चला चला दिवाळी आली! 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाची वेळ झाली!

Submitted by यक्ष on 21 October, 2018 - 01:48

आज वर्तमानपत्रात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाची जाहिरात झळकलेली दिसली! म्हणजे दिवाळी येउन ठेपली तर!!

पूर्वी दिवाळीच्या पाऊलखुणा ह्या 'दिवाळी अंकासाठी लेख पाठवा' येथून व्ह्यायची! कपडे शिवायला टाकण्याची लगबग सुरू व्ह्यायची कारण ऐन दिवाळीपर्यंत ते मिळणं अवघड असायचे...टेलर 'मास्टर' तेंव्हा दिमाखात असायचे! आता बिचारे दुर्मिळ झाले!
किराणा सामान आणणे एक मोठे काम असायचे! मोठमोठ्या याद्या...ते तयार करण्यापासून तर सायकलला टांगून ४-५ कि.मी. वडिलांसोबत सगळा ढिगारा सांभाळत आणणे (हे वडिलांचे काम होते) सामान आणून आईच्या क्वालिटी कंट्रोल मधून तपासून घेऊन; वर 'बारिक रवा सांगितला होता...जाडा रवा कां आणलां? अजून समजत नाही कां? केंव्हा शहाणपण येणार? आणी हे भूस्ट का फिस्ट कां आणले हे विचारल्यावर आपण वडिलांकडे बोट दाखवले तर 'तुम्ही पोरांन्ना बाहेरच्या सवयी कां लावताय?' वगैरे ऐकून घेणे आणी सगळे सामान बरण्यांमध्ये भरून, कागदाच्या घड्या करून. दोरे व्यवस्थीत गुंडाळून ठेवण्याच्या आठ्वणी लुप्त झाल्यात!
नंतर सुरू व्ह्यायची 'चिवडा-लाडू' ची खमंग वासाची व नंतर चव बघू म्हणत म्हणत मुठी मुठींन्नी फस्त करण्याची चढाओढ! (आईला चिवडा ३ ते ४ वेळा हमखास करावा लागायचा!)
पाहुण्यांचे जाणे येणे- लगबग...एक वेगळाच उत्साह! अश्या बर्याच आठवणी!!

असो! चांगला दिवाळी पहाट कार्यक्रम निवडून बुकींग करून टाकावे म्हणतो! तेवढीच सुरुवात!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाळी येणार ही एक प्रचंड उत्सुकता असायची ती मी खूप मिस करते दरवर्षी. इतर सणांसारखा हा एक सण झालाय व उरलाय. इतरांकडे सामान आले, फटाके आले, पदार्थ होताहेत, आपल्याकडे कधी होणार याची एक काळजी वाटायला लागायची. आता हसायला येते पण तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या.

खरेच मिस करतेय ती जुनी दिवाळी.