प्रेमी - प्रेम मोठं की मित्र ( भाग २)
टॉवेल मध्ये असलेली व्यक्ती जान्हवीच्या ओरडल्याने तो चांगलाच घाबरला होता . तो जाग्यावर थांबला आणि मागे मागे सरकू लागला . जान्हवीच्या आवाजाने आतल्या खोलीत असलेली प्रिया बाहेर येवून विचारू लागली.
" माफ करा आमच्या चुकीमुळे तुमची ही अवस्था झाली ??"
जान्हवी ने सुटकेचा श्वास सोडला व पाणी मागितले . पाणी पिऊन ती म्हणू लागली .
" मी आहे कुठे ?? माझे कपडे कोणी बदलले ?? काय झालं होत ?? "
प्रश्नाच्या उत्तरात प्रिया म्हणली ...