उपासाच्या शेवयांची खीर
Submitted by किल्ली on 14 November, 2021 - 23:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
उशिर झाला होता. जेवणंसुद्धा उरकत आली होती. आता आलोच होतो; म्हणून जेवायला बसलो!
वाढणार्याने सगळं वाढलं, पण बाजुच्या ताटात दिसणारी खीर मला वाढली नव्हती. बाजुच्याने मात्र चाटुन पुसून खीर संपवली होती.
तेवढ्यात त्याने आवाज दिला, "भाऊ, खीर!" ईथे मला एक वाटी मिळाली नव्हती, याला दुसरी वाटी पाहिजे होती.
"खीर संपलीये!"
तो थोडा नाराज झाला. त्याने दुसर्या कुणालातरी आवाज दिला, "दादा, खीर मिळेल का?" कित्ती हावरटपणा!
त्याने अजून तीन चार जणांना कामाला लावलं... शेवटी थोडीशी खीर सापडली. मला तर राग आला त्या हावरटपणाचा...