आकाश कंदिल

Submitted by मनीमोहोर on 30 October, 2019 - 12:41

आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
ह्या वर्षी मुलांनी कंदील घरीच करायचा घाट घातला. बाजारातून तयार कंदीला ऐवजी कंदीलाचे कागद घरी आले. मी खळ केली. तरुण मुलांना खळ माहीत नसेल कदाचित तर सांगते . खळ म्हणजे कणीक पाण्यात शिजवून केलेली घट्ट पेस्ट. कणकेतल्या ग्लुटेन मुळे ही कागद चिकटवण्याच काम झकास करते. सांगाडा होताच घरी. पूर्वानुभव ही होता गाठीशी. घरातले सगळेच उत्साहाने पुढे आले कंदील करायला. मी ही त्या करंज्या करायचा घाट पुढे ढकलून ह्या करंज्या ( वरच्या आणि खालच्या पट्टीला जे सजावटी साठी लावलं आहे त्या कंदिलाच्या करंज्या,☺ ) करायला सरसावले. ☺ गप्पा मारत, मागे कसा कंदील करायचो त्या आठवणींना उजाळा देत कंदील कधी झाला ते कळलं ही नाही. अक्षरशः चोवीस तासात कंदील तयार होऊन गॅलरीत टांगला ही गेला.

खूप मस्त वाटतंय आणि कौतुक भरली नजर सारखी तिकडेच वळतेय. दिवाळी संपली की कंदील काढला जाईल पण ह्या कंदील in making च्या आठवणी मनात कायम राहतील आणि मनाला उभारी ही देतील.

हा फोटो.

IMG-20191025-WA0012~2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर झालाय आकाश कंदील. आकाश कंदील म्हटले की मला हाच डोळ्यासमोर येतो.
दिवाळी संपल्यानंतर बरेच दिवस हा कंदील कुणी काढत नाही आमच्याकडे. त्यातला दिवाही रोज लावला जातो एक दोन महिने. यावेळी मात्र पावसाने आकाश कंदिल अगदी आत लावयला लावला आणि लगेच काढायलाही लावला. Sad

आपल्या हाताने केलेली वस्तू बघायला किती छान वाटतं!
बाजारातील आकाशकंदील बटबटीत होतं चालले आहेत, हे पटलं. मी केलेल्या आकाशकंदीलाचा फोटो डकवू का इथे?

शाली, अनिष्का, सामो, अनया प्रतिसादा साठी खूप खूप धन्यवाद.

अनया तू पण केलायस ना घरी कंदील ? घरी केलेले कंदील इथे दाखवा प्लिज.

IMG_20181104_070057291.jpg (88.62 KB)IMG_20181104_070057291.jpgIMG_20181104_193543698.jpg

हा आम्ही केलेला आकाशकंदील..
मनीमोहोर ह्यांचा खूपच छान झाला आहे. आमच्या आकाशकंदीलाचं फिनिशिंग तितकं छान झालं नाहीये. पण करताना मजा आली आणि रोज रात्री उजळलेला कंदील बघताना फार छान वाटायचं.

वाह! खुप सुंदर

माझी हि खुप ईच्छा आहे एकदातरी कंदील करायची
फोटो तर छान आहेच पण कृती पण टाका ना.

आम्हीही गेली ७-८ वर्श घरीच कंदील बनवतो . २ वर्श एकटीनेच बनवला . नंतर मात्र माझ्यापेक्शा जास्त नवर्यालाच उत्साह वाटू लागला .
आमचे ही कंदील असे काहितारी नविन दिझाईन्स (?) चे असतात . पण एकदातरी पारंपारीक आकाशकंदील बनवायची ईच्च्छा आहे .

IMG_20191027_182700.jpg

हा मी यावर्षी केलेला आकाशकंदील. गेल्या वर्षी छावा दिवाळी अंकात आकाशकंदिलासाठी डिझाइन केलेले कार्डबोर्ड आले होते. ते जपून ठेवले होते Happy

शाळेत असताना जवळजवळ दरवर्षी आकाशकंदील घरीच करायचे. ममो, तुम्ही केलाय तसाच, बांबूच्या कामट्यांच्या सांगाड्याचा. इथेही केला होता तसा तीनचार वेळा.

DSC00472.JPG

गंमत म्हणजे मायबोली या वेबसाईटचा शोधही मला आकाशकंदिलासाठी डिझाइन शोधताना लागला होता. हा वरच्या फोटोतला आकाशकंदील मायबोलीवरचं एक डिझाईन बघून केला होता. सांगाडा न वापरता, पण आकार पारंपरिक आकाशकंदिलाचाच.

IMG-20151110-WA0011.jpg

हा सांगाडा वापरून केलेला. पण पूर्ण व्हायचा होता अजून Happy

आणि हो, तुमचा आणि वरचे सगळ्यांचे आकाशकंदील मस्त झाले आहेत . हे सांगायचं राहिलंच Happy

सर्व प्रतिसादकांचे आभार।.

वावे मस्तच झालेत सगळे कंदील.

स्वस्ति, असेल फोटो तर तुमचा ही एखादा कंदील दाखवा इथे.

खरंच वेळात वेळ काढून करून बघा एक वर्ष कंदील घरी. खूप मजा येते. घरात मुलं असतील शाळेच्या वयातली तर त्यांच्या साठी हा एक मस्त क्राफ्ट प्रोजेक्ट आहे.

VB कृती म्हणजे सांगाडा मी कागद काढून टाकून ठेवून देते नीट आणि तोच वापरते खूप वर्षे. त्यामुळे तो कसा करायचा किंवा कामट्या कुठे मिळतात वैगेरे नाही सांगता येणार .

पण सांगाडा तयार असेल तर पुढचं सांगते. आतल्या बाजुने चारी बाजुंना आधी पांढरा कागद चिकटवून घ्यायचा आणि मग वरती हवा तो कागद चिकटवायचा. आधी चौकोन करून घ्यायचे मग त्रिकोण करायचे. Joint वर सोनेरी कागद चिकटवून ते झाकून टाकायचे. वरती खालती करंज्या करून त्या चिकटवायच्या. चारी कोपऱ्यात जरा मोठ्या चार करंज्या करुन तिथली कामटी झाकायची. चारी कोनांवर डेकोरेशन करून ते जॉईंट झाकायचे. खाली शेपट्या आतल्या बाजूने लावायच्या. झाला कंदील तयार.

quilting चा बोर्ड आणि पट्टी ह्यांचा कागद कापण्यासाठी ही खूप उपयोग झाला. अर्थात ते नसलं तरी नक्कीच अडणार नाही.

कंदील करताना पसारा खूप होतो, पंखा लावता येत नाही कागद उडतात म्हणून. खळीचे हात एखाद वेळेस लादीला लागून लादी चिकट होते ... वैगेरे वैगरे ... तरी खूपच मजा येते ह्यात शंका नाही.

हा कंदील in making चा फोटो

IMG-20191024-WA0011.jpg

मस्त झालाय कंदिल.
विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत>>>>>+१
गेल्या वर्षीपासुन माझी मुलगी घरी कंदिल बनवते.
साधा सोपा गोड वाटतो तिने केलेला कंदिल.
गेल्या वर्षीचा मस्तच जमुन आलेला.
ह्यावेळी जरा फॅन्सी करायच्या हट्टात थोडं फिनीशिंग गंडलं. तरी तसाच लावलाय. Happy

बरेच रंगीत कागद घेण्यापेक्षा एकदोन रंगांचे कागद वापरूनच कंदील छान होतो.
चकली कंदीलही मजेदार. आपापले कंदील दाखवलेत. छान.
सगळ्यांचे आकाशकंदील मस्त झाले आहेत .
लहान मुलांनी उत्साह दाखवला तर पुढच्या खटाटोपीचं काहीच वाटत नाही.
.

ओला बांबू मिळाला तर त्याच्या कामट्या सहज बनतात - अगदी सुरीने पण! वाळलेल्या बांबूच्या मात्र करायला कठीण जातात.

रेडीमेड कामट्या पतंगाच्या दुकानात मिळतात. फक्त थोड्या जाड बघून घ्याव्यात.

आणि सांगाडा परत परत वापरायचा असेल तर खळच वापरावी. पुढच्या वर्षी ओल्या फडक्याने सांगाडा सहज साफ होतो. फेविकॉल वापरले ते पटकन निघत नाही. आणि वाळलेल्या फेविकॉलवर कागद नीट चिकटत नाही.

आकाशकंदील फारच सुंदर, आकाशकंदील म्हटलं कि हाच डोळ्यासमोर येतो.
मी नेहमी असाच कंदील आणतो / बनवतो. टिकतोही बराच.
ह्याचा सांगाडा पुन्हा पुन्हा वापरता येतो.
स्वतः बनविण्याचा आनंद आणि प्लास्टिकमुक्त दिवाळी ......

हा काही वर्शांपूर्वी बनवला होता . वर अनयाने बनवला आहे थोड फार तसच टेक्निक . फिनिशिन्ग तितकस चांगल जमल नव्हत . आणि जांभळ्या रंगाच्या कागदामुळे रात्री तितकासा प्रकाश ही पडत नव्हता . Happy

>IMG1198.jpg

या वर्शीचा टाकते नंतर .

वावे सर्व कंदील सुंदर. स्वस्ति मस्त आहे कंदील.

माझी बहीण करते कंदील, तिची छोटी मुलगी मदत करते आणि दरवर्षी मला देते.

Pages