चटका - २.५

Submitted by सामो on 1 May, 2023 - 09:37

चटका-२

संयुक्ता थेरपिस्टकडे मदतीकरता गेली.
.
"प्रश्न हा आहे की तुला हा विवाह हवा आहे का? अंहं मला सांगू नकोस. तुझ्या डायरीत लिही. हवा असल्यास का आणि नको असल्यास का त्या कारणांची यादी बनव. प्रत्येक कारणाला १० च्या स्केलवर, वेटेज दे. उदाहरणार्थ - कुणाला वैवाहिक जीवनात 'फायनॅन्शिअल ट्रान्सपरन्सी' असणे महत्वाचे असेल तर कोणाला स्थैर्य महत्वाचे वाटेल. कोणी स्टेटस को मेंटेन करणे, झेपेलसे वाटेल तर कोणाला, नात्यातील विश्वाससापुढे अन्य कोणतीही तडजोड मान्य नसेल. तेव्हा प्रामाणिकपणे या प्रश्नांची उत्तरे स्वतःलाच दे." - डॉक्टर
.
संयुक्ताने डायरीमध्ये एक एक मुद्दा टिपण्यास सुरुवात केली काय, तिला स्वतःबद्दलची अ‍ॅक्युरेट इनसाईट मिळू लागली. बाकी सर्व मुद्दे सकारात्मक होते. कळीचा मुद्दा फक्त न जुळणारा शरीरसंबंध - हा होता. थेरपिस्टच्या सांगण्यावरुन, तिचे काही हार्मोनल अपहीव्हल्स तर नाहीत ना याचीही टेस्ट केली गेली.
.
तिला हे लग्न हवे होते!!! धिस डिसिजन मेड ऑल द डिफरन्स.
.
'विश्वास' हा सहजीवनाचा पाया असेल तर 'संवाद' ही त्या पहीली पायरी आहे. जसे कोंबडी आधी की अंडे आधी हा सनातन प्रश्न आहे तसाच सहजीवनात 'संवाद' आधी येतो आणि नंतर विश्वास. की व्हाईसेव्हर्सा? हे ठरविणे अवघड आहे. पण एक लक्षात घे, पहीला ऑफेन्स तुझ्याकडून घडला आहे म्हणुन कन्फेशनची जबाबदारी तुझी जास्त." - थेरपिस्ट
"पण डॉक्टर माझ्या अफेअरबद्दल, कसं सांगू मी नरेनला? तो उध्वस्त झाला तर? त्याने हात उगारला तर?"
"नरेनला तू अधिक ओळखतेस. ३ वर्षांपासून तू त्याच्याबरोबर आहेस. तेव्हा तुला असे वाटते का की तो हात उगारु शकेल?"
"नाही. पण .....
"तुला जर आमने सामने शक्य नसेल तर त्याला घरातल्या घरात पत्र तर लिहून देता येइल."
कन्फ्रन्टेशनची भिती प्रत्येकालाच वाटते. कन्फ्रन्टेशनची धार कमी करणारी, ही कल्पना संयुक्ताला आवडून गेली.
.
थेरपिस्टशी सविस्तर बोलून, पत्राचा टोन, भाषा, त्यातील जनरल मसुदा ठरविला गेला. या पत्राच्या वाचनोपरान्त काय रिझल्टस हवेत त्याची डिटेल्स नक्की झाली. आणि होय या ही मुद्द्यावर थेरपिस्टशी सविस्तर चर्चा झाली की काय होउ शकते, नरेन कसा रिअ‍ॅक्ट होउ शकतो. आणि ते संयुक्ताने कसे हाताळावे. पत्रात काय नव्हते! शब्द न शब्द विचारपूर्वक योजलेल्या या पत्रात - सर्वात प्रथम कबुली होती, झालेल्या प्रसंगांची संयुक्ताने ओनरशिप घेतलेली होती. नरेनला हा विश्वास दिलेला होता की संयुक्ताने या संपूर्ण घटनेला मागे टाकले आहे. नरेनला हा धक्का होता आणि तरीही एका व्हिक्टिमाइझ्ड माईंडसेट मध्ये न जाता त्याने या संपूर्ण घटनेकडे संबंधांना दिलेली, एक अपॉर्च्युनिटी, या दॄष्टीने पहावे म्हणुन त्याची मनधरणी होती. क्षमायाचना होती. आणि विदाऊट मिन्सिंग एनी वर्डस, संयुक्ताला विवाहामधुन काय हवे आहे हे सुद्धा ठळक केले गेले होते."
.
तिने ते पत्र त्याच्या हाती सुपूर्त केले. ती एवढेच म्हणू शकली - "नेरेन प्लीज हे पत्र वाच. आय अ‍ॅम सॉरी पण ..... मला समजून घे." पुढे घळघळा अश्रूंसमोर, तिला बोलता येइना. पुढचे काही आठवडे. महीने निव्वळ टर्ब्युलंट, होते, पेनफुल होते - नरेन 'Denial, Anger, Bargaining, Depression,' या स्टेजेसमधुन गेला. येस, ही वॉज ग्रिव्हींग. दोघांच्याही विवाहसंबंधाला 'संयुक्ताच्या प्रतारणेचे' नख जिव्हारी लागलेले होते हे नाकारण्याचे कारणच नव्हते पण थेरपिस्टच्या मदतीने, संयुक्ताने नरेनची मनःस्थिती व्यवस्थित हाताळली. अवघड होते, अशक्य नाही.
.
तिने त्याचा विश्वास संपादन केला न केला आणि आश्चर्य म्हणजे, एके दिवशी स्वतः थेरपिस्टकडे येण्यास नरेनने इन्टरेस्ट दाखविला. त्याने धैर्याने, संयुक्ताकडे त्याच्याच स्वतःच्या भूतकाळातल्या त्या अत्यंत नाजूक तसेच पेनफुल घटनेची वाच्यता केली. बाप रे!! संयुक्ताला हे नवीन तर होतेच पण तिच्याकरताही नरेनची, नवीन बाजू प्रकर्षाने प्रकाशात आली. हा त्यांच्या वैवाहिक जीवनातील दुसरा धक्का. आणि तरीही, जिगसॉ पझलचा शेवटचा ठोकळा गवसावा तसे काहीसे तिला झाले. आणि संयुक्ताने , नरेनचा, थेरपिस्टला भेटण्याचा निर्णय उचलून धरला. संपूर्णतया पाठिंबा दर्शविला. नरेनच्याही मनावरचे ओझे पहील्यांदा कमी झाले कारण पहील्यांदा त्याने या घटनेची वाच्यता केलेली होती. या एवढ्याश्या निर्णयाकरता, कबुलीकरता, अफाट धैर्य लागले होते आणि ते त्याने दाखविले निव्वळ संयुक्तावरील, विश्वासाच्या बळावर. खूप खूप वादळी पावसानंतर उघडीप होणार होती. तशी लक्षणे दिसत होती.
.
आणि दोघे संयुक्ताच्या थेरपिस्टला भेटले. आता पुढे ......

चटका-३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला धीरजबद्दल जाणून घ्यायला आवडेल. किंबहुना, संयुक्त आणि नरेंन पेक्षा जास्त धीराजची थेरपी महत्वाची आहे.

धनवन्ती आपले खूप आभार.
@पाटील - धीरजला थेरपीला नेणार कोण?
मला तरी धीरजच्या मनात डोकावणे अ‍ॅज अ लेखक म्हणुन शक्य दिसत नाही.

मला नाही वाटत धीरज ला थेरपी देणं शक्य आहे.
तुम्ही हे पात्र एका opportunistic पुरुष म्हणून लिहलय अस वाटत. सद्याच्या समाजात असे सखाराम बाईंडर भरपूर असतील, किती जणांना थेरपी देणार आणि त्यांनी ती स्वीकारायला हवी ना.

भाग २.५ लिहिलात त्याबद्दल धन्यवाद, कथा संपूर्ण झाली ...

सखाराम बाईंडरला अनेक कंगोरे आहेत. तो विषय वेगळा..
धीरज तसा का झाला हे वाचायला आवडेल. बरं तो आपला कार्यभाग आटपून मोकळा होऊ शकत होता, पण त्याने सेक्सची भीक मागायला का लावली? असंवेदनशील असेल तर हाताशी आलेली एक मादी, एक नर अशी सहजासहजी का सोडतो? अर्थात, पुढे लेखिकेची मर्जी...

आपला कार्यभाग आटपून मोकळा होऊ शकत होता---- ऑलरेडी त्याने काही महीने उपभोग घेतलाय आणि आता त्याला नवीन सावज / टेस्ट हवी असेल म्हणून ब्रेक अप करायचा एकमेव उद्देश् ठेवून विविक्षित परिस्थितीचा गैरफायदा घेत अपमान केला असेल.
ह्यातसुद्धा २ मुद्दे असू शकतात -
१) एकावेळी एकच -- आधी कोणीतरी त्याला प्रेमात फसवलेले असावे म्हणून अपमानाचा बदला घेण्याचा उद्देश
२) एकावेळी अनेक --- निव्वळ मौजमजा (टीपी) आणि शारीरिक सुखाच्या विकृत कल्पनापूर्ती फुकटात मिळवणे

सामो, मस्त लिहिलेत सर्वच भाग.धीरज चं व्यक्तिमत्त्व सर्वात संताप जनक आहे.विवाहबाह्य संबंधांचा काही वेळा लाभ घेऊन झाल्यावर त्याला हा पॉवर प्ले सुचलाय.यात हॉलीयर डॅन दाऊ असल्याचे दाखवणे किंवा आधीचं काही खटकलेलं आठवून बदला घ्यायला अपमान करणे यापलीकडे विशेष काहीही हेतू दिसत नाही.