बदल

नवे भारतीय मंत्री मंडळ : कोण? का? कधी पर्यंत?!

Submitted by अश्विनीमामी on 7 July, 2021 - 05:34

आज भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतो आहे. २०१९ मध्ये कार्य भार संभाळ ल्यावर आज प्रथमच मंत्री मंडळात महत्वाचे बदल होत आहेत. काही मंत्री राजीनामा देउन पाय उतार झाले आहेत . काही नवे चेह रे आले आहेत. शपथ विधी आज सात तारखेला संध्याकाळी आहे.

जोश

Submitted by आर्त on 21 March, 2021 - 16:02

पुन्हा जोश आला, पुन्हा मान्य केले,
बदल घडवण्याचे, अरे दिवस गेले.

किती भार झाला, कितींच्या मनावर,
कुणी हसत वेडे, कुणी मौन मेले.

खरे गोड होते, तुझे हासणे गं,
जणू देव अंगी, प्रिये उतरलेले.

तमेचे उपासक, मनाच्या किनारी,
जशी रात राणी, तिचे सर्व चेले.

दुरूनी दिसे ती, तरी दर्द होतो,
नयन तीक्ष्ण इतके, तिचे बोचलेले.

कसे तूच केले हुशारीत सौदे,
हवे ते न देता, रुचे तेच न्हेले.

- आर्त २१.०३.२०२१

-----
नेहेमीप्रमाणे मुक्त टीका, दाद आणि चर्चेस आमंत्रण. धन्यवाद.

विषय: 

माणसं बदलत राहतात.. तुम्ही काय किती बदलला आहात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 November, 2019 - 06:21

कॉलेजातला जुना मित्र आपल्याला अचानक बाजारपेठेत दिसतो. शर्ट पॅन्ट ईन खोचून. बायकोचा हात धरून. कडेवर पोरगा. खांद्यावर पिशव्या. आणि आपल्याला प्रश्न पडतो सतरा पोरींच्या भानगडी करणारा आणि त्यातल्या चारचौघींच्या कानाखाली खाणारा परश्या हाच का? पण आता त्याचा परशुराम झाला असतो जे त्याला ईतक्या वर्षांनी पाहिलेल्या आपल्या पचनी पडत नाही.
असंच मग एखादा शिवीगाळ शिवाय एकही पुर्ण वाक्य न बोलणारा पक्या आता रोज टिळा लाऊन सत्संगच्या नादी लागलेला दिसतो. तर एखादा आधीचा गूडबॉय चंदन आता दारूशिवाय आपल्याला जमतच नाही असा झाला असतो.

विषय: 
शब्दखुणा: 

पूर्वी आणि आता...

Submitted by अतुल. on 8 July, 2019 - 10:28

गेल्या पंचवीस तीस वर्षात काळ झपाट्याने बदलला. माझ्या पिढीने एक संक्रमण पाहिले. माहितीतंत्रज्ञानाने देशात घडवलेली क्रांती पाहिली. वैचारिक, सामाजिक, आर्थिक व इतर अनेक स्तरांवर बदल घडून आले. राहणीमान विचारसरणी दृष्टीकोन. खूप सारे बदलले. आजच्या काळात आपण सहज मागे पाहिले तर हा बदल ठळकपणे दिसून येतो. त्यांचेच हे छोटे संकलन...
.
(अर्थात सर्वांनाच हे सगळे बदल जाणवतीलच असे नाही. पण ही मला व माझ्यासारख्या अनेकांना जाणवलेली काही निरीक्षणे)
.
पूर्वी: येत्या रविवारी ना, आपल्याकडे मुंबईचा मामा येणार आहे. मुंबईची मिठाई घेऊन.

शब्दखुणा: 

'काय बदललं?'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 26 December, 2012 - 23:29

१९९२ साली भारतात सुरु झालेल्या जागतिकीकरणानं बाजाराचं व्याकरण बदलून टाकलं. 'गोष्टी जपून वापरा, पिढ्यान् पिढ्या टिकवा' ही शिकवण मागे पडून 'अधिक खरेदी करा, वापरा आणि फेकून द्या' या मूल्यानं भारतीयांच्या मानसिकतेत शिरकाव केला. परदेशी ब्रँडदेखील सुलभतेनं मिळू लागले तसं साहजिकच एकेका गाडीसाठी सहा महिन्यांच्या प्रतीक्षायादीचे किस्से जुनेपुराणे वाटू लागले.

डालड्याचा पिवळा डबा, चेतकची स्कूटर, बोटांनी गोलगोल फिरवत डायल करायचा टेलिफोन ते आजच्या स्टायलिश चारचाकी गाड्या, आयफोन या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. बाजारव्यवस्था बदलली, तसे नातेसंबंध बदलले, आपली परस्परांतली वागणूकही बदलली.

बंड्याची दिवाळी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 28 October, 2011 - 03:24

आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही.

गुलमोहर: 

बदल --- लघुकथा ----जयनीत दीक्षित

Submitted by जयनीत on 1 July, 2011 - 01:08

नारायण! नारायण!! नारदमुनी प्रवेश करते झाले.
या मुनीश्रेष्ठ या! काय हालहवाल आहे पृथ्वीतला वरचा? ब्रम्हदेव म्हणाले.
अहो आश्चर्यम्! खलु आश्चर्यम्!! नारदमुनी म्हणाले!
विराजमान व्हा, अन जरा विस्ताराने सांगा मुनीवर! कसले आश्चर्य? ब्रम्हदेव म्हणाले.
फार थोडया काळात खूपच बदल घडला आहे पृथ्वी वर देव. नारद मुनी म्हणाले.
कसला? ब्रम्हदेवांनी विचारले.
काही काळा पूर्वी तेथे सर्वत्र राजेशाही होती ह्यावर विश्वासच बसत नाही देव, आता तिथे सगळीकडे लोकशाहीचा बोलबाला आहे. नारद मुनी म्हणाले.
असं! मग? ब्रम्हदेव म्हणाले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कल्चरल उदात्तीकरण

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बदमाश टिव्ही ची स्फुटके अधुनमधुन येत असतात. आजही एक असेच स्फोटक आले. त्यात त्यांच्या इतक्यातल्या प्रसिद्धीबद्दलचा एक दुवा होता. ईंडीया करंट्स वरील त्या दुव्यावर त्यांच्यासारख्याच इतर उपक्रमांबद्दलची माहिती होती. अनेकांना आक्षेपार्ह, काहींना त्याज्य तर उरलेल्यांना चलता है वाटेल असा हा प्रकार आहे. संस्कृतीला अधीक पाय फुटुन जास्त ठिकाणी पोचता येईल म्हणुन का होईना मी त्या शेवटच्या प्रकारात मोडतो.

http://www.indiacurrents.com/news/view_article.html?article_id=f0c5d2e0c...

प्रकार: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बदल