अमेरिकेत दिवाळी फराळ ऑर्डर करणे

Submitted by sneha1 on 9 October, 2021 - 18:02

नमस्कार मंडळी!
दिवाळी आहे आता पुढच्या महिन्यात. तर, तुम्ही लोक दिवाळीचा फराळ कुठून ऑर्डर करता? अमेरिकेतल्या आणि भारतातल्या, दोन्ही वेबसाईट्स सांगा ना प्लीज.
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या गावात मराठी मंडळ/कम्युनिटी आहे का..
बेस्ट म्हणजे तिथे विचारणे.. काही हौशी लोक दिवाळीत विकतात फराळ...

यावर्षी परांजपे फुड्स, डोंबिवली मधून ऑर्डर केलाय. यांच्याकडून पहिल्यांदाच ऑर्डर करतोय. फेसबुक पेज आहे. फराळ कस्टमाईज करू दिला, आणि बरोबर आणखी काही नॉन फराळ गोष्टी ही पाठवण्याची तयारी होती. पर्सनल मेसेंजरवर बोलून ह्युमन टच होता. पैसे भारतीय करन्सी मध्ये सांगितले आणि तसेच ट्रान्स्फर केले. डॉलर मध्ये करायची सोय इ. आहे का कसं माहीत नाही.

गेल्यावर्षी पणशीकर, दादर कडून ऑर्डर केलेला. त्यांच्या साईट वरून ऑर्डर केलेला. अमेरिकन क्रेडिट कार्ड वरून पेमेंट सीमलेस झालेलं. चव ठीक होती. करंज्या आवडल्या नाहीत, नारळाला वास होता. क्वान्टीटी कमी होती, पण अगदी आयत्यावेळी ऑर्डर केलेला आणि चौथ्या दिवशी मिळाला, सो कांट कंपलेन.

यावर्षी परांजपे फुड्स, डोंबिवली >>> ईस्ट ला परांजपे अन्नपूर्णा पीठघर आणि वेस्ट ला परांजपे स्टोअर आहे तेच का परांजपे. असतील तर ईस्टचे दुकान माझ्या स्कूल फ्रेंडचे आहे, वेस्ट ला भाऊ वहिनी असतात बहुतेक. हेच असतील तर ते बाहेर देतात डिलिव्हरी हे माहिती नव्हतं मला.

धन्यवाद.
अमितव, बघते परांजप्यांची साईट.
सीमंतीनी, इतक्या वर्षांत कधीच फराळ मागवला नाही भारतातून. अन इथलेही ऑप्शन्स बघायचे आहे.
कुणाला सुमा फूड्स चा अनुभव आहे का?

कमी खर्चात घरी ताजे व खात्रीचे बनवून होईल. चिव् डा शेव करंज्या शंकर पाळी हे सो पे आहे व इथे रेसी पी पण आहेत. भारतातून मागविलेले शिळे व भेसळ युक्त असू शकते तेव्हा बघून निवडा. इथल्या एक सभासद अनारसे पीठ पाठवतात . भारतातील मालात तेल व खवा नक्की काय वापरतात ते खात्री करून घ्या. शुभ दीपावली.

सोपे तर सगळंच आहे पण कधी कधी सामग्री मिळत नाही. एक वर्षी चकलीची भाजणी नाही मिळाली - तांदूळ-बटाटा असली काहीतरी रूचिरातलीच पण वेगळी रेसिपी करावी लागली होती. त्यापेक्षा शक्य असेल तर, चांगल जवळ मिळत असेल तर मागवावं. कधी वेळ नसतो. एक वर्षी बाकी घरी केलं पण शंकरपाळे तळत बसायचे जीवावर आले. मग मागवायचे. कधी दुकानात गेल्यावर सुंदर शेव दिसते. मग घ्या विकत... अमा, तू बॉटल खोल,.. मैं एक एक आयटम के किस्से बताती तेरेको...

तांदूळ-बटाटा असली काहीतरी रूचिरातलीच पण वेगळी रेसिपी करावी लागली होती>> तांदुळाची बटर मुरुक्कु चांगली होते. कणकेची झटपट चकली रेसीपी पण आहे. वेळेचा व मेह नतीचा प्रश्न नक्कीच येउ शकतो.

इथे काय होते सणा सुदीला फार मागणी असते व त्यामानाने रॉ मटेरिअल महागात पडते हलवायांना मग भेसळ होते. इथे घरगुती करून विक णारे खूपच लोक्स आहेत नातेवाइकांना विचारून खात्रीचा घरगुती सप्लायर शोधून फेड ए क्ष किंवा ब्लूडार्ट अश्या क्वालिटी कुरीअर कडून मागविता येइल.

ठाण्यातील प्रशांत कॉर्नर हे परदेशी पाठवतात. http://www.prashantcorner.com/ भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. ह्यांना संपर्क करा.

आमच्या कंपनीत दर वर्शी दस र्‍याला एक एक किलोच्या मला वाट्ते सहा सातशे तरी बॉक्सेस ह्यांच्या वाटता त. क्वालि टी चांगली असते. मला मधुमेह आहे म्हणून मी माझी बॉक्स फॅसिलिटी वर्कर ला देते. एकदा त्याने ती बर्फीची बॉक्स बहिणीला दिलेली होती ते ऐकून फार हळवे वाटलेले. फॅसिलिटी वर्कर थर्ड पार्टी असल्याने त्याम्ना मिळत नाही.

मी चिवडा शेव शंकरपाळी ट्रायल बॅच करून बघितल्या वीकांताला.

भारतातून मागवणेपेक्षा लोकली ताजे मिळू शकते. >> पण लोकली घेतील का मराठी लोक्स? $२-३ ला मिळणारे महाग कालनिर्णय कॅलेंडर कशाला घ्यायचे, म्हणून भारतातून मागवतात. Light 1

गोडबोले स्टोअर्स दादर मुंबई .यांचे पण सगळ्या देशात दिवाळी फराळ चे हॅमपर्स जातात. पदार्थ छान असतात. त्यांच्या गोडबोले स्टोअर्स या वेबसाईटवर माहिती मिळेल.

हा धागा आम्हा भारतात दिवाळी फराळ न करणाऱ्या राज्यातल्यांनाही उपयोगी आहे.

हैदराबादेत कोटी भागात आहेत ऑर्डर प्रमाणे करून देणारे, पण कोण जाणार तिकडे, तेवढ्या वेळात आणि दगदगीत घरी करून होते. त्यापेक्षा ऑनलाइन बरे.

हैदराबादेत कोटी भागात आहेत ऑर्डर प्रमाणे करून देणारे,>> बडी चौडी पोलिस स्टेशन समोरील गल्लीत अरूण जोशीचे दुकान आहे का अजून? लै भारी लोण ची व इतर फरा ळाचे.

इथली माबोवरची हर्षदा / आदिती जोशी दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स घेते. माबोवरच्या चिक्कार मैत्रिणी तिच्याकडुन गौरीसाठी, दिवाळीसाठी किंवा अधेमधे ऑर्डर करत असतात. मी टेस्ट केलं आहे, पदार्थ आणि raw मटेरियल उत्तम असते. गोडा मसाला, मेतकुट तर मी फक्त तिच्याकडेच ऑर्डर करते. कष्टाळू आणि प्रामाणिक आहे, त्यामुळे क्वालिटीबद्दल शंकाच नाही. मी तिला विचारून नंबर इथे देईन.
हैदराबाद तर शक्यच आहे, पण मला वाटतं तिला US ला पाठवायला पण जमायला हवं.

अमा ते दुकान आहे अजून (२०१६ मध्ये तरी होतं)
लोणची, चटणी मराठी पद्धतीची मिळतात एवढंच.
फराळ: चिवडा तेलकट, चकल्या ओके पण तेलकट, शंकरपाळी चांगली. लाडू त्यांच्यापेक्षा लोकल पुल्ला रेड्डींची।चांगली असा प्रकार.

मीरा, जरूर शेअर करा त्यांचा नंबर त्यांची परवानगी असेल तर. यंदा दिवाळीला आम्ही ऑर्डर करू की नाही सांगता येत नाही, पण पाहूणे येणार असतील तेव्हा ऑर्डर करू.

Screenshot_2021-10-11-00-19-09-788_com.whatsapp.png

UK, Singapore - 5499
US - Canada 5599
UAE 3799
IMG-20211006-WA0004.jpg

माझी एक मैत्रिण शिकागो स्थित आहे.
ती आवड म्हणून ऑर्डर नी फराळ करते / विकते.
फक्त ऑर्डर् चे पदार्थ असतात. करून ठेवले ले नसतात. अगदी ताजे असतात. तूप ताजं घरी केले लं असतं.
देश भरात कुठेही पाठवते.
वेब साई ट नाहीये. पण कुणाला हवे असल्यास तिला विचारून तिचा फोन नंबर देऊ शकेन.

आज अचानक बंद मुळे सुट्टी मिळाली आहे. आज रव्याचे लाडू करेन.

आमच्या ऑफिसात काही जुने प्युन( अ‍ॅड्मिन रिसोर्स) आहेत जे पण हे फराळा चे पदार्थ करून विकतात. मी त्यांना सपोर्ट करते. मुलुंड वेस्ट
सिटी ऑफ जॉय च्या समोर राहात होतो तेव्हा एका मुलाने कोकणी प्दार्थांचे दुकान टाकले होते तिथूनही एकदा घेतले होते सर्व. इथे असा घरगुती व्यवसाय करणारे खूपच आहेत. फेसबुक वर मुंबई केटरिन्ग असा गृप आहे. तिथे असे सप्लायर नक्की भेटतील.

बाहेरची कोण तीच चकली घरच्या सारखी होत नाही. आईच्या हातची चव येत नाही. व तेल फारच असते . काहीतरी घालतात त्याने जळ जळ होते - हार्ट बर्न. - कडबोळ्याची भाजणी तर आजकाल कोणालाच माहीत नसते. ही चकली पेक्षा जरा वेगळी डार्कर कलरची असते
मी लहान पणी कडबोळी बनवून दिली आहेत. आमच्याकडे हात जोडणी पण म्हणत. सायीच्या दह्याबरोबर किंवा लोण्या बरोबर ऑसम लागतात.

चिव्डे तीन प्रकारचे: पातळ पोह्याचा, भाजक्या पोह्याचा व सुकविलेला कांदा तळून घातलेला एक.
मास्टर रेसीपी वाले विश्णूजी त्यांच्या चॅ नेलवर कोण ते तरी रेडीमेड मसाले जाहिरात करत असतात. आवडत असल्यास ते मसाले पण मागवता येतील. ह्यांच्या चॅनेल वर एक हिरवा चिवडा पण आहे तो ही भारी आहे. तळ लेले हिरवे वाटा णे( पीज) कढिपत्त्याची तळ लेल्या पानांची पूड कोथिंबीर तळून व हिरवी मिरची घालायची फोड णीत. छान असेल नक्की.

इन्दुसुता
माझी बहीण सॅनफ्रान्सिस्को मध्ये असते, तुमची मैत्रीण तिथे पाठवू शकेल का ?तिला घरगुती फराळ करून हवा आहे.
तुम्ही नंबर कळवू शकलात तर बहीण त्यांना संपर्क करून पुढची माहिती विचारेल.

मीरा +१ Happy
आदिती अगदी अन्नपुर्णा आहे।
खरच तिने आपला स्पॅन वाढवायला हवा

https://www.saprefoods.com ह्यांच्याकडे ओल्या नारळाच्या करंज्या फार सुरेख मिळतात. भारतात कुठेही कुरीयर ने मिळु शकतात

अरे वा. या फ्रीज मध्ये ठेवता येतात का? म्हणजे तशा ठेवता येतात पण फ्रीज मध्ये ठेवल्याने चव, खुसखुशीतपणा वगैरे बिघडत असेल का? कधी ठेवल्या नाहीत करंज्या फ्रीज मध्ये.

मागे एकदा नाशिकहून प्रसिद्ध पेढे (नाव आठवत नाही आता) आणले होते चव अप्रतिम होती म्हणुन. दुकानदाराने बजावून सांगितले होते फ्रीज मध्ये अजिबात ठेवायचे नाही, चार दिवस टिकतील त्या हिशेबाने न्या, तसे आणले. आणि वर बहिणीकडेही दिले, तिलाही सांगितले फ्रीज मध्ये ठेऊ नको.
पण तिने फ्रीजमध्येच ठेवले आणि दुसऱ्या दिवशी त्यांची ती अप्रतिम चव पार बिघडली होती.

फ्रीज मध्ये अजिबात ठेवायचे नाही>> हो बरोबर आहे. चव व टेक्क्षचर पार जाते. हे मी केसर पेढा, काजू कतली मँगो बर्फी ( चितळे नव्हे) व चितळे आंबा बर्फी ह्या बाबतीत पाहिले आहे.

फ्रिज मधली मिठाई ओलसर होते

इथे काही लोक्स वांग्याचे भरीत व तत्सम पदार्थ झाल्या झाल्या एकदम लो तापमानाला फ्रीझ करून मग पॅक करून एक्स्पोर्ट करतात ते पदार्थ टिक तात. तसे काही भेटले तर बरे पडेल.

ओल्या नारळाची रिस्क घेऊ नये असे वाटते(मध्ये कार्गो,ट्रक वगैरेत तापमानाचे कमीजास्त होऊ शकते.)
बाकी शेव चकली चिवडा बे.ला. वगैरे पदार्थ छान टिकतात.
अनारसे पॉपी सीडस मुळे एक्स्पोर्ट टाळणे.

Suma foods कडून काही वर्षा पूर्वी दिवाळी फराळ मागवला होता… चव पण छान होती….

भारतातून- डायरेक्ट चितळेबंधू कडून मागवता येईल… ह्या वर्षी shipping charges थोडे जास्त वाटत आहेत मागच्या वर्षी पेक्शा ; -)

हर्षदा / आदिती जोशी दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स घेते. >> मला त्यांचा नंबर मिळेल का? देशातल्या नातेवाईकांसाठी हवा आहे.

इंदूसुता, तुमच्या मैत्रीणीचा नंबर अवलचा विपूत मिळाला तो माझ्या मैत्रीणींना देइन. धन्यवाद.

चालेल. मी तिला तसे कळवेन.

ओल्या करंज्यांचा अनुभव आहे, फ्रीज मध्ये माझ्याकडे ३ आठवडे ते महिना व्यवस्थित राहतात. मी रवा नारळ लाडू सुद्धा फ्रीज मध्ये ठेवते नेहमी.

काय सायली राजाध्यक्षांच्या मैत्रीणीचे पेज त्यांनी शेअर केले होते ते इथे देत आहे.
धान्यम हा त्यांचा ब्रँ ड आहे.
पोहे चिव् डा २ प्रकारचा ३०० रु. किलो
कॉर्न चिवडा ३०० रु किलो
खारे शंकरपा ळे ४०० रु किलो

गुळ पापडीचे लाडू ५०० रु किलो
साजूक तुपा तले बेसन लाडू ४५० रु किलो
साजूक तुपातले रवा लाडू ४५० रु किलो
गोड शंकरपाळे साजूक तुपात तळलेले ४०० रु किलो

चकली भाजणी २५० रु किलो
गुळाचे अनारसे पीठ ४०० रु किलो

गोडा मसाला ८०० रु किलो
थलेपीठ भाजणी २५० रु किलो
क्रश लाइम पिकल ७० रु पीपी असे आहे
धिर डे पीठ २०० रु किलो.

हे सर्व अर्धा किलो पॅक मध्ये पण उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीचे तेल व तूप वापरले आहे व आता ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत.

खालील नंबर वर मेसेज करून ऑर्ड र द्यावी
धान्यम सोनाली पाध्ये

९८५०६१७५५४

स्वादबंध स्पेशल १००% घरगुती फराळ! मायेची चव खास तुमच्यासाठी!*
दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्तम दर्जाचा फराळ ते पण तुमच्या खिशाला परवडेल असा पौष्टिक फराळ खालील प्रमाणे घेऊन येत आहे!
साजुक तुपातील लाडू
बेसन लाडू 400/- किलो
रवा लाडू 400/- किलो
मोतीचुर लाडू 600/- किलो

*अनारसे साजुक तुपातील व प्युअर खसखस वापरुन केलेले 800/- किलो*

*अनारसे पीठ 350/-किलो*

*करंज्या*
साधी 20/- नग
ड्रायफ्रूट करंजी 30/- नग
गुलकंद ड्रायफ्रूट करंजी 35/- नग

*शंकरपाळे*
गोड साजुक तुपातील 350/-
खारे 300/-

*चिरोटे साजुक तुपातील*
पाकातील 700/- किलो
साधे 600/- किलो

*शेव*
मुगाची 350/- किलो
तिखट 330/- किलो
साधी 300/- किलो

*चिवडा*
पातळ पोह्यांचा 300/- किलो
कुरमुरे 300/- किलो

*चकली*
भाजणीची 400/- किलो
मुगाची 450/- किलो
ज्वारीची 400/- किलो

*ऑर्डर करण्यासाठी काॅल व मेसेज करा*
*स्वादबंध संचालिका सौ. अमृता केदार जोशी!*
*7774010132*
*7977828760*

टिप: आमचे कोठेही दुकान नाही व कोणाकडून घेऊन विकत नाही! १००% घरगुती व मायेची चवच मिळेल याची खात्री देते!

*भारताबाहेर युके अमेरिका इत्यादी ठिकाणी फराळ पाठवतो! होम डिलिव्हरी देते, पण लोकेशन नुसार अगदी माफक दरात डिलीव्हरी किंवा कुरीअर चार्ज आकारला जाईल!*

वरील माहिती आई च्या महिला मंडळातून मिळाली होती, तिच्या शेजारणीने श्रावणात अनारसे मागवले होते,ते आईने खाल्ले होते,सुंदर होते असा अभिप्राय

जाहिरात करण्याचा हेतू नाही

उपयोगी माहिती आहे.

ओल्या करंज्यांचा अनुभव आहे, फ्रीज मध्ये माझ्याकडे ३ आठवडे ते महिना व्यवस्थित राहतात. >> धन्यवाद.

आम्ही ईथे म्हणजे भारतात फराळ (करंज्यालाडूचकलीचिवडावै) बनवणं खाणं बंद केलंय. आणि आमच्या सारखे बरेच जण आहेत. पण अमेरिकेतले भारतीय भारतातुन फराळ मागवतात. मानलं बुवा. गूड.

बनवणं झेपत नाही. आवड आणि सवड दोन्ही नाही. घरी कुणी आवडीने खात नाहीच. मी केलेलं आहे म्हणुन, आईने पाठवलंय म्हणुन, वाया जाऊ नये म्हणुन खायचे तर पोटाचे प्रॉब्लम.
आता 3-4 प्रकारच्या मिठाया आणतो. ड्हारायफुट आणतो. पाहुणे आले तर मिठाई देतो. शेजारी फराळ देतात त्यांनाही तेच देतो.

>>>>मी लहान पणी कडबोळी बनवून दिली आहेत. आमच्याकडे हात जोडणी पण म्हणत. सायीच्या दह्याबरोबर किंवा लोण्या बरोबर ऑसम लागतात.
कल्पना येते आहे. नक्कीच खमंग कडबोळी व सायटं. यमी!!!

Pages