लेगो गणेश
नाव : हर्ष
वय : साडेनऊ वर्षे
माध्यम : लेगो ब्लॉक्स
मदत : मॉडेल म्हणून गणपतीचा फोटो शोधून देणे.
आज सकाळी मायबोली गणेशोत्सवाबद्दल घरी सांगत होते तेव्हा त्याला एकदम मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात दिलेल्या चित्राची आठवण झाली. ह्या वर्षी चित्राऐवजी दुसरं काहीतरी म्हणून मग लेगोचा गणपती करायचा ठरवला. आणि अवघ्या १/२ तासात हा बाप्पा तयार झाला 
बाल गणेश
सानिका, वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, क्रेयॉन्स, रंगीत मार्कर्स
माझी मदत : रेफरन्स म्हणून अनेक चित्रे नेटवरून शोधून तिला दाखवणे,
(बाकी प्रयत्न बराच केला, अगं हात पाय असे का, ते तसे कर, हातात चेंडू नाहिये काही तो, मोदक असा असतो वगैरे पण तिने जाम ऐकले नाही, शेवटी म्हणाली "व्हाय डोन्ट यु ड्रॉ युअर ओन गणेशा?"
)

गडद निळे गडद निळे यंदाचे टीशर्ट आले
चपलचरण हे हरीण जणू,सुखवस्तू अन् तुंदिलतनू
लेऊनी रंग हर्षाचे,मायबोलीकर हे वविला निघाले
ह्रदयी आले भरते गं, मनात सावरी फुलते गं
बरसती अंबर, सृष्टी सुंदर, लेवूनी स्वरसाज गाती गं
उत्साहाचे लेणे गं, अविरत आनंद झिरपे गं
सरींवर सरी येती गं, सचैल मायबोलीकर न्हाती गं......
(कवी बा. भ. बोरकर ह्यांची क्षमा मागून...)
जून महिना आला, पाऊस आला, वविची दवंडी आली आणि पाठोपाठ मायबोलीचे टीशर्टही आले की... 

मायबोलीवरील विषयवार यादी मधे कविता विषयावर केलेले हे (रिकामटेकडे) संशोधन
कविता या विभागाखाली आज २८-०४-२०१० दिवशी पर्यंत पोस्ट झालेल्या कविता : ४०००
यात सर्वात जास्त संख्येने कविता लिहीणारे टॉप ५ कवी खालील प्रमाणे आहेत.
Harish_dangat- २०७ कविता
अज्ञात - १९६ कविता
कौतुक शिरोड्कर -१८३ कविता
विशाल कुलकर्णी - १३७ कविता
बासुरी - ९९ कविता
आर्जे आणि एस्जे ह्यांच्या पुढाकाराने अटलांटावासी मायबोलीकरांनी एकत्र दिवाळी साजरी केली. ह्यावेळी यजमानांची भुमिका जोग दांपत्याने स्विकारली होती आणि त्यांच्या आदरातिथ्याने सर्वच उपस्थित मायबोलीकर भारावून गेले आहेत. घरचे लक्ष्मीपुजन आटोपून सगळे जण ७ च्या आसपास आर्जे च्या घरी जमले. तिथे दिवे, पणत्या लावण्यापासुन सुरुवात झाली. मग मुख्य फराळाचा कार्यक्रम पार पडला..
ह्यात शिल्पा, पूर्वा, मो ह्यांनी बनवलेल्या चविष्ठ आणि फोटोजनिक फराळाच्या पदार्थांचा समावेश होता... मंडळी फराळावर इतकी तुटून पडली की शेवटी "ह्यानंतर डिनर पण आहे" अशी घोषणा आर्जे ला करावी लागली.. 
"रंगपेटी उघडू चला..!!!"
गणेशोत्सवानिमित्त मायबोलीच्या विस्तारित परिवारासाठी एक नवीन स्पर्धा!!
१३ वर्षांपूर्वी मायबोली सुरु झाली तेंव्हा बहुतांश मायबोलीकर एकटेदुकटे होते. पण काळ सरला तसे बर्याच मायबोलीकरांचे दोनाचे चार हात झाले. अन आता तर त्यांच्या संसार वेलींवर फुलेही उमलू लागली.
मायबोली आता आपले दोन्ही हात पसरून या छोट्यांना आपल्यात सामावून घेत आहे.
गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच मायबोलीकरांच्या चिमुकल्यांसाठी खास चित्रकला स्पर्धा!!
*******************************************************
मायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती!
लागणारे जिन्नस : भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या सुध्दा!!!
लागणारा वेळ : अथपासून इतिपर्यंत.
क्रमवार पाककृती :
१. गणरायाचे स्मरण करून मायबोली गणेशोत्सवासाठी सज्ज व्हावे.
नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातल्या स्पर्धांना भरघोस दाद तसेच प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार!