कुठं शोधू तुला आई
जग ओस पडलं
तुझी हाक ऐकण्यासाठी
मन धडपडून रडलं
आमच्या लहानपणच्या खोड्या
तुझ्या डोळ्यांत हसल्या कितीदा
माझ्या हरवलेल्या बाहुल्या
तुझ्या कौतुकात सापडल्या कितीदा
तगमग तगमग होते जीवाची
मग धावत येतात तुझे भास
अवघ्या अस्तिवालाच लागते गं मग
तुझ्या भासांचीच वेडी आस
जागं असण्याची भीती वाटते
झोपायची भीती वाटते
तू लवकर परत ये ना
मला सगळ्या जगाची भीती वाटते
खोल खोल खोल तू माझ्या अंतरात
सारे जग सामावले तुझ्या पदरात
खोल खोल खोल तू माझ्या अंतरात
सारे जग सामावले तुझ्या पदरात
मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो, नुकतीच माझी आई देवाकडे राहायला गेली.
आखाड तळ ना आई
आषाढ अमावसेला
तळणाचा खमंग वास आला
तोंडातनं लाळेचा थेंब टपकला
तसा तो आईला म्हणाला
कणकीचा दिवा, वात वळ ना
देवी कटाळली खाऊन कळणा
कुर्डय , पापाड, भजी तळ ना
ए आय आखाड तळ ना
आय पदर लावती डोळयाला
थांब जरा पावणं ईउ दे घरला
डबल, डबल खर्च कशाला
मंग तळील आखाडाला
प्वार काय ऐकतय व्हय
दिवा लावाय त्याल नाय
तळणाला वतायचं काय
काळजावर दगड ठेवते माय
शेजाऱ्यापाजाऱ्याला माय विचारी
देता का कोण त्याल उधारी
हात हालवत आली घरी
प्वार आता भॉकाड पसरी
बाळाची आई
बाळाची अाई
कामात का बाई
हाका किती मारू
ये ना गं आई....
दुपटं ओलं
कळतं तुला
म्मम्मम लागे
समजतं तुला
येतेस ना लवकर
अाई गं अाई
कोणी घेतलंय मला
कळतंच नाही...