांबद्दल लेखन असेल. पण पुस्तकाचं मुखपृष्ठ काही वेगळंच सांगतं... याच क्रमाने विचार करत मी हे पुस्तक उचललं.

पुस्तक परिचय : विश्वामित्र सिण्ड्रोम (पंकज भोसले)

Submitted by ललिता-प्रीति on 28 June, 2022 - 04:28

९० च्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणानंतर आपल्याकडच्या शहरी भागांमध्ये झपाट्यानं बदल व्हायला लागले. नवनवी टीव्ही चॅनल्स, इंटरनेट कॅफे यांच्यामार्फत आधी कधीही न पाहिलेलं एक जग लोकांच्या घरात पोहोचलं. एम-टीव्ही, चॅनल-व्ही यांचाही यात मोठा हात होता. परदेशी पॉप गायकगायिका, त्यांचे म्युझिक व्हिडिओज, त्यातली फॅशन या सगळ्याचं विशेषतः तरुणांना वेड लागलं. पुढे अनेक घरांमध्ये PC दिसायला लागले. वॉकमन्स, मोबाइल फोन्स, CDs ची देवाणघेवाण हे पाठोपाठ होतंच. त्यातूनच पॉर्नोग्राफी बघण्याच्या व्यसनाने शिरकाव केला...

पुस्तक परिचय : Reshaping Art (T. M. Krishna)

Submitted by ललिता-प्रीति on 25 August, 2021 - 03:48

कर्नाटकी शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांनी कला, कलासाधना यासंदर्भातली सहसा चर्चा न होणारी एक मिती या पुस्तकात सुस्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकानुनय, रसिकानुनय, आनंद, विरंगुळा - कलाविष्कारांवरचे असे जगमान्य पापुद्रे काढून टाकून जगण्याचा शोधक प्रवास म्हणून कलेला आपलंसं केलं पाहिजे; कलेला जातीभेद, वर्गभेद, धर्मभेद यांच्या चौकटीत अडकवून ठेवता कामा नये; कला ही त्यापलिकडचीही एक वेगळी जाणीव आहे; असं ते ठासून सांगतात. हे सांगत असताना त्यांनी आपल्या अनुभवांतून आलेली काही खणखणीत विधानं केली आहेत.

विषय: 

Wonder by R.J. Palacio

Submitted by मन्या ऽ on 14 December, 2020 - 13:28
Wonder पुस्तक परिचय, बुक रिव्ह्यू, R J Palacio

Wonder ही गोष्ट आहे एका दहा वर्षाच्या लहानग्या मुलाची. ऑगस्ट पुलमनची. जो इतर मुलांसारखाच curious आहे.मस्तीखोर आहे. आणि स्टार वॉर्सचा खूप मोठा फॅन आहे. त्याच त्याच्या आई-वडिलांसोबत, मोठ्या बहिणीसोबत आणि पाळलेल्या पेट- डेजीसोबत गोड- प्रेमाचं नातं आहे.. पण या कादंबरीची tragedy म्हणजे त्याचा चेहरा. ऑगस्टचा चेहरा हा जन्मतःच Treacher Collins Syndrome नावाच्या रेअर जेनेटिक कंडिशनमुळे deformed आहे.
कादंबरीत या ऑगस्टची वाचकांना ओळख करून देताना लेखिकेने म्हटले आहे की,
My name is August, by the way. I won’t describe what I look like. Whatever you’re thinking, it’s probably worse.

पुस्तक परिचय - राम गणेश गडकरी यांच्या आठवणी

Submitted by प्राचीन on 13 March, 2019 - 04:58

राम गणेश गडकरीयांच्या आठवणी - प्र.सी.गडकरी

विषय: 

पुस्तक परिचय - आडवाटेची पुस्तकं

Submitted by अश्विनी कंठी on 20 February, 2019 - 00:06

निखिलेश चित्रे यांचे 'आडवाटेची पुस्तकं' म्हणजे नेहमीपेक्षा वेगळया प्रकारची पुस्तक. Book on books ह्या प्रकारातील हे अजून सुरेख पुस्तक.

ह्या पुस्तकाचा विषय आहे जगभरातल्या साहित्यिकांच्या कादंबऱ्या. यातल्या सर्व साहित्यिकांनी ‘कादंबरी’ या वाडमय प्रकारात वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. कधी त्यांनी कथन पद्धतीत बदल केला, तर कधी  पुस्तकाच्या मांडणीमध्ये. काहींनी निवेदन शैलीत प्रयोग केले. कधी पूर्वापार चालत आलेले निकष बाजूला ठेवून प्रयोग केले, तर कधी वाचकाला सक्रीय बनवण्यासारखा नवीन प्रकार साहित्यविश्वात रुजू केला. या अनेकविध नाविन्यपूर्ण प्रयोगांची ओळख म्हणजेच हे पुस्तक.

शब्दखुणा: 

आउटलायर:पुस्तक परिचय

Submitted by अश्विनी कंठी on 3 April, 2016 - 21:27

आपण आपल्या आजूबाजूला लोकांना आयुष्यात यशस्वी झालेले पाहतो आणि त्यातल्या कित्येकांचे वर्णन ‘स्वकर्तृत्वावर पुढे आलेला’ असे ऐकतो. परंतु यशस्वी होण्याकरता हुशारी आणि कर्तुत्व सोडून इतरही अनेक घटक कारणीभूत असतात असे माल्कम ग्लाड्वेल या लेखकाला वाटते. या इतर ‘अदृश्य’ घटकांचा शोध त्याने त्याच्या ‘आउटलायर’ या पुस्तकामधून घेतला आहे. लेखकाच्या मते यशस्वी होण्याकरता ‘हुशारी’ हा जरी मुलभूत घटक आवश्यक असला तरी एका ठराविक टप्प्यानंतर, बुद्धी आणि यश यांचा संबंध नसतो. नाहीतर प्रत्येक हुशार माणूस यशस्वी झाला असता.

Pages

Subscribe to RSS - पुस्तक परिचय