शैशव

प्राक्तन

Submitted by सतीश कुमार on 11 October, 2019 - 01:10

या कवितेचे त्या कवितेशी होते नाते गोते कसले
पुनरपि जननंच्या चक्रावर माझे प्राक्तन आहे फसले

छंद इकडे वृत्तांताचा, उमगत गेले अर्थ पुन्हा ते
विक्रीडित ना शार्दूलाचा वसंततिलका विव्हळत जाते

विरहामधली अधीर तडफड मीलन होता अधर कापते
गूढ हताशा तू नसताना अश्रूंची ही माळ गुंफते

पुन्हा एकदा मिठित घेतल्या अनवट नजरा मुद्रा लोभस
वात्सल्याचा ओघ अचानक करपून गेला नितांत राजस

शैशवातल्या प्रवासातले अवखळणारे शिशू निखालस
भिरभिरणारे इवले डोळे सागर सुंदर नितांत सालस

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शैशव