सामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ ?

Submitted by प्राक्तन on 4 June, 2011 - 02:28

सामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ ?

खरच काय असतं हे ? कारण आपण लहानाचे मोठे होताना ५६ वेळा ऐकतो हा शब्द. एखादा शब्द वापरताना त्याचा अर्थ माहित असलाच पाहीजे अशी पद्धत अजूनतरी आपल्याकडे नाही आहे. मोठे मोठे शब्द वापरून जन निर्माण करण आणि अजून मोठे शब्द वापरुन ते टिकवणं महत्वाच.

तर विचारायचा हेतू निर्मळ आहे. मला याचा अर्थ हवाय. कारण बांधिलकी आपण बरयाच नात्यांत पाहतो. रक्ताचीच असतात बहुतेक नाती. मग समाजाच काय? तो मधेच कुठून आला? मी माझ्या समाधानासाठी अर्थ काढलाय पण परत असंख्य प्रश्न निर्माण झालेत. तर मी आधी अर्थ सांगतो आणि प्रश्न विचारतो.

सामाजिक बांधिलकी म्हणजे बहुतेकआपल्या समाजाबद्दल आपुलकी वाटणं. इथेच पहिला प्रश्न येतो. कुठला समाज माझा ? मी ज्या भाषेतला / जातीतला / धर्माचा / देशाचा आहे तो ? मग तर मी ४ समाजात आहे.

१. आधी भाषा - माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी प्रामुख्याने मराठी व इंग्रजी भाषा बोलतो. मग माझा भाषिक समाज कोणता ? मराठी की इंग्रजी ?

२. माझी जात - माझी जात क्षत्रिय असली म्हणुन मी काय लढायला जात नाही. बाकी कोण क्षत्रिय आहे ते मला माहित नाही. गावात पण १७६० उपजाती. कोणी चौकळशी तर कोणी पाचकळशी. आता दोन्ही जाती क्षत्रियकुलोत्पन्न आहेत, तरी पाचकळशी स्व:ताला श्रेष्ठ समजतात. इतरही जाती आहेत, पण मला पुरेशी माहिती नाही. मग क्षत्रिय हा जातिवाचक समाज कोणता ? आणि तो माझा कसा ?

३. माझा धर्म - माझा धर्म जन्माच्या दाखल्यावर हिंदू आहे म्हणून मी हिंदू. बाकी माझ्यात हिंदुत्ववादी असं काहीच नाही. ना मला हिंदू असण्याचा अभिमान ना मला हिंदू असण्याची लाज ! [ एकदा वाटली होती, गोध्रा दंगलींच्या वेळेला ] मी गोमांस (beef) खातो. आता मी नास्तिक आहे म्हणून गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात, म्हणून गोमांस निषिद्धआहे अस काही मी मानत नाही. मी सूकरमांसही (pork) वर्ज्य नाही. दोन्ही मी आवडीने खातो.
[ हिंदूंना गोमांस आणि मुस्लिमांना सूकरमांस निषिद्ध आहे, असं म्हणतात. ]
मी जन्माने हिंदू आणि करणीने हिंदू नाही आणि जन्म वा करणीने मुस्लिम पण नाही. मग मी कोण ? आणि माझा धार्मिक समाज कोणता ?

४. माझा देश - मी इंडियामधे राहतो आणि तरीही माझा देश भारत आहे. इंडिया आणि भारतातला फरक कळण्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून भारतच माझा देश आहे ! [ आभार - शालेय पुस्तकांतील प्रतिज्ञा (pledge) ] . आता इंडियन सोसायटी ( Indian society) माझी की भारतीय समाज माझा ?

माझी सामाजिक बांधिलकी कुठली मग ? आणि ती कुठल्या समाजाप्रति असावी ?

लोभ असावा,

कळावे,
प्राक्तन पाटील

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

म्हणजे?... तुम्ही जिथे राहाता तो तुमचा समाज आणि त्या समाजाच्या सामुदायिक (आणि पर्यायाने स्वतःच्या Happy ) हितासाठी काम करणे ही तुमची बांधीलकी. यात भाषा / जात / धर्म यांचा तर काडीचा संबंध नाही. देशाबद्दल म्हणायचं तर, भारतीय नागरीकाने भारताबाहेर राहातानाही भारतीय समाजाशी बांधिलकी ठेवणं बरोबर का जिथे राहाताय त्या समाजाशी? (मी सामान्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल बोलतोय... उगाच देशद्रोह/हेरगिरी हे टोकाचे मुद्दे नकोत)

sam, its not hard to understand your feelings abt it. but if u take wider view, u get to know language, cast and religion are equally important. its not just where u stay or where u live.

and for nikhil khaire, grow up boy.

you are taking wider view? i doubt... भाषा हे संपर्काचे माध्यम आहे. जिथे राहतो ती भाषा शिकल्याशिवाय त्या समाजाचा हिस्सा कसे बनाल... मग फ्रान्समधे फ्रेंच न शिकल्याने काही जणांचा 'समाज' भारतीय ग्रूप्स आणि महाराष्ट्र मंडळ एवढाच सिमीत राहतो. जात, धर्म ह्या वैयक्तिक बाबी आहेत. जर त्यावर समाज define केलात तर आर्थिक स्थिती, व्यवसाय, वर्ण, gender यावरूनही समाज define करता येईल. या संकल्पनांनी काही लोक एकत्र आले तरी in 'wider' view ( Wink ) समाजात दुही वाढेल.