आई
आई (४ फेब्रुवारी २००७ )
आई हे ईश्वराचे
पवित्र पवन नाव
माया. प्रेम आपूलकी
व वाटसल्याने गाजावाजलेले गाव.
आई हे देवासमोर
सतत जळणारी निरंजन
जगातील सर्वात मोल्यवान
कधीही न संपणारे धन
आई हे प्रेम देणारा
अमृतने वाहणारा झरा
मनाच्या जखमेवरती
मायेची फुंकर घालणारा वारा
आई हे वाटसल्याने
काठोकाठ भरलेला सागर
रसाळ मधुर वाणीने
भरलेली घागर
आई हे मृत्युवर ही
मात करू शकणारे अमृत
सदा सर्वदा आशीर्वाद
देणारा देवतुल्य हस्त
आईचे प्रेम
आईचे प्रेम,
सागरहूनही खोल,
आकाशापेक्षा विशाल,
हिरयाहूनही अनमोल.
आईचे प्रेम,
अमृतहूणेही मधुर,
स्वर्गपेक्षाही सुंदर,
सर्व सुखाचे सार.