आई

Submitted by Meghvalli on 26 March, 2024 - 00:18

हळूहळू स्मृती पटलावरून तुझा चेहरा पुसट होत आहे !
आई तु केलेला संस्कार मात्र हृदयांत घट्ट मुळ धरुन आहे
तु भरवलेल्या काऊचिऊ च्या घासाची रुच अजुन जिभेवर आहे
तुझ्या हातच्या शेवयांच्या खीरीची चव न कधी परत मिळणार आहे
आजार पणात आमच्या आई तू रात्र रात्र जागवली आहे
आई तुझ्या शुश्रूषे वरच हा पिंड इतका मोठा झाला आहे
घरच्या अंगणांत ले तुलसी वृंदावन नेहमी आठवते मला
आज अंगण नाही, फ्लॅट मध्ये तरीही तुळस हवी मला
देव्हाऱ्यात ला तुझा बाळकृष्ण अजून तसाच दिसतो
मी म्हातारा झालो आई , तरी तो अजून बाळच दिसतो
आई जन्माष्टमी ला आता मी सुद्धा उपवास करतो
लड्डू गोपाल ला तुझ्या मी हाताने लाडू भरवतो
शेयरींग आणि केयरींग ही तुझी शिकवण
मी विसरलो नाही आई,सांभाळली अजुन
आई तुझ अस्तित्व सर्व घर भर नी मनात आहे
तू दिलेले संस्कार का इतक्या सहजी सुटणार आहे?
आई तु आमच्या विश्वांत नी रक्तात भिनली आहे
आई मग तरी ही का तुझा चेहरा पुसट होत आहे?

मंगळवार २६/३/२०२४ ०९:०५ AM

अजय सरदेसाई (मेघ)
meghvalli.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users