आई कधी जात नसते
नेहमी आसपास असते
देहाने जरी उरली नाही
तरी अनेक रुपात असते
आई कधी जात नसते ||१||
.
वात्सल्य अमर असते
पुन्हा पुन्हा येत असते
प्रत्येक बाळा सोबत
जन्म पुन्हा घेत असते
आई कधी जात नसते ||२||
.
जाते पण जेंव्हा ती
जग सुन्न करत असते
स्वप्नात येऊन मात्र
पाठीवर हात फिरवत असते
आई कधी जात नसते ||३||
.
'आई' या हाकेला
पुन्हा उत्तर देत नसते
परी नवीन बाळासाठी
पुन्हा ती हजर असते
आई कधी जात नसते ||४||
.
आई कधीच जात नसते
गुड मॉर्निंग मायबोली . कालच मातृदिन साजरा झाला .
कुठेतरी ऐकले कि - एक आठवडा आधीच कामगार दिन साजरा केला असताना वेगळ्या मातृदिनाची गरज आहे का?
मायबोलीकरांना काय वाटते?
जगावेगळा प्रश्न
आज ऑफिस ला जाताना गाडी मध्ये रेडीओ चालू होता. रेडीओवर संभाषणाचा विषय होता Mothers Day. या उठसुठ days मध्ये मला खरेखुरे भावलेलं days म्हणजे Mothers Day अथवा मातृदिन आणि Fathers day पितृदिन. खरोखरच आपण इतके ऋणी असतो आपल्या आई वडिलांच्या तरीही मातृदिन आणि पितृदिन हे आपण कधीच पाळत नाही किंवा आपल्याला त्याचे काही विशेष हि वाटत नाही. कधी कधी आपण हे पाश्चिमात्य खूळ म्हणून दुर्लक्षहि करत असतो. अर्थात हा काही या लेखाचा हेतू नाही परंतु प्रामाणिक इछा मात्र जरूर आहे कि प्रत्येकांनी वर्षातून एखादा दिवस तरी पूर्णपणे आपल्या आई वडिलांसाठी काढून जरूर साजरा करावा.
माझ्यासकट सर्वांच्या "आई" ला समर्पित..
========================
असं म्हणतात, परमेश्वराला सगळीकडे पोहोचता येणार नाही म्हणून त्याने "आई" निर्माण केली. तुम्हांला मला प्रत्येकालाच "आई" आहे, ती म्हणून !
आणि ती तशीच आहे .. लहानपणी होती तशीच ! "हे खा- ते खा" म्हणत चिऊ-काऊचा घास घेऊन भुणभुण करणारी .. किती वाळलास.. म्हणत उगाच पापण्या ओलावणारी.. रात्री कितीही उशीर झाला तरी ताटकळत बसणारी.. साध्या नाक ओलावणा-या सर्दीसाठी कांद्याचा काढा करणारी .. तश्शीच वेडी आई !